राजवाडे यांनी ‘भाषांतर’ मासिकाचा पहिला अंक जानेवारी १८९४ मध्ये प्रसिद्ध केला. राष्ट्राचा स्वाभिमान वाढीस लावण्यासाठी व जगातील निरनिराळे विचारप्रवाह देशबांधवांना सांगण्याच्या हेतूने उत्तमोत्तम, विचारप्रवर्तक ग्रंथांची भाषांतरे लोकांना देणे आवश्यक होते. पश्चिमेकडे जे निरनिराळ्या शास्त्रांतील अगाध ज्ञान निर्माण होत होते तशा तऱ्हेचे स्वतंत्र ज्ञानभांडार निर्माण करण्याची कुवत तूर्त मराठीत नाही म्हणून तेच आपण मराठी भाषेत आणण्याचा प्रयत्न करावा या हेतूने भाषांतर हे मासिक राजवाडे यांनी सुरू केले. ते सदतीस महिने चालवले. त्यात पंधरा पूर्ण व सात अपूर्ण अशा बावीस ग्रंथांची भाषांतरे प्रसिद्ध झाली. प्लेटोच्या ‘रिपब्लिक’ या ग्रंथाचा अनुवादही त्या मासिकातूनच प्रसिद्ध झाला. राजवाडे यांनी तो कॉलेजात असतानाच अनुवादित केला होता. भाषांतर हे मासिक पुण्यातील प्लेगच्या संकटाने बंद पडले.
– नितेश शिंदे
(हा ‘भाषांतर मासिक’वरील लेख नाही. ती ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ने घेतलेली नोंद आहे. वाचकांकडे ‘भाषांतर मासिका’वर लेख असल्यास तो ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’कडे जरूर पाठवावा. थिंक महाराष्ट्र अधिक माहितीसह लेख लवकरच प्रसिद्ध करेल.)