बेजबाबदारीचा वारसा! – डॉ. श्रीकांत प्रधान.
महाराष्ट्रातील अनेक प्राचीन ऐतिहासिक स्थळे पुरातत्त्व विभागाच्या संरक्षणाखाली आहेत. त्यांची देखभाल, संरक्षण, जतन केले जाते ते या विभागामार्फत! पण अशी काही स्थळे एकाकी ठिकाणी व दूरच्या भागात असतात. तरीही ती ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाची असतात. पण अनेक पर्यटक तेथे जाऊन त्यांची नावे तेथे लिहून, कोरून, तेथील प्राचीन चित्रांवर रंग लावून व तेथील मूर्ती पळवून त्यांचा बेजबाबदारपणा दाखवत असतात. याबद्दल लोकांत जागरूकता आणली पाहिजे. त्या विषयाबाबत एका कला इतिहासतज्ज्ञाचे विचार.
(महाराष्ट्र टाइम्स विशेष पुरवणी ११ मे २०१४)