
सिद्धार्थ मुखर्जी यांना पुलित्झर पुरस्कार मिळणे, ही फार चांगली बाब आहे. भारतामध्ये वेगवेगळ्या विषयात तज्ञ असलेल्या अनेक व्यक्ती आहेत आणि त्यांनाही अशा त-हेचे सन्मान मिळणे गरजेचे आहे. मात्र अशा व्यक्तींची योग्य दखल माध्यमांकडून घेतली जात नाही. काही काळापूर्वी पुण़्यातल्या आयुकामधील एका शास्त्रज्ञास ग्रॅव्हीटीवर काम केल्याबद्दल आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता, मात्र भारतातील प्रसिद्धीमाध्यमांमध्ये त्याला प्रसिद्धी मिळाली नाही. जयंत नारळीकरांपासून सिद्धार्थ मुखर्जी यांच्या दरम्यान भारतात अनेक बुद्धीमान व्यक्ती होवून गेल्या, मात्र त्यांची नावे प्रकाशात आलेली दिसत नाहीत. लहानपणी मला साहित्यीक व्हावेसे वाटायचे, कारण त्या वेळी साहित्यीकांना माध्यमांमध्ये बरीच प्रसिद्धी मिळायची. जर मी आज जन्माला आलो असतो, तर मला गुंड व्हावेसे वाटले असते. नेहमीच गुन्हेगारीच्या आणि नकारात्मकतेच्या बातम्या देण्यापेक्षा माध्यमांकडून यांसारख्या सकारात्मकतेलाही वाव देणे गरजेचे आहे.
शिरीष देशपांडे
S. N. D. T. विद्यापिठ,
पदव्युत्तर मराठी विभागप्रमुख.
दिनांक – 20/04/2011
{jcomments on}


