‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ ही साइट नवीन रूपात

0
117

‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ ही साइट नवीन रूपात सादर करू इच्छितो. साइटचे दोन भाग आहेत. त्यातील ‘दैनिक मल्लिनाथी’चा भाग रोज अपलोड होईल. दुसरा भाग आहे तो ‘चित्र महाराष्ट्राचे’चा. त्यात मराठी कर्तृत्व, संस्कृतिसंचित अशा अंगांनी, पूर्ण राज्याचे चित्र जिल्हावार रचनेतून बांधायचे आहे. त्यासाठी तालुकावार माहिती संकलन योजले आहे. तालुका समन्वयक होण्याची वाचकांची इच्छा असल्यास त्यांनी जरूर लिहावे – info@thinkmaharashtra.com

साइटचे नवे रूप साकार करत असताना जुन्या रुपातील सर्व मजकूर एका वेळी अपलोड करणे शक्य झालेले नाही. त्यामुळे वाचकांची गैरसोय होईल, त्याबद्दल क्षमस्व. हा सर्व मजकूर महिनाभरात अपलोड होईल. दरम्यान, कोणा वाचकाला विशिष्ट लेख संदर्भासाठी हवा असेल व त्याने तसे कळवले तर विशिष्ट लेख त्याच्याकडे इमेल करता येऊ शकेल.

सहकार्याच्या अपेक्षेत.

दिनकर गांगल मुख्य संपादक,
थिंक महाराष्ट्र डॉट कॉम

About Post Author

Previous articleनितीन देसाईंनी सेट उभारावे!
Next articleसंजय गुरव – कात्रणांच्‍या छंदातून शेतीपर्यंतचा प्रवास
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.