Home वैभव ग्रामदेवता म्हैसगावचे मल्लिकार्जुन मंदिर

म्हैसगावचे मल्लिकार्जुन मंदिर

1

सोलापूरच्‍या माढा तालुक्‍यातील म्‍हैसगावात मल्लिकार्जुनाचे मंदिर आहे. ते अंदाजे दोन हजार वर्षे जुने आहे. त्याचे बांधकाम संपूर्ण दगडी आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात पोचण्यासाठी दोन-तीन पायऱ्या उतरून जावे लागते. तेथे पूर्ण अंधार आहे – टॉर्च घेतल्याशिवाय जाता येत नाही, गाभाऱ्यात भलेमोठे दगडी शिवलिंग आहे.

मंदिराची देखभाल, पूजा ‘वास्ते’ या परिवारातील लोक करतात. मंदिराशेजारी असलेल्या एका घरात वास्ते परिवारातील लोक राहतात. त्यास मठ असे म्हणतात, सध्या तेथे सुशिला मच्छिंद्र वास्ते या एकट्याच राहतात (सिनियर सिटिझन). त्यांची ही तेविसावी पिढी आहे.

हा मल्लिकार्जुन मठ आहे. तेथेही मल्लिकार्जुन यांचा पितळी मुखवटा, एका गाभाऱ्याप्रमाणेच जागेत ठेवलेला आहे. गाभाऱ्याबाहेर/ खोलीबाहेर कुंड आहे. त्या कुंडात दर पौर्णिमेला होम करतात.

मल्लिकार्जुन मुखवट्याची पालखी वर्षातून तीन वेळा निघते. एक महाशिवरात्रीला, दुसरी कार्तिकी द्वादशीला व तिसरी दसऱ्याला.

त्याच मठात आत्मचैतन्य महाराजांचा फोटो आहे. त्यांचे चार वर्षांपूर्वी निधन झाले. आत्मचैतन्य महाराज असताना, सुशिलाबाईंच्या नातवाला त्या गादीवर बसवले गेले. तेव्हा तो दोन वर्षांचा होता. त्याचे नाव ह.भ.प. श्रावणमहाराज असे आहे. तो सहावीत शिकत आहे. आळंदी येथे आत्मचैतन्य महाराजांचा म्हणून गुरुपौर्णिमा उत्सव साजरा केला जातो. तीन दिवस त्यानिमित्ताने कीर्तन, प्रवचन असे कार्यक्रम असतात. त्यासाठी मठाबाहेरील मोकळ्या जागेत मंडप घातला जातो.

मठाबाहेर मोकळी जागा आहे. तेथे पूर्वीच्या महाराजांच्या समाधी आहेत. एक विहीरही आहे. त्या पाण्याचा वापर सुशिलाताई त्यांच्या शेतीसाठी व घरगुती वापरासाठी करतात. शेती मठाबाहेरील मोकळ्या जागेत आहे.

गावातील राजेंद्र कुंभार (मोबाईल 9921659533) यांचा मुलगा रामहरी कुंभार फ्रान्सला पीएच.डी करत आहे. तो कॅन्सरवर संशोधन करत आहे. त्याचे पाचवीपर्यंत शिक्षण म्हैसगावच्या शाळेत झाले. पुढे, पोखरापूरला-नवोद्याला बारावीपर्यंत, सोलापूरला ‘लोकमंगल’ येथे ग्रॅज्युएशन तर इंग्लंडला एम.एससी. झाले आहे.

म्हैसगाव हे आठ ते नऊ हजार लोकवस्ती असलेले गाव आहे. शेती हा लोकांचा व्यवसाय मुख्‍य व्‍यवसाय असून गावात ज्वारी व ऊस पिकवला जातो.

– पद्मा कऱ्हाडे/संदीप येरवडे

About Post Author

1 COMMENT

  1. I have very proud that this
    I have very proud that this village is my native and birthplace

Comments are closed.

Exit mobile version