Home व्यक्ती योगेश रायते – खडक माळेगावचा गौरव

योगेश रायते – खडक माळेगावचा गौरव

योगेश रायते यांनी नाशिक जिल्ह्याच्या निफाड तालुक्यातील खडक माळेगाव या गावाला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून दिली आहे. ते उत्साही व धडाडीचे, समाजाच्या समस्यांची सर्वांगीण जाण असलेले व समाजाच्या कल्याणाची तळमळ असलेले तरुण कार्यकर्ते आहेत. योगेश रायते यांचे आई, वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, दोन मोठे भाऊ, दोन वहिनी असे कुटुंब आहे. रायते यांची पत्नी शिक्षक म्हणून कार्यरत आहे. त्यांची पारंपरिक पद्धतीची घरची शेती होती. त्यांना कृषी तंत्रज्ञानाची फारशी माहिती नव्हती. परंतु त्यांनी ‘यशवंतराव मुक्त विद्यापीठ’ (नाशिक) येथे कृषी अभ्यासक्रम शाखेला 2003 मध्ये प्रवेश घेतला. त्यांना तंत्रज्ञान व ज्ञानाचे महत्त्व पटले. त्यांना कृषी तंत्रज्ञानाच्या उपयोगाने ग्रामविकासाला चालना देता येईल याची जाणीव झाली. त्यांनी त्या दिशेने प्रयत्न सुरू केले. रायते जानेवारी 2009 पासून शेतीबरोबरच ग्रामसेवक म्हणून काम करतात.

त्यांनी खडक माळेगावच्या तरुणांना कृषी तंत्रज्ञान माहीत व्हावे म्हणून पाच वर्षांत कृषितज्ज्ञांची सत्तर भाषणे आयोजित केली. त्यासाठी लागणा-या आर्थिक पाठबळासाठी कोणाकडेही पैसे न मागता, लोकवर्गणीतून उभा झालेला निधी व वेळप्रसंगी स्वतःकडील  पैसे देऊन कार्यक्रम तडीस नेले. त्यात शासकीय संस्थांना सहभागी करून घेतले. महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राष्ट्रीय बागवानी संशोधन केंद्र, गहू संशोधन केंद्र, द्राक्ष संशोधन केंद्र, महाबीज, बीज प्रमाणीकरण यंत्रणा यांसारख्या शेतीशी संबंधित शासकीय यंत्रणांचा सहभाग घेऊन हंगामनिहाय व गरजेप्रमाणे त्या त्या यंत्रणाचे मार्गदर्शन घेतले, उपक्रम आखले, अनुदान मिळवले.

निरनिराळ्या पिकांसंदर्भात व्याख्यान सत्रे घेतली गेल्याने, युवकांना शेतीमध्ये वेगवेगळ्या मोसमात नवनवे प्रयोग करून पाहण्यास प्रेरणा मिळाली. त्यात ‘रोपवाटिका प्रशिक्षण’ महत्त्वाचे ठरले. द्राक्ष कलम करण्यासाठी पूर्वी कोकणातील मजुरांची गरज पडायची. त्यामुळे वेळेवर कामे होत नसत. प्रशिक्षणामुळे परिसरातील खडक माळेगाव येथील प्रशिक्षित तरुणच कलम करतात. त्यामुळे गरजूंना रोजगार मिळाला. नवीन बियाणे व उत्पादन तंत्रज्ञान संघटित असल्यामुळे; तसेच, नियमित संपर्क असल्याने तज्ज्ञ त्यांना प्राधान्य देऊ लागले. तंत्रज्ञान सहज उपलब्ध झाल्याने जागरुकता व संघभावनेमुळे अनुभवांची देवाणघेवाण वाढली. त्यातून, द्राक्ष निर्यात वाढली, सामुहिक शेती, शेडनेटमधील भाजीपाला, नवीन वाण गावात येऊ लागले.

