माहिती अधिकाराचे ग्रंथालय!

0
30

महापालिकेच्या तळमजल्यावर ग्रंथालयासाठी जागा निश्चित करण्यात आली असून तेथे माहिती अधिकारासंदर्भात असलेली सर्व पुस्तके उपलब्ध होणार…


ठाणे महापालिकेत माहिती अधिकाराचे ग्रंथालय!

माहिती अधिकार काय असतो, त्याचा फायदा काय, त्याचा उपयोग कसा करता येऊ शकतो या विषयीची सविस्तर माहिती मिळण्यासाठी ठाणे महापालिकेने माहिती अधिकाराचे ग्रंथालय सुरू करण्याचे ठरवले आहे. नव्या वर्षाच्या आरंभी ठाणेकरांना ही भेट द्यावी या बेताने कार्यक्रम आखला गेला आहे.

याबाबत ठाण्यातील दक्ष नागरिक मिलिंद गायकवाड यांनी ठाणे महापालिकेकडे पाठपुरावा केला होता.
ठाणे महापालिकेत प्रत्येक विभागात महिन्याकाठी दोनशेपेक्षा अधिक माहिती अधिकाराखाली उत्तरे मागवण्यात आलेली असतात.

महापालिकेच्या तळमजल्यावर ग्रंथालयासाठी जागा निश्चित करण्यात आली असून तेथे माहिती अधिकारासंदर्भात असलेली सर्व पुस्तके उपलब्ध होणार असल्याची माहिती महापालिकेचे माहिती जनसंपर्क अधिकारी संदीप माळवी यांनी दिली. तसेच बीपीएमसी अ‍ॅक्टसंदर्भातील पुस्तकेही उपलब्ध होणार आहेत. तेथे माहिती अधिकाराची प्रकरणेही ठाणेकर नागरिकांना अभ्यासासाठी उपलब्ध होणार आहेत. याशिवाय महासभा, स्थायी समिती यांच्या बैठकांसंदर्भातील गोषवारेही नागरिकांना वाचनासाठी उपलब्ध करून दिले जाणार आहेत. महापालिकेचा आर्थिक अहवाल पाहण्याची संधी ठाणेकरांना तेथे मिळणार असून महापालिका ऑडिटच्या प्रतीदेखील पाहावयास मिळतील. महानगरपालिकेच्या कारभाराची दैनंदिन पुस्तिकाही वाचण्यासाठी उपलब्ध करून दिली जाणार आहे. नागरिकांसाठी हे ग्रंथालय कार्यालयीन वेळेत विनामूल्य सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.

– प्रतिनिधी

About Post Author

Previous articleगोहराबाई कर्नाटकी –शताब्दी आली तरी उपेक्षाच!
Next articleमहालक्ष्मी, कोल्हापूरची
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.