
जैतापूरचे आंदोलन पेटलेले असताना शिवसेना कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे कान्हा अभयारण्यात सफारीला गेले होते. यावर अनेक पक्ष आणि प्रसारमाध्यमांकडून टिकेची झोड उठवण्यात आली. याला उत्तर म्हणून, “जैतापूरचा पुळका लांबूनच पहातो आहे” असे उध्दव ठाकरेंनी केलेले विधान म्हणजे निलाजरपणाचा कळस आहे. आदोलन हिसंक वलणावर असताना अभयारण्यात मौज-मजा करण्यासाठी गेलेल्या उध्दव ठाकरेंनी या विधानात ‘आपण कुठे होतो?’ याचा उल्लेखच केलेला नाही. त्यांनी जनतेला एवढे मुर्ख समजू नये.
दिनांक 21 एप्रिल 2011 च्या लोकसत्तेत ‘शहाणपणाचा अभाव’ या शिर्षकाखाली अप्रतिम आणि समतोल अग्रलेख प्रसिध्द झाला आहे. शिवसेनेने जैतापूर अणुउर्जा प्रकल्पाला असलेला आपला विरोध अद्याप स्पष्ट केलेला नाही. राज्याला वीजेची गरज असतानाही या प्रकल्पाला विरोध करणार्या उध्दव ठाकरेंकडे एखादा वेगळा पर्याय आहे का? अशी कोपरखळीही मारण्यात आली आहे.
– अशोक जैन
पत्रकार – लेखक
दिनांक – 21/04/2011
{jcomments on}


