रजनी परांजपे यांची शाळा तुमच्या दारी!

0
59
_Door_Step_School_1.jpg

रजनी परांजपे यांनी ‘डोअर स्टेप स्कूल’’च्या माध्यमातून शिक्षणापासून वंचित मुलांना शिक्षण आणि संस्कार देऊन चांगला नागरिक घडवण्याचा ध्यास घेतला आहे. रजनी त्यांची ‘डोअर स्टेप स्कूल’ अर्थात ‘शाळा तुमच्या दारी’ ही संस्था पुणे व मुंबई या महानगरांमध्ये चालवत आहेत. मुलांना शाळेत जाता येत नसेल तर शाळाच तुमच्या दारी न्यायची असे त्या शाळेचे स्वरूप! त्यासाठी रजनी यांनी बसचे रूपांतर शैक्षणिक साधनांनी सुसज्ज अशा एका वर्गखोलीत करून घेतले आहे. ती सर्वसाधारण गाडीसारखी गाडी, पण ती जेथे कोठे मुले असतील तेथे उभी राहिली, की तिचे रूपांतर वर्गखोलीत होते. तेथे शिकण्यासाठी व शिकवण्यासाठी लागणार्‍या सर्व गोष्टी तयार असतात. रजनी यांनी स्वत:चे असे खास तंत्र तेथे शिकवण्यासाठी विकसित करून घेतले आहे. त्यात मुलांना अनेक शैक्षणिक साधनांचा वापर करून शिकवले जाते. विविध तक्ते, पुठ्ठ्यांपासून तयार केलेले फलक, चित्रे यांचा कल्पकतेने वापर शाळेपासून दूर पळणार्‍या मुलांना शाळेची व शिक्षणाची गोडी लावण्यासाठी केला जातो. ती फिरती शाळा मुख्यत: फुटपाथ, रेल्वे स्टेशन, भाजीमार्केट अशा ठिकाणी काम करणारे, बांधकामावर-वीटभट्टीवर काम करणारे, पथारी व्यावसायिक अशा दुर्लक्षित समाजातील गरीब मुलांसाठी उपयुक्त ठरत आहे.

रजनी यांना त्या मुंबईतील कुलाबा येथील महानगरपालिकेच्या शाळेत काम करत होत्या तेव्हा, 1988 साली ‘डोअरस्टेप स्कूल’ची कल्पना सुचली. मुलांच्या मेंदूचा विकास वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत झपाट्याने होत असतो. त्या काळात मुलांचे आकलन, अनुकरण यांचा वेग वाढलेला असतो. मूल जे पाहण्यास, अनुभवण्यास मिळेल ते आत्मसात करण्याचा प्रयत्न करत असते. शिक्षण अर्धवट सोडलेल्या मुलांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणणे, त्यांचे शिक्षण बंद होण्याचे कारण शोधून त्यावर उपाय शोधणे आणि त्या मुलांना पुन्हा शाळेची-शिक्षणाची गोडी लागावी म्हणून यथोचित प्रयत्न करणे हा ‘डोअरस्टेप स्कूल’ सुरू करण्यामागे रजनी यांचा उद्देश आहे. रजनी म्हणतात, ‘जर या मुलांना समाजात मानाने राहायचे असेल त्यांना त्यांची प्रगती साधायची असेल तर त्यांनी शिक्षण घेणे हाच त्यावरील मुख्य उपाय आहे. रजनी यांना सगळ्यांना सोबत घेऊन काम करायला आवडते. रजनी यांच्या विचारांशी सहमत असणारी आणि त्यांना प्रोत्साहन देणारी त्यांचीच विद्यार्थिनी बिना सेठलष्करी, सेठलष्करी आणखी आणखी काही मित्र-मैत्रिणी यांच्या सहकार्यातून ‘डोअर स्टेप स्कूल’ या संस्थेचा जन्म झाला. संस्था मुंबईमध्ये १८८९-९०साली सुरू झाली. तीन ते सहा वर्षांपर्यतच्या मुलांना संस्थेचा बालवाडीत शिकवले जाते. सहा वर्षांच्या पुढील मुले कॉर्पोरेशनच्या निरनिराळ्या शाळांत पाठवली जातात. त्या मुलांना नंतर ‘सपोर्ट सर्व्हिस’ पुरवली जाते. उदाहरणार्थ, लहान मुलांसाठी पाळणाघर चालवणे, शाळेत नेण्यासाठी ट्रान्स्पोर्टची सोय करणे, शाळेतून आल्यानंतर ज्यांना शिकवण्यास घरी कोणी नसते त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी अभ्यासवर्ग अभ्यासवर्ग घेणे, मुलांसाठी वाचनालय चालवणे असे कार्यक्रम शाळेच्या स्थापनेपासून चालू आहेत.