_YogeshRayte_KhadakMalegavchaGaurav_2.jpgज्ञान गावातच मिळाल्यावर, युवकांनी त्याचा योग्य तो फायदा करून घेतला. त्यांना एकमेकांच्या अनुभवाचाही फायदा झाला. एकत्रित खरेदीविक्री सुरू झाली. युवा शेतक-यांची संघटना गठित केल्याने त्या गोष्टी करण्यास संघटनेचे पाठबळ मिळाले. योगेश रायते यांनी रोपवाटिका, बीबियाणे व औषधे; तसेच, यांत्रिकीकरण, शासकीय योजनांची माहिती या बाबतींत माहितीची देवाणघेवाण करण्यास प्रोत्साहन दिले. गावातील युवा शेतक-यांना शेतीमधील प्रयोग समक्ष पाहता यावेत म्हणून कृषीसहली आयोजित केल्या.

‘यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठा’चे तत्कालीन कुलगुरू डॉ. कृष्णकुमार, डॉ. प्रकाश अतकरे, कृषी विज्ञान विद्या शाखेचे संचालक डॉ. सूर्या गुंजाळ, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख रावसाहेब पाटील यांनी; तसेच, कॅनडा येथील शास्त्रज्ञ टेनिस मुनोत यांनी खडक माळेगाव गावाला भेटी दिल्या व खडक माळेगाव गावाच्या प्रगतीचे कौतुक केले.

सोयाबीनची डी एस 228 फुले कल्याणी जात, कांद्याची फुले समर्थ जात व भुईमुगाच्या टॅग 24 या 3 जातींचे बीजोत्पादन; तसेच, हरभ-याच्या विजय, विशाल, दिग्विजय व विराट या बियाण्यांच्या जातींचे बीजोत्पादन खडक माळेगाव या गावातच केले गेले.

योगेश रायते यांनी खडक व माळेगाव या गावातील पस्तीस एकर पडिक जमिनीवर आंबा लागवड करण्यासाठी प्रयत्नशील राहून गाव फळबागांनी समृद्ध केले. त्यासाठी मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्राने आंब्याच्या कलमांची रोपे मोफत दिली. भारतात हे प्रथमच घडले. आंबा उत्पादन दहा वर्षांपासून सुरू झाले आहे. त्यामुळे गावाला उत्पन्नाचा नवा स्रोत उपलब्ध झाला आहे.

‘कृषी विज्ञान केंद्रा’च्या साहाय्याने पंचक्रोशीतील शेतक-यांना शेतीचे साडेसात लाख रुपयांचे बियाणे मोफत वाटले गेले. योगेश रायते यांनीच ह्या बाबींसाठी पुढाकार घेतला होता. योगेश रायते करत असलेल्या प्रयत्नांमुळे खडक माळेगाव हे गाव उत्तर महाराष्ट्रातील कृषिक्षेत्रात आदर्श गाव (मॉडेल गाव) म्हणून ओळखले जाते.

योगेश रायते यांनी ‘कृषी मुक्त विद्यापीठ’ व ‘कृषी प्रयोग परिवार, खडक माळेगाव’ यांच्या संयुक्त विद्यमाने गावाला रूग्णवाहिका मिळवण्यासाठी पाठपुरावा केला. योगेश रायते यांनी शिक्षणक्षेत्रात गाव मागे राहू नये, गावातील मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा- त्यांना जगाची ओळख व्हावी, त्यांनी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करावे यासाठी शाळेमध्ये गुणगौरव समारंभ, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करणे, विविध विषयांतील तज्ज्ञांची व्याख्याने ठेवणे आदी उपक्रम राबवले.

योगेश रायते यांनी गावाच्या पर्यावरण विकासाकडेसुद्धा लक्ष दिले. स्थानिक संस्थांच्या परिसरात वृक्ष लागवड करण्यासाठी ग्राम पंचायतीच्या माध्यमातून प्रस्ताव पाठवण्यात विशेष सहभाग नोंदवला. त्यामुळे गावाला ‘पर्यावरण विकास रत्न’ पुरस्कार 2011 मध्ये मिळाला. गावात जवळपास बारा हजार झाडे लावली गेली. त्यातील सात हजार झाडे जगवण्याच्या प्रयत्नांना यश आले. त्यात सतत वाढ होत आहे.

माळेगावला ‘खडक’ असे विशेषण चिकटले ते खडकाळ माळरानामुळे. आता ते ‘हरित’ माळेगाव झाले आहे! खडक माळेगावने जलसंधारण, फळबाग लागवड, पर्यावरण संवर्धन यांसाठी उपक्रम राबवून सारे शिवार हिरवाईने नटवले आहे. ते ‘एक गाव एक गणपती’ या उत्सवामध्ये नियमित रक्तदान शिबिर व नेत्ररोगनिदान शिबिर आयोजन करतात. त्यांनी 2015-16 मध्ये गावातील प्रयोगशील शेतक-यांना एकत्र करून ‘हायटेक फार्मर्स प्रोड्युसर कंपनी’ची स्थापना केली आहे. तसेच, त्यांनी 1 जून 2017 शेतकरी संपात, किसान क्रांती जनआंदोलनात राज्यसमन्वयक म्हणून कार्य केले. त्यांची 2015 मध्ये कृषिक्षेत्रात उल्लेखनीय कामाची दखल घेऊन द्राक्ष बागायतदार संघ संचालकपदी बिनविरोध निवड झाली आहे.

रायते यांना 2010-11 महाराष्ट्र शासन कृषी विभागाचा जिल्हास्तरीय आदर्श शेतकरी पुरस्कार, 2015-16 कृषिक्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल कार्व्हर कृषिगौरव यांसारख्या पुरस्काराबरोबर चोवीस पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

योगेश रायते गावाच्या ग्रामसभेमध्ये सातत्याने सहभागी होत आले आहेत. त्यांच्या सहभागाने ग्रामविकासाला चालना मिळाली आहे व गावाने गौरव ग्रामसभा पुरस्कारही पटकावला आहे. गावाला शासनाचा ‘महात्मा गांधी तंटामुक्ती’ पुरस्कारदेखील मिळाला आहे. गावसुधारणा योजनेत विभागस्तरीय विशेष शांतता हा पावणेनऊ लाख रुपयांचा पुरस्कार गावाला प्राप्त झाला आहे. त्याला योगेश रायते यांची तळमळ, चिकाटी व कर्तृत्व कारणीभूत आहे अशी भावना गावक-यांची आहे. गावातील हायकोर्टापर्यंत गेलेले तंटेदेखील ग्रामसभेच्या पदाधिका-यांनी सोडवले आहेत.

योगेश रायते – 9370241572, 9511681809

– अनुराधा काळे

About Post Author

50 COMMENTS

  1. सामाजिक आणि गावाची जाण…
    सामाजिक आणि गावाची जाण असलेला निष्पक्ष काम करणारा मालेगांव चा नेता…. अभिनंदन काका

  2. होय. नक्कीच. योगेश रायते हे…
    होय. नक्कीच. योगेश रायते हे गावातील खरोखरच एक आगळेवेगळे व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्या प्रयत्नांचा गावाला नक्कीच फार मोठा हातभार लागला आहे. एक उमद्ये नेतृत्व म्हणून गाव त्यांच्याकडे आशेने पाहत असते. त्यांची गावाबद्दलची ही अपार निष्ठा गावाला खरोखरच एका वेगळ्या पातळीवर घेऊन जाईल यात शंका नाही. त्यांच्या भावी वाटचालीस त्यांना शुभेच्छा.

  3. योगेश रायते म्हणजे…
    योगेश रायते म्हणजे समाजाचीखरी तळमळ असणारी माझ्या जीवनातील आदर्श व्यक्ति आहे .त्यांचा थिंक महाराष्ट्र डॉट कॉम ने दखल घेतली ,धन्यवाद काकांचे अभिनंदन ?????????

  4. खडकमाळेगाव च्या विकासा
    साठी…

    खडकमाळेगाव च्या विकासा
    साठी योगेश रायतेयांचे प्रयत्न अगदीं वंदनीय आहेत.आणिते या त्यांच्या कामा मुळे ते युवका चे आयडॉल आणि खडकमाळे गावचे भूषण म्हणून त्याच्या कडे पहिले जाते अशा या त्यांच्या कार्यास सलाम. ?

  5. अप्रतिम, अलौकिक कार्य योगेश…
    अप्रतिम, अलौकिक कार्य योगेश रायते यांनी केले आहे.

  6. खरी समाजाची तळमळ असलेला…
    खरी समाजाची तळमळ असलेला माणूस म्हणजे योगेश रायते त्यांच्या कार्याला वंदन ,थिंक महाराष्ट्र डॉट कॉम चे आभार

  7. समाजासाठी योगेश रायते घेत…
    समाजासाठी योगेश रायते घेत असलेले कष्ट आम्ही जवळून पाहिले आहे मित्र म्हणून त्यांच्या बरोबर त्यांच्या नेतृत्वात बरेच सामजिक काम केलीये शेती व शेतकर्या बद्दल अंतकर्णमधून तळमळ आणि समाज घडवण्यासाठीची त्यांचा प्रयत्न व कष्ट वाखाणण्याजोगे आहेत

  8. मस्त ना काका ……
    मस्त ना काका ……

  9. Yogesh Rayate is great…
    Yogesh Rayate is great personality. His human Bing about every social work about any secoter .His put effect in every social work

  10. अत्यंत छान असा हा लेख होता ।…
    अत्यंत छान असा हा लेख होता । असणारच कारण ज्या व्यक्ति बद्ल हा लेख आहे ति व्यक्ति यापेकश्या खुप जास्त जिद्दी व गावासाठी जीव ओतनारी आहे।

  11. आमच्या गावाची शान योगेशकाका…
    आमच्या गावाची शान योगेशकाका रायते

  12. योगेश काका रायते यांच्या…
    योगेश काका रायते यांच्या अतुलनीय आणि निस्वार्थ कार्याची दखल घेतल्याबद्दल आपले आभार… असा अवलिया शोधून सापडणार नाही, ज्याच्या डोक्यात फक्त एकच विचार फिरतो ग्रामविकास… त्यांचा खडक माळेगाव आणि पंचक्रोशीतल्या गावांमद्धे सामाजिक कार्यात असणारा सहभाग उल्लेखनीय आहे.

  13. एक ग्रेट व्यक्तीमहत्व
    एक ग्रेट व्यक्तीमहत्व

  14. खडक माळेगाव भूषण योगेश काका
    खडक माळेगाव भूषण योगेश काका

  15. युवा वर्गासाठी प्रेरणादायी…
    युवा वर्गासाठी प्रेरणादायी काम,

    भविष्यातील वाटचालीस योगेशला खुप खुप शुभेच्छा !!!

  16. अभिमानास्पद कार्य आहे काका…
    अभिमानास्पद कार्य आहे काका तुमचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा

  17. Perfect Person in agro…
    Perfect Person in agro research & Innovative idea implementing
    Well mannered good relations with celebratory
    Politicians Beaurocrats

  18. योगेश रायते यांनी समाजासाठी…
    योगेश रायते यांनी समाजासाठी कार्य केल ते खरंच उल्लेखनीय आहे, त्यांनी राजकारण न करता नेहमी समाजकार केलं ,हे खरंच कोतुकास्पद आहे ।समाजातील प्रत्येक वर्ग आणि तरुण याच्या साठी एक आदर्श ठेवला आहे,समाजात प्रत्येकाला सोबत घेऊन काम केलं तर काहीही अशक्य नाही ,अशक्य ते शक्य करू शकतो, हे त्यांनी सिद्ध करून दाखवले ,समाजात कोणतेही परिवर्तन केलं जाऊ शकत, फक्त त्याची सुरुवात करणे महत्वाची असते,आणि ते करण्या साठी समाज नेहमी मागे असतो,परंतु योगेश काका रायते याच्या सारखे तरुण पुढे आले आणि त्यांनी समाजासाठी काम केले ,निचित च परिवर्तन होईल,आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, प्रगती होईल आणि समाजाला योग्य ती दिशा मिळेल.समाजासाठी जो कोणी हि काम करत असेल आपण आपले व्यक्तिगत भेद भाव सोडून त्यांना जास्तीत जास्त प्रोसाहित कसे करता येईल या कडे आपण लक्ष्य दिले पाहिजे .पुन्हा एकदा मी त्याचे मनापासून अभिनंदन करतो.

  19. योगेश काका रायते सारखा माणूस…
    योगेश काका रायते सारखा माणूस म्हणजे आमच्या खडक माळेगावला लाभलेला परीसच आहे,काका ज्या माणसाच्या संपर्कात आले त्याच सोनच झालेल आहे….कृषी प्रयोग परीवाराच्या माध्यमातुन विविध योजना ,सहकार्य, नविन ज्ञान याची पुरेपुर माहिती काकांनी विविध शास्त्रज्ञांना गावात बोलवुन ती शेतकर्यापर्यंत पोहचविली.तसेच युवा मोहत्सवासारखी शहरात होणारी संकल्पना काकांनी गावपातळीवर राबवली आणी त्याचा काही दिवसातच वटवृक्ष होतांना दिसत आहे….. काकांच्या मागे मजबूत आणी भक्कम साथ देणारा आमच्या सारखा खुप मोठा मित्र परीवार आहे….. योगेश काका खडक माळेगाव ला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जातील अशी आशा व्यक्त करतो व थांबतो….

  20. He is truly dedicated person…
    He is truly dedicated person, hat’s off to his dedication

  21. श्री योगेश रायते हे आमच्या…
    श्री योगेश रायते हे आमच्या गावचे भुषण असून ते गावातील व नाशिक जिल्ह्यातील तरूण, शेतकरी, वडीलधाऱ्या वरकरणी यांचा सन्मान ठेवून योग्य ज्ञान वा मार्गदर्शन करत असतात. ते नेहमी आपले स्वतःचे काम सांभाळून गावाची, जिल्ह्यातील समाजाची बांधिलकी जोपासत असतात. मला त्यांचा सार्थ अभिमान असून ते लवकरच गाव, जिल्हा व महाराष्ट्रातील जनतेचे लोकप्रिय असे व्यक्तिमत्त्व तयार होईल व आमच्या गावचे भूषण होईल. त्यांच्या सामाजिक कार्याला माझ्या परीवाराकडून मनःपुर्वक शुभेच्छा

  22. खरच खुपच छान आहे त
    खरच खुपच छान आहे त

  23. योगेशजी यांचे काम नेहमीच…
    योगेशजी यांचे काम नेहमीच कौतुकास्पद आणि अभिमानास्पद असते. खुप छान कामगिरी काकाजी.

  24. युवा वर्गासाठी प्रेरणादायी…
    युवा वर्गासाठी प्रेरणादायी काम,

    भविष्यातील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा..

  25. Khadak malegaon shan Yogesh…
    Khadak malegaon shan Yogesh kaka rayate
    This is great personality and good work

  26. काका ग्रेट व्यक्ती
    महत्व…

    काका ग्रेट व्यक्ती
    महत्व महाराष्ट्र
    माझा
    परिवार नाशिक ची शान

  27. अभिनंदन योगेश भाऊ पुढिल…
    अभिनंदन योगेश भाऊ पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा शुभेच्छुक कदम बबलु निफाड कारखाना

  28. योगेश तू माझा मोठा भाऊ…
    योगेश तू माझा मोठा भाऊ असल्याचा आज मला अभिमान आहे…

  29. योग्य दिशेने वाटचाल म्हणजेच …
    योग्य दिशेने वाटचाल म्हणजेच (योगेश),आजकाल आपणा सर्वापुठे खुप सारे यक्ष प्रश्न असतात त्या सर्वांना सामोरे जान्याचे व त्यातून मार्ग दाखवनारे योगेश काका हे आम्हा तरुणांचे ऐक टाँनिकच आहे. आपण बोलतांना म्हणतो हाताची पाचही बोटं सारखी नसतात पण काकांचे कार्य हे प्रत्येक क्षेत्रात आणि विषयात चढाओढिचेच आहे आणि हिेच त्यांच्या सर्वगुणसंपन्नतेची ओळख, स्वतासाठी खुप धेय्यवेडी माणसं बघितली पण समाजासाठी व त्यांच्या प्रश्नासाठी योग्य ठिकाणी योग्य बोट ठेऊन आजवर अनेक प्रश्न मार्गी लावुन काकांनी त्यांचे काम तालुक्यापुरते मर्यादित न ठेवता महाराष्ट्राभर पोहचवले वेळ मिळतो तेव्हा काकांसोबत काम करुन ऐक वेगळेच आत्मिक समाधान मिळते. आपल्या प्रत्येक कार्याला व विचारांना हा युवा वर्ग खांद्याला खांदा लावून काम करेल.

  30. योगेश काका हे आमच्या गावातले…
    योगेश काका हे आमच्या गावातले एक आवडते, आधुनिक विचारांचे व सामाजिक कार्यासाठी तत्पर असलेले व्यक्तिमत्त्व आहे.

  31. खडक माळेगावचे कर्तृत्ववान…
    खडक माळेगावचे कर्तृत्ववान व्यक्तीमत्व,सदैव गावासाठी आणि गावातील तरुणांसाठी धडपड करत रहाणे असे एक समाजसेवक योगेश काका रायते

  32. काकांचे काम हे शेतकऱ्यांच्या…
    काकांचे काम हे शेतकऱ्यांच्या हिताचे आहे।
    आनी ककानी हे कार्य पुढ़ेही चालू थेवव

  33. काका, एक परिस आहे. जिथे जाईल…
    काका, एक परिस आहे. जिथे जाईल त्या गोष्टीचं सोनंच होईल. आज त्यांनी निस्वार्थपणे केलेल्या कामाचं फळ म्हणजे त्यांचं आदर्श अस गाव खडकमाळेगाव. सदैव आपल्या गावाबद्दल अतीव प्रेमाची भावना मनात बाळगून असलेल्या या अवलियामुळे गावाचा चेहरामोहरा बदलून गेला. राजकारणाचा कुठलाही कावाडावा न करता गाव बदलण्याचा ध्यास घेऊन काम करणं हा स्थायीभाव काकांच्या अंगात रुजून गेल्याने हे शक्य झाले. पण या राजकीय कुरघोड्यांचा त्रासही काका सहन करत आले. आणि गाव पुढे घेऊन गेले. चांगल्या माणसाच्या पाठीशी गावाने उभ राहील तर दुष्काळी खडकमाळेगाव ही आदर्श बनत हाच धडा शिकण्यासारखा आहे. काका, ग्रेट आहेत तुम्ही…आम्हाला सार्थ अभिमान आहे की आशा परीसाच्या सानिध्यात आणि मार्गदर्शनात आम्ही राहतो….

  34. अभिमान वाटावा अस प्रेरणादायी…
    अभिमान वाटावा अस प्रेरणादायी, परिसस्पर्शी व्यक्तिमत्त्व! योगेश काका आमचा मान, आमची शान!
    महाराष्ट्र माझा परिवार, नाशिक जिल्हा?????

  35. योगेश भाऊ सर्वाँसाठीच…
    योगेश भाऊ सर्वाँसाठीच प्रेरणादायी आहे.

  36. समाज आणि गावाच्या प्रगतीसाठी…
    समाज आणि गावाच्या प्रगतीसाठी आपले योगदान अनमोल आहे योगेशकाका राम बोराडे.

  37. आमच्या गावचे भूषण सर्वांचे…
    आमच्या गावचे भूषण सर्वांचे लाडके योगेशकाका आपणास उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा..?उमेश शिंदे .

  38. नक्कीच .. काकांचे युवा…
    नक्कीच काकांचे युवावर्गासाठी खूप प्रेरणादायी काम. पंचक्रोशीतील युवा वर्गाचे आदर्श खडक योगेश काका रायते?

  39. योगेश काका म्हणजे खूपच…
    योगेशकाका म्हणजे प्रेरणादायी व्यक्तिमत्व.

  40. योगेश काका आमच्या सारख्या…
    योगेश काका आमच्यासारख्या तरुण पिढ़ीचा आदर्श आहे. युवा वर्गाकरता प्रेरणादाई व्यक्ती आहे. सदैव गावचा विचार करणारा आहे. ना नफ़ा ना नुकसान अशा विचारने चालणारा माणूस आहे, काका तुम्ही आमचे श्रद्धास्थान आहे. गर्व आहे, की अशी व्यक्ती गावाला लाभली काका भावी वाटचालीकरता शुभेच्छा
    सागर दत्तात्रय रायते

Comments are closed.

Exit mobile version