– डॉ. द. बा. देवल
पुणे हायवे हा रस्ता मुंबईतून बाहेर जाण्याचा मार्ग. साहजिकच तेथे गाड्यांची संख्या जास्त असते. त्या ठिकाणी ट्रॅफिक तास-दीड तासांपर्यंत खोळंबून राहिला, तर एकाच वेळी किती गाड्यांचे किती डिझेल नाहक जळत असेल! वाया जाणा-या या डिझेलमध्ये कितीतरी गाड्या अनेक किलोमीटरचा प्रवास करू शकतील! त्यात भर म्हणजे वर्तमानपत्रातील ताजी बातमी. ‘महामुंबईत धावणार 55 हजार नव्या टॅक्सी रिक्षा’
– डॉ. द. बा. देवल
माझा नेहमीचा प्रवास अलिबाग ते मुंबई किंवा मुंबई ते नाशिक या रस्त्यावर असतो. त्यात भल्या पहाटेची वेळ सोडली तर दादरपासून चेंबूर क्रॉस करेपर्यंत तास-दीड तास सहज लागतो. एकदा अलिबागवरून मुंबईस येताना बराच ट्रॅफिक लागला. माझ्या गाडीशेजारी सोळा चाके असलेला अवाढव्य मालवाहू ट्रॅक उभा होता. मी कुतूहल म्हणून ट्रॅकचालकाला विचारले, ‘‘तुझा हा रणगाडा किती अॅव्हरेज देतो?’’ त्याने उत्तर दिले, ‘‘दीड ते दोन लिटरमध्ये एक किलोमीटर!’’ मी स्तंभित झालो!
पुणे हायवे हा रस्ता मुंबईतून बाहेर जाण्याचा मार्ग. साहजिकच तेथे गाड्यांची संख्या जास्त असते. त्या ठिकाणी ट्रॅफिक तास-दीड तासांपर्यंत खोळंबून राहिला, तर एकाच वेळी किती गाड्यांचे किती डिझेल नाहक जळत असेल! वाया जाणा-या या डिझेलमध्ये कितीतरी गाड्या अनेक किलोमीटरचा प्रवास करू शकतील! त्यात भर म्हणजे वर्तमानपत्रातील ताजी बातमी. ‘महामुंबईत धावणार 55 हजार नव्या टॅक्सी रिक्षा’. शहरातले रस्ते आहेत तेवढेच आहेत. मात्र त्यावर दरवर्षी नवनवीन गाड्यांची भर पडत असते. हे सगळे लोकसंख्येच्या वाढीप्रमाणे घडताना दिसते. मर्यादित शेते आणि दरवर्षी खाणार्या तोंडांमध्ये होणारी बेसुमार वाढ. शेतक-याने पिकवायचे तरी किती? तसेच जर वाढत्या वाहनांच्या वाढत्या संख्येने ट्रॅफिक वाढू लागला तर रस्त्यांना ते ओझे कसे पेलणार? पेडर रोडसारख्या अनेक ठिकाणांवरील सकाळ-सायंकाळची परिस्थिती पाहिली तर दररोज शहरात किती डिझेल वाया जात असेल याचा अंदाज येऊ शकेल. जेव्हा शहरात उड्डाणपूल बांधण्यात आले, तेव्हा असे वाटले, की वाहतुकीचा प्रश्न संपला. मात्र वाहनांची सातत्याने वाढणारी संख्या पाहिली तर पुलांवर आणखी पूल बांधले तरी हा प्रश्न सुटणार नाही!
पब्लिक ट्रान्सपोर्टचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला तर कदाचित या प्रश्नावर उतारा मिळू शकेल.
डॉ. द. बा. देवल, भ्रमणध्वनी – 9167668188
मु पो. किहीम-जिराड, ता. अलिबाग, जि. रायगड,
संबंधित लेख
फ्लायओव्हरवर बसची संख्या वाढणे गरजेचे
वाहतूकवेडा