भारताने क्रिकेट संघाने विश्वचषकावर आपले नाव कोरले, मात्र ख-या विश्वचष्काला स्पर्श करण्याचे त्यांचे स्वप्न अखेर स्वप्नच राहिले. भारतीय खेळाडूंना त्यावेळी देण्यात आलेला विश्वचषक खोटा असल्याचे निष्पन्न ….
भारताने क्रिकेट संघाने विश्वचषकावर आपले नाव कोरले, मात्र ख-या विश्वचष्काला स्पर्श करण्याचे त्यांचे स्वप्न अखेर स्वप्नच राहिले. भारतीय खेळाडूंना त्यावेळी देण्यात आलेला विश्वचषक खोटा असल्याचे निष्पन्न झाले आणि बीसीसीआयचा खोटेपणा जगासमोर आला. तुम्ही विश्वचषक खरा देता का खोटा हा खरा प्रश्न नसून, तुम्ही सर्वांशी खोटे बोललात हा मुख्य मुद्दा आहे. तुम्ही खेळाडूंना फसवता. तुम्ही भारत सरकारला फसवता. तुम्ही खोटं बोलता. याचा अर्थ तुम्ही बदमाश आहात.
लोकांशी खोटे बोलणार्या माणसांपेक्षा स्वत:शी बेइमान असलेली माणसे जास्त घातक असतात. ही बाब मॅच फिक्सिंगच्या गुन्ह्याएवढीच गंभीर आहे आणि यामागे असलेली माणसेही अपराधी आहे. विश्वचषक कस्टममध्ये अडकलेला असताना ती बाब सर्वांपासून लपवून ठेवून खेळाडूंच्या हाती खोटा विश्वचषक सोपवणे ही तर पराकोटीची फसवणूक झाली.
-शिरिष देशपांडे