जैतापूर आंदोलनात शिवसेनेने पूर्ण ताकदीनिशी उतरण्याचा निर्णय घेतल्यानंतर या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. या घटनेची जबाबदारी शासनाची की शिवसेनेची? आधी हात उगारतो कोण आणि हिंसक होण्यास प्रवृत्त करतो कोण, याचाही याबाबतीत विचार व्हायला हवा
अण्णा हजारे यांनी उपोषणाद्वारे लोकपाल विधेयकाचा मुद्दा जनतेच्या नजरेत आणला. आता जनतेचे लक्ष या विधेयकाच्या मुद्द्यावरून विचलित व्हावे, यासाठी राजकारण्यांकडून बनावट सी.डी. वगैरे प्रकरणांना महत्त्व दिले जात आहे. त्यांचे हेतू उघड असून या विधेयकाच्या मार्गात जास्तीत जास्त अडथळे निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
सरकारने पाण्याचा प्राधान्यक्रम बदलला. आता उद्योगधंद्यांना पाणी पुरवल्यानंतर उर्वरीत पाणी शेतीला दिले जाणार. देशाला जशी वीजेची गरज आहे, तशीच अन्नधान्याने देशाला समृध्द करण्याचीही गरज आहे. आजही असंख्य लोकांचे रोजगार शेतीशी निगडीत आहे. त्यामुळे पाण्याच्या प्राधान्यक्रमात शेतीला महत्त्व देणे गरजेचे आहे.
– विजया चौहान
शिक्षण हक्क समन्वय समिती आणि मराठी अभ्यास केंद्र.
दिनांक – 19/04/2011