रजनी यांचा पिंड हा समाजसेविकेचा. त्यांनी पदवीनंतर आणि लग्नानंतर पंधरा वर्षांनी समाजसेवा क्षेत्रातील पदव्ययुत्तर समाजसेवा क्षेत्रातील पदव्युत्तर शिक्षण मुंबईच्या ‘निर्मला निकेतन’’मधून पूर्ण केले आहे. ‘त्यांनी ‘निर्मला निकेतन’ कॉलेज’मध्येच अध्यापिका म्हणून काम केले. रजनी यांनी संशोधनविभागाच्या अध्यक्ष (1982-84) म्हणून काम पाहिले, त्या कॉलेजच्या अंगणवाडी पर्यवेक्षिकांच्या प्रशिक्षण विभागाच्या समन्वयक म्हणून कार्यरत होत्या. त्यांनी अनेक अभ्यासप्रकल्प राबवले आणि यशस्वीही केले. त्यांना जपानम’धील शिकोकू ख्रिस्तीन विद्यापीठात मार्गदर्शन करण्यासाठी प्राध्यापक’ म्हणून आमंत्रित केले गेले होते. त्यांनी ‘’युनिसेफ’’’ संस्थेसाठी पुणे महानगरपालिकेच्या पंचावन्न प्राथि’क शाळांम’धील शैक्षणिक दर्ज्याचा अभ्यास 1989 मध्ये केला. त्यांनी पुणे येथे ‘’डोअर स्टेप स्कूल’ (डीएसएस)ची स्थापना 1993 ’मध्ये केली. शैक्षणिक दृष्ट्या दुर्लक्षित ’मुलांना शाळेत येण्यात अनेक अडचणी असतात. त्यात मु‘ख्य अडचण पाण्याची. महानगरपालिकेकडून दुपारी 3 ते 5 या वेळात त्या वस्त्यांमध्ये पाणी पुरवठा केला जातो. नेम’क्या त्या वेळी मजूर का’मावर असतात. अशा वेळेस जर मू’ल शाळेत असेल तर पाणी कोण भरणार? कुटुंब पाण्याविना कसे आणि किती दिवस राहणार? मूल जर दिवसाचे आठ तास शाळेत बसले तर घराकडे, लहान भावंडांकडे लक्ष कोण देणार? मग रजनी यांच्या मनात शाळा त्यांच्यापर्यंत नेऊया असा विचार डोकावला. त्याच कल्पनेतून डीएसएसची स्थापना झाली. बस हा या शाळेच्या कल्पनेचा अगदी लहान भाग आहे. ती ‘बेसिक स्कूल’च्या संकल्पनेतून निघालेली गोष्ट आहे.

_Door_Step_School_2.jpg‘डोअरस्टेप स्कूल’मध्ये मुलांना केवळ साक्षर न करता त्यांना दैनंदिन व्यवहारात शिक्षणाचा उपयोग करता यावा या दृष्टीने शिक्षण दिले जाते. त्यासाठी अभ्यासपूरक वर्ग चालवले जातात, वाचनावर जास्त भर दिला जातो. ती पद्धत बर्‍यापैकी यशस्वी झाल्याचे लक्षात आले आहे. संस्थेत प्रत्येक मुलाला स्वत:चा अभिमान जपण्याचे शिक्षण बालवाडीपासून दिले जाते. पुण्या-मुंबईसार‘ख्या ठिकाणी ट्रॅफिक हा प्रश्न भेडसावणारा आहे. तीन-चार किलोमीटरवर असलेल्या शाळेत जाण्यासदेखील अर्धा ते एक तास लागतो. मजुराचा तेवढ्या वेळेचा रोजगार बुडतो. मजुरांच्या दृष्टीने तो वेळ वाया जातो. जी मुले केवळ शाळेत जा-ये करण्याची सोय नसल्यामुळे शाळेत जाण्यापासून वंचित राहतात. अशा मुलांना शाळेत ने-आण करण्याची व्यवस्था संस्थे’मार्फ’त विनामूल्य केली जाते. कार्पोरेट सेक्टर, फंडिंग ऑर्गनायझेशन, सेव्ह द चिल्ड्रेन-इंडिया यांसारख्या संस्था डीएसएस संस्थेला मदत करतात; त्याचप्रमाणे इन्फोसिस, विप्रो अशा मोठमोठ्या कंपन्याही आर्थिक हातभार लावतात. त्या कंपन्यांना प्रस्ताव पाठवायचे आणि त्यांनी मंजुरी दिली, की पुढील कार्यवाही असे एकंदर त्यांच्या कामाचे स्वरूप आहे.

संस्थेची शाळा पुण्यात शंभर बांधकामांवरच्या वस्त्यांवर चालते. संस्था शाळा वाचनालये आणि शाळेत वाचन संस्कार प्रकल्प चालवते. संस्थेकडून पुणे व पिंपरी-चिंचवडमधे असलेल्या महानगरपालिकेच्या दोनशेचाळीस शाळांत प्रकल्प राबवले जातात. रोज सुमारे आठशे ते एक हजार मुलांना शाळेत पोचवणे आणि घरी आणून सोडणे हे काम नि:शुल्क केले जाते. रजनी म्हणतात, “पुण्यात तीन हजार बांधकामं चालू आहेत. त्यातील कमीत कमी दोन हजार बांधकामांवर मजुरांच्या वस्त्या आहेत. आम्ही शंभर वस्त्यांवर काम करतो. इतर एनजीओज आणखी शंभर जागांवर काम करतात.” 2003-2004 च्या पाहणीनुसार तीनशेऐशी साईटसवर पाहणी केली असता सुमारे साडेचार हजार मुले शाळेत न जाणारी आढळली. दीड हजार बांधकामांच्या यादीत वीस हजार मुले विनाशिक्षण फिरत असतात. दगडखाणीवर-वीटभट्टीवर काम करणारी, रस्त्यावर भीक मागणारी मुले दिसतात. ती विखुरलेली असतात, त्यामुळे त्यांची संख्या कळत नाही. पण ती सं‘ख्या मोठी आहे. बांधकाम मजूर हे कर्नाटक, आंध्र‘, बिहार, छत्तीसगड या राज्यांमधून येतात; तसेच, महाराष्ट्राच्या निरनिराळ्या खेड्यांतूनही रोजगारासाठी येतात. त्यांच्या मुलांचे शिक्षण मजूर हिंडत राहिल्याने होत नाही आणि मुलांचे शिक्षण झाले नाही तर ती त्याच चक्रात अडकतात-फक्त शारीरिक कष्ट करत राहतात. देशाचा ‘ह्युमन रिसोर्स’ फुकट जातो. केंद्र सरकारच्या कामगारांच्या बदल्या होत असतात, म्हणून सरकार त्यांच्या मुलांसाठी ‘सेंट्रल स्कूल्स’’ चालवते. मजूर लोकपण कामासाठी इकडे तिकडे फिरत असतात. तेही देशासाठी काम करत असतात. त्यांच्यासाठी मात्र खास शाळांची सोय सरकारकडून केली जात नाही. समाजही त्यांच्या असण्या-नसण्याबद्दल उदासीन आहे. सुशिक्षित माणसांच्या मनात त्यांच्या या अवस्थेची जाणीव नाही, त्यांच्याबद्दल आपुलकी नाही या गोष्टीची खंत रजनी व्यक्त करतात. रजनी यांच्या संस्थेत अनेक मुलांनी त्यांचे शिक्षण पूर्ण केले आहे. आणि ते त्यांचे आयुष्य व्यवस्थित व समाधानाने जगत आहेत.

संस्थेचा पत्ता – 110, आनंद पार्क, औंध, पुणे, महाराष्ट्र. 020-25898762, 9371007844

rajani@doorstepschool.org

www.doorstepschool.org

– मंगला घरडे 9763568430

(पूर्वप्रसिद्धी – साप्ताहिक पुणे पोस्ट, जुलै 2015)

About Post Author