बब्रूवान रुद्रकंठावार यांचे मूळ नाव धनंजय चिंचोलीकर. त्यांचे नाव मराठी साहित्यात गाजले; त्याचे कारण म्हणजे त्यांच्या लिखाणातील अस्सल मराठवाडी ग्रामीण भाषा. त्यांचे चिंचोली – लिंबाजी हे गाव. ते औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात आहे. ते राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर लिहिणारे लेखक आहेत. ते दैनिक तरुण भारत, देवगिरी (औरंगाबाद) येथे पत्रकार होते.
त्यांचा जन्म 11 जानेवारी 1965 रोजी करकंब (तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर) या त्यांच्या आजोळी झाला. त्यांनी बी ए आणि बी जे (पत्रकारिता) पर्यंत शिक्षण घेतले. ते त्रेपन्न वर्षाचे आहेत.
त्यांनी ‘पुन्यांदा चबढब’ हे कथासंग्रहाचे पहिले पुस्तक लिहिले. त्यानंतर त्यांनी ‘बर्ट्रांड रसेल वुईथ देशी फिलॉसॉफी’, ‘टर्ऱ्या, डिंग्या आणि गळे’, ‘आमादमी विदाऊट पार्टी’ ही पुस्तके आणि ‘चौथ्या इस्टेटच्या बैलाला’ हे नाटक लिहिले. ते नाटक औरंगाबादसकट पुणे-मुंबईत फार गाजले. त्यांच्या ‘आमादमी विदाऊट पार्टी’ या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारकडून पुरस्कार मिळाला. ‘पुन्यांदा चबढब’ या पुस्तकाला १९९८ सालचा राज्य सरकारचा उत्कृष्ट वाङ्मयनिर्मितीचा ‘दत्तू बांदेकर’ हा पुरस्कार मिळाला; तर, ‘टर्र्या, डिंग्या आन् गळे’ या पुस्तकाला बी. रघुनाथ पुरस्कार, नाशिकचा विमादी पटवर्धन पुरस्कार प्राप्त झाला..
हा ही लेख वाचा –
मराठवाडी बोली सिन्थेसाईज्ड वुईथ इंग्लिश… डेडली कॉकटेल!
त्यांचे नाव ‘न घेतलेल्या मुलाखती’ या पुस्तकामुळे कला, अभिनय, राजकीय क्षेत्रातही जाऊन पोचले. त्यांनी त्या पुस्तकात सतरा व्यक्तींच्या मुलाखती कल्पनेच्या जोरावर लिहिल्या आहेत. बाळासाहेब ठाकरे, नाना
ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार दत्ता भगत यांनी बब्रूवान यांच्या भाषेबद्दल मार्मिक विश्लेषण केले आहे. ते म्हणतात, ”मराठवाडी ही स्वतंत्र बोली आहे किंवा नाही याविषयी शंका असणाऱ्या मंडळींनी एक संशोधन सामग्री म्हणून बब्रूवान यांच्या लेखनाचा विचार करण्यास हरकत नाही. ज्यांना विनोद केवळ हसण्यावारी नेण्यासाठी नाही, तर तो वाचकाला अंतर्मुखही करत असतो असे वाटते, त्यांना बब्रूवान यांच्या या लेखनात बरेच काही गवसेल”.
धनंजय चिंचोलीकर 9850556169
c.dhanu66@gmail.com
-नेहा जाधव.