झूस

0
96

झूस या शब्दाचे रोमन लिपीतले ट्रान्सलिटरेशन Zeus असे आहे. त्यातले शेवटचे S हे अक्षर आदरार्थी आहे. मराठीमधे जसे आपण राव किंवा पंत लिहितो, त्याप्रमाणे सर्व ग्रीक नावांच्या पुढे S हे अक्षर लावले जाते. तेव्हा त्यातला मूळ शब्द Zeu एवढाच आहे. प्राचीन ग्रीक भाषेमधे Z या अक्षराचा उच्चार काही वेळा ‘झ’ च्या ऐवजी ‘त्स’ असा केला जात असे. थोडक्यात या नावाचा उच्चार ‘झिउ’ अथवा ‘त्सिउ’ असा होतो. माझ्या मते, तो शिव या वैदिक संस्कृत शब्दाचा अपभ्रंश असू शकतो.

सेमोनायडीस नावाच्‍या प्राचीन ग्रीक कवीच्‍या अडीच हजार वर्षांपूर्वीच्‍या एका कवितेचे भगवदगीतेशी असलेले साम्य आश्चर्यकारक आहे. तिचे भाषांतर लिहिताना माझ्या मनात मराठी भावगीतातली ओळ तरळत होती –‘अशी पाखरे येती, आणिक स्मृती ठेवुनी जाती, दोन दिसांची रंगत संगत, दोन दिसांची नाती.’

अनिल भाटे यांनी सेमोनायडीस यांच्‍या कवितेचे केलेले भाषांतर येथे वाचा.

अनिलकुमार भाटे
एडिसन शहर, न्यू जर्सी राज्य, अमेरिका
anilbhate1@hotmail.com

About Post Author