चंद्रपूरवर ठसा इतिहासाचा

2
116
carasole

अविभाज्य चांदा जिल्हा अखिल महाराष्ट्रात क्षेत्रफळदृष्ट्या अव्वलस्थानी होता. जिल्ह्यांच्या मध्यभागातून वाहणा-या वैनगंगा नदीला सीमारेषा ठरवून त्या जिल्ह्याचे विभाजन केले गेले. त्यातून वैनगंगेच्या पूर्वेकडील भाग गडचिरोली तर पश्चिमेकडील भाग चंद्रपूर म्हणून ओळखला जाऊ लागला.

‘कृतध्वज’’नामक राजाने ते नगर वसवल्याचा उल्लेख पुराणात आहे. कृतायुगात’ त्या नगरीला ‘लोकपूर’’ असे संबोधले जात असे. त्याकाळी त्या शहराचा विस्तार औरसचौरस होता.

द्वापारयुगात ‘चंद्र‘हास’’ राजाच्या आमदानीत. त्या शहराला ‘‘इंदुपूर’’ म्हणून ओळखले जाई. ‘इंदू’’ म्हणजे ‘चंद्र‘’ त्यामुळे ‘इंदुपूर’’चा उल्लेख चंद्रपूर असाही होत गेला. असे ब्रिटिशांनी चंद्रपूरचे नाव ‘‘चांदा’ सुटसुटीत केले. पण त्याच नावाची अन्य काही शहरे असल्याने नेमकेपण दर्शवण्यासाठी ‘चांदा’’चा उल्लेख ‘‘चांदागढ’’ अर्थात ‘चांदाफोर्ट’’ असा होऊ लागला.

‘विदर्भ साहित्य संघा’चे बारावे साहित्य संमेलन चंद्रपूर येथे 4 व 5 फेब्रुवारी १९५० रोजी भरले होते. त्या संमेलनाच्या खुल्या अधिवेशनात सर्वप्र‘थम पुनर्नामकरणाचा ठराव झाला. त्यानंतर तब्बल चौदा वर्षांनी, 1964 साली, ‘चांदा’’चे ‘चंद्रपूर’’ असे पुनर्नामकरण करण्यात आले!

चंद्रपूर जिल्हा विपुल वनसंपत्तीने डवरलेला, कोळसा आणि अन्य खनिजे पुरवणारा, उत्तम प्र‘तीचा तांदूळ पिकवणारा असा प्रदेश आहे. शहर समुद्र‘सपाटीपासून सातशे – एकतीस फूट उंचीवर, उत्तर अक्षांश 19.57 तर पूर्व रेखांश 79.17 वर वसले आहे.

भारत-चीन युद्धात (१९६२) देशाला सर्वाधिक सुवर्णदान केलेला तो जिल्हा होय. आसोला मेंढा, घोडाझरी, नलेश्वशरी तलावाचा फेरफटका मारावा, येथील घनदाट जंगले पाहावीत. मार्कंडा, चंद्रपूर, बल्लारपूर, चिमूर, नेरी या शहरातील विस्मयचकित करणारी शिल्पे पाहवीत आणि त्या शिल्पांतून जुन्या पराक्र‘माच्या कथांचे दर्शन घ्यावे असे आगळेवेगळे चंद्रपूर शहर नि चंद्रपूर जिल्हा.

शहराच्या उत्तरेस असलेले चंद्रपूर औष्णिक विद्युत केंद्र हे आशिया खंडातील तिस-या क्र‘मांकावरील विद्युतनिर्मिती केंद्र‘ असून भद्रावती येथील चांदा आयुध निर्माण केंद्रा‘चे स्थान देशाच्या संरक्षण कार्यात अनन्यसाधारण आहे.

चंद्र‘पुरात शहरासभोवती परकोट आहे. त्याचा पाया गोंड राजवंशातील दहावा परंतु चंद्रपूर येथे राज्य करणारा पहिला राजा खांडक्या बल्लाळशहा याने 1472 च्या सुमारास घातला व त्याची राजधानी बल्लारपूर येथून चंद‘पुरास हलवली. खांडक्याच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा हीरशहा याने बांधकाम सुरू केले. हीरशहाचा नातू कर्णशहा याच्या कारकिर्दीत तटाची उंची केवळ अर्ध्यावर बांधून झाली. कर्णशहाचा नातू धुंड्या रामशहा (1597 – 1622) याच्या कारकिर्दीत परकोटाचे काम पूर्ण झाले. याचा अर्थ खांडक्याच्या सहाव्या पिढीत ते काम पूर्ण झाले. सव्वा कोट रुपये खर्च झाला व कामास सव्वाशे वर्षांचा कालावधी लागला. तटाची उंची वीस फूट (सुमारे) असून परीघ साडेसात मैल आहे. परकोटाच्‍या सर्व दरवाजांमध्‍ये पठाणपुरा दरवाजा सर्वात देखणा आहे. इतिहासकाळात चंद्रपूरचा संपर्क मोगलाई व निजामशाहीशी अधिक येत असे. त्यामुळे वाहतुकीची मदार त्याच दरवाज्यावर होती. त्यामुळे चंद्रपूर शहराचे तेच प्र‘मुख द्वार होते.

बल्लारपूर चंद्रपूरपासून तेरा किलोमीटर अंतरावर दक्षिणेस आहे. ते खांडक्या बल्लाळ याचे मूळ राज्य. तो या गोंड वंशाचा. त्याचे सर्वांग खांडकांनी (फोड) व्यापले होते. खांडकांचे रूप काहीसे कुष्ठासारखे होते. खांडक्याची राणी सुंदर, सुलक्षणी व पतिपरायण होती. तिने पतीची काया पूर्ववत व्हावी म्हणून अनेक नवस-सायास केले, व‘तवैकल्ये केली पण गुण येईना. पुढे बल्लारपूर-चंद्रपूर यांच्या मध्यावर असलेल्या व वनश्रीने नटलेल्या जुनोना या गावाची, निवड राजाच्या हवापालट व विश्रांतीसाठी केली गेली. तेथे तलाव आधीचाच होता. राजाने त्याची दुरुस्ती करून जवळच बंगला बांधला. राजाराणी तेथे विश्रांतीसाठी जