– पुष्पा भावे
रविवारी दिल्लीत झालेल्या ‘स्लट मोर्चा’संबंधी जो स्लट हा शब्द वापरला जातो, त्यामध्ये स्त्रीचा पेहराव आणि तिचे चारित्र्य यांचा संबंध येतो. हा शब्द प्रामुख्याने अमेरिकेत वापरला जातो. आपल्याकडेही स्त्रीया ‘अशा’ प्रकारचे कपडे घालतात म्हणूनच त्यांच्यावर बलात्कार होतात, अशी विधाने केली जातात. मात्र असे कपडे घालणा-या अनेक महिला आपल्या श्रीमंती वर्तुळात सुरक्षीत असतात. बलात्कार होतात ते मजूर स्त्रीयांवर. असे वॉक काढताना त्याला गंभीर कारणे असू शकतात.
– पुष्पा भावे
रविवारी दिल्लीत झालेल्या ‘स्लट मोर्चा’संबंधी जो स्लट हा शब्द वापरला जातो, त्यामध्ये स्त्रीचा पेहराव आणि तिचे चारित्र्य यांचा संबंध येतो. हा शब्द प्रामुख्याने अमेरिकेत वापरला जातो. आपल्याकडेही स्त्रीया ‘अशा’ प्रकारचे कपडे घालतात म्हणूनच त्यांच्यावर बलात्कार होतात, अशी विधाने केली जातात. मात्र असे कपडे घालणा-या अनेक महिला आपल्या श्रीमंती वर्तुळात सुरक्षीत असतात. बलात्कार होतात ते मजूर स्त्रीयांवर. असे वॉक काढताना त्याला गंभीर कारणे असू शकतात. मणिपूरला निघालेल्या नग्न वॉकमध्ये बलात्कारासारखा गंभीर प्रश्न तर होताच, पण तो वॉक त्यावरील गंभीर प्रतिक्रिया होती. तिथे या प्रश्न ऐरणीवर आला होता. लष्करासारख्या बलदंड विरुद्ध बाजूसमोर आम्ही काय सांगू शकतो? अशा भावनेतूनच हा मोर्चा निघाला होता. मात्र प्रत्येकवेळी असे गंभीर अर्थ व कारणे असतीलच असे नाही.
‘स्लट वॉक’चा एकूण विचार करता असे वाटते, की असे वॉक ‘पुरूषी गे’ पद्धतीला उत्तर देण्यासाठी काढले जातात. मात्र आपण यात उतरावे की नाही याबद्दल अनेक महिलांच्या मनात शंका आहेत. असे प्रकार करून काहीही साधत नाही. त्यापेक्षा गंभीर विधाने करावीत. मात्र आजच्या काळात असे इव्हेन्ट करणे हेदेखील गंभीर विधाने करण्यासारखेच मानले जाते, हा वेगळा मुद्दा. एनडीए सरकार असताना अनेक ठिकाणी स्त्रीयांच्या ड्रेसकोडवर बंधने घाण्याचे प्रयत्न झाले. अशा वेळी त्यास विरोध करणे आवश्यकच आहे. मला व्यक्तीशः असे वाटते, की या प्रकारच्या वादात पडू नये. चर्चेच्या पातळीवर बोलता येऊ शकेल. स्त्रीयांकडे पाहतानाच कपडे आणि चरित्र हे समीकरण वापरलेल जाते. पुरुषांकडे या पद्धतीने पाहिले जात नाही. मला स्वतःला अशी वावदुकी करावी असे वाटत नाही. उलट अशा प्रकारांनी स्त्रीवादी चळवळीला नुकसान होण्याची शक्यता असते. चर्चेने या गोष्टी सुटू शकतील.
– पुष्पा भावे, 022-24141136
About Post Author
दिनकर गांगल हे ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ या वेबपोर्टलचे मुख्य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्यांनी पुण्यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्यांनी आकारलेली ‘म.टा.’ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्यांना ‘फीचर रायटिंग’ या संबंधात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय (थॉम्सन फाउंडेशन) पाठ्यवृत्ती मिळाली आहे. त्याआधारे त्यांनी देश विदेशात प्रवास केला.
गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्यासारख्या व्यक्तींच्या साथीने ‘ग्रंथाली’ची स्थापना केली. ती पुढे महाराष्ट्रातील वाचक चळवळ म्हणून फोफावली. त्यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी ‘ग्रंथाली’च्या ‘रुची’ मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत ‘ग्रंथाली’ची चारशे पुस्तके त्यांनी संपादित केली. त्यांनी संपादित केलेल्या मासिके-साप्ताहिके यांमध्ये ‘एस.टी. समाचार’चा आवर्जून उल्लेख करावा लागेल. गांगल ‘ग्रंथाली’प्रमाणे ‘प्रभात चित्र मंडळा’चे संस्थापक सदस्य आहेत.
साहित्य, संस्कृती, समाज आणि माध्यमे हे त्यांचे आवडीचे विषय आहेत. त्यांनी त्यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि ‘स्क्रीन इज द वर्ल्ड’ अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्यांना महाराष्ट्र सरकारचा ‘सर्वोत्कृष्ट वाङ्मयनिर्मिती’चा पुरस्कार, ‘मुंबई मराठी साहित्य संघ’ व ‘मराठा साहित्य परिषद’ यांचे संपादनाचे पुरस्कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल ‘यशवंतराव चव्हाण’ पुरस्कार लाभले आहेत.