किरण भावसार हे वडांगळी, तालुका सिन्नर (नाशिक) येथील रहिवासी आहेत. ते कवी-ललित लेखक आहेत. त्यांचे ‘शनिखालची चिंच’ नावाचे पुस्तक ई-साहित्य प्रतिष्ठानने प्रकाशित केले. त्यात त्याच नावाच्या ललित लेखाने चमत्कार घडवून आणला. ते इंग्लंडमधील सुधीर बर्वे यांनी वाचले. त्या लेखाने बर्वे प्रभावित झाले. त्यांनी किरण भावसार यांना कळवले, की “तू लिहिलेल्या चिंचेच्या झाडाची पिल्ले जर ठिकठिकाणी लावलीस तर किती झाडे तयार होतील!” किरण यांनी मधुकर गीते या मित्राच्या मदतीने दीडशे झाडे लावता येतील अशी जागा शोधली. झाडे लावण्याच्या कामास पंचवीस हजार रुपये खर्च अपेक्षित होता. किरण यांनी तसा मेसेज सुधीर बर्वे यांना पाठवला. बर्वे यांनी उलट मेसेजने एकवीस हजार रुपये पाठवले. किरण यांनी त्यानुसार मेंढी गावात ‘जयहिंद विकास संस्थे’च्या जागेवर चिंचेची झाडे लावली. ही किमया एका ललित लेखाने घडून आली.
किरण भावसार 7757031933 kiranvbhavsar1972@gmail.com
–नितेश शिंदे 9323343406 info@thinkmaharashtra.com
—————————————————————————————