बातमी ऑब्जेक्टीव्ह असावी

0
47

     लोकसत्तेचा अलिकडेच कायापालट झाला आहे. संपादकीय पानावर ‘अन्वयार्थ’ आणि ‘कुजबूज’ ही नवी सदरे सुरू करण्यात आली आहेत, मात्र बुधवार 6 एप्रिलच्या ‘कुजबूज’मध्ये कुजबूज अशी नाहीच. ‘कुजबूज’मध्ये गॉसिपींग अभिप्रेत आहे. त्याऐवजी त्यात निवडणूकीचे वार्तापत्र देण्यात आले आहे.

     मुख्य पानावरील अण्णा हजारेंच्या उपोषणाच्या बातमीत या उपोषणामागे संघाचा हात असावा, असे नमूद करण्यात आले आहे. बातमी ही ऑब्जेक्टीव्ह असावी. तिचा अकारण अन्वयार्थ काढला जाऊ नये. बातमीबद्दलच्‍या कॉमेन्‍ट इतर ठिकाणी नमूद केल्‍या जाव्‍यात. त्‍यामुळे ‘लोकसत्‍तेतील’ बातमी ही राजकीय हेतूने प्रेरीत होवून देण्‍यात आली असल्‍याचे जाणवते.

     या वर्तमानपत्राचे मुख्य पान असो वा संपादकीय, सगळ्याच ठिकाणी पानांचे स्वरूप गंभीर दिसते. त्यात हलकेफुलकेपणा येण्‍याची गरज भासते. ‘लंडन टाईम्स’सारख्या प्रसिध्द वर्तमानपत्रात संपादकीय पानावर डायरी नावाचे वेगळे सदर असते. असा प्रयत्न आपल्याकडे होण्यास हरकत नाही.

– अशोक जैन
पत्रकार – लेखक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here