मुंबई शहर सखल भागात नैसर्गिक भौगोलिक रचनेमुळे असल्याने काही भागात अतिवृष्टीमुळे पाणी तुंबते. मुंबईत पाणी तुंबण्यामागील ‘भांगी भरती’ या नव्या कारणाची भर पडली आहे. समुद्रात भरती आणि ओहोटीमध्ये लाटांची उंची दोन मीटरपेक्षा कमी असते तेव्हा ‘भांगी’ भरतीची स्थिती निर्माण होते. ‘भांगी भरती’ हा शब्द पारंपरिक आहे. महिन्यातून एकदा तशी भरती येते. भांग खाल्ल्यानंतर ज्याप्रमाणे झिंग येते, तशी झिंग भरतीच्या पाण्याला येते. मोठ्या भरतीच्या वेळेस लाटा जलदगतीने फुटतात तशा ‘भांगी भरती’त फुटत नाहीत. लाटा खूप वेळ तरंगत राहतात. ती भरती कितीही वेळ राहते. त्यामुळे बाहेरून आलेले पाणी समुद्र आत घेत नाही. अशा वेळी मुसळधार पाऊस पडला तर जिकडे तिकडे पाणी तुंबणे अपरिहार्य आहे. हा शब्द कोळी समाजात प्रचलित आहे.
– सुभाष कुळकर्णी, 9820570294
(साहित्य मंदिर – ऑगस्ट 2018 संपादकीयामधून)