भारत-पाकिस्तान Dialogue चालू असला पाहिजे!

1
27
कुमार केतकर
कुमार केतकर

कुमार केतकरकुमार केतकर यांची शनिवारी, १९ जानेवारी २०१३ रोजी संध्याकाळी साडेआठ वाजता टी.व्ही.वर ओझरती दोन वाक्ये ऐकली.
अमेरिका व चीन यांच्यात dialogue चालू असतो आणि आहे. अमेरिका आणि सोविएत युनियन यांच्यात तिसरे महायुद्ध व्हायची वेळ आली होती. पण, त्यांचाही dialogue चालू असे आणि अजून रशियाशी चालतो. युरोपमधल्या देशांनी दोन महायुद्धांत प्रचंड नरसंहार केला. पण, त्यांनीही युरोपियन युनियन बनवले आहे. त्यापासून बोध घेऊन भारत आणि पाकिस्तान यांनीही dialogue चालू ठेवावा, अशा आशयाचे काही कुमार केतकर सांगत होते.

(मी कुमार केतकर यांचे काही लेखन वाचले आहे आणि त्यांना टी.व्ही.वर बोलतानाही ऐकले आहे. पण, त्यांना मराठीत बोलताना प्रथमच ऐकले. ते फार impressive वाटले. इंग्रजीत त्यांचे बोलणे तितके impressive होत नाही आणि हिंदीमध्ये सर्वांत कमी impressive होते. मराठी लोकांचा दिल्ली दरबारी रोब कमी असतो याचे एक कारण म्हणजे, आमची हुशार आणि कर्तबगार माणसे इंग्रजी आणि हिंदीत बोलण्यात कमी प्रभावी असतात. दुसरे कारण म्हणजे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळेपासून दिल्ली दरबारी एक तर जाऊच नये, किंवा गेल्यास defiant attitude ठेवून जावे, अशी मराठी माणसाची बाणेदार सुप्त धारणा आहे, असो!)

केतकरांनी ज्यांचे dialogue चालू आहेत असे सांगितले, त्यापैकी चीन, रशिया आणि अमेरिका यांचे राजनैतिक संबंध व्यवस्थित नसले तरी त्यांच्यामध्ये वैमनस्य नव्हते. युरोपमधल्या लोकांना एकतर युद्धाचा उबग आला आहे किंवा त्यांचे गैरसमज दूर झालेले आहेत.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात पुष्कळांची वृत्ती अजूनही ‘युद्धस्य कथा रम्य’ अशी आहे. महायुद्धाची झळ या देशांना तितकी लागली नव्हती.

दुसरा प्रश्न आहे गैरसमजाचा! प्रथम भारताकडे पाहू. पाकिस्तानचे मुद्दे समजून घ्यावे ही जागृती भारतीय जनमानसात अजून झालेली नाही. असे करणे म्हणजे देशद्रोह अशी भारतीयांची कल्पना असावी. पाकिस्तानचे म्हणणे भारतातील कोणत्याही वृत्तपत्रात किंवा वृत्तवाहिनीवर खुलासेवार येत नाही. आलेच तर ते सर्वजण हसण्यावारी नेतात. पाकिस्तानचे म्हणणे ऐकून घेणे हे भारतीयांना महत्त्वाचे वाटत नाही. याबाबत भाजपा आणि कॉंग्रेस सारखेच वागतात. प्रत्यक्षात पाकिस्तान आणि मुसलमानांचा द्वेष करणारे भारतीय अल्पसंख्येत आहेत. महाराष्ट्र, गुजरात, यूपी आणि पंजाबमधील उच्च जातीचे लोक सोडल्यास  इतर ओबीसी आणि राखीव जाती व जमाती यांच्या मनात पाकिस्तान आणि मुसलमानांबद्दल फारसा द्वेष दिसून येत नाही. दक्षिण भारतातही द्वेषाचे प्रमाण कमी आहे. तरीही पाकिस्तानची बाजू समजून घेणे टाळले जाते; कारण तो देशद्रोह असल्याची आपल्या मनातील समजूत.

पाकिस्तानी जनतेची अशी समजूत आहे की, भारताने लुच्चेपणाने आणि जबरदस्तीने काश्मीर बळकावले आहे. भारताची काश्मीरविषयक भूमिका योग्य आहे. पण, ती भूमिका पाकिस्तानी जनतेला स्पष्टपणे सांगण्यात आलेली नाही. ‘हसके लिया पाकिस्तान, लडके लेंगे हिंदुस्तान’ असे मानणारे पाकिस्तानी अधिक सापडतील. ‘हे स्वप्नरंजन सोडा’ असे पाकिस्तानी लोकांना अजून कोणी सांगितले नाही. हिंदू लोक कावेबाज पण घाबरट आहेत, अशीही समजूत पाकिस्तानमध्ये आहे. त्यामुळे भारत आर्थिक सहकार, व्यापारी सहकार, कला सहकार, खेळ-चित्रपट-साहित्यिक क्षेत्र सहकार इत्यादी सकारात्मक पावले केवळ काश्मीर प्रश्न नजरेआड करण्याच्या लबाड वृत्तीने टाकतो असे पाकिस्तानच्या लोकांना वाटत राहते आणि पुष्कळ भारतीयांना आपला देश पाकिस्तानशी मैत्री करण्याचा प्रयत्न करतो हे पुचाटपणाचे आणि वेडगळपणाचे वाटते. भारत सांस्कृतिकदृष्ट्या पाकिस्तानचा मित्र आहे. त्यामुळे केतकरांचे ‘dialogue चालूच असला पाहिजे’ हे म्हणणे अगदी बरोबर आहे. People to people contact पण वाढतच असायला पाहिजे.

– वसंत केळकर
भ्रमणध्वनी – ९९६९५३३१४६
ई-मेल:  vasantkelkar@hotmail.com

About Post Author

Previous articleसाडेसात लाख पाने तय्यार!
Next articleगाणारे घर!
Member for 11 years 11 months वसंत केळकर नागपूरचे आहेत. त्यांचे शालेय शिक्षण पटवर्धन हायस्कूल मध्ये झाले. विज्ञान महाविद्यालय नागपूर येथून ते फिजिक्स या विषयात एम एससी झाले. भारतीय डाक सेवा या शासकीय सेवेत ते १९६६ ते २००१ पर्यंत होते. बंगलोर येथून मुख्य पोस्टमास्तर जनरल या पदावरून २००१ साली ते सेवानिवृत्त झाले. आवड म्हणून जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालय दिल्ली येथे फ्रेंच आणि इतिहास या विषयांचा अभ्यास करीत आहेत. लेखकाचा दूरध्वनी 9969533146

1 COMMENT

  1. Dialogue with whom ? Pakistan
    Dialogue with whom ? Pakistan has many power centres viz. elected government, pakistani army, i.s.i.,now emerging talibani groups etc. With whom should the Indian govt. have dialogue ? Who from Pakistan side can say that he/she really represents the country and his/her commitments and promises will be valid and adhered to. Regarding people to people contact Pakistan does not have a monolithic society just like the divided Indian people. And hatred for India must be equal to the hatred Indians have for Pakistanis. So really speaking the dialogue will only be for those who wish to have tours with Govt. expenses, or enjoy hospitality free of charge. Pakistan-friedship tours are not restricted to Pakistan or India. If you are placed in a proper group you can even travel to Europe and U.S.A. just the way ex TOI editor Padgaonkar did.

Comments are closed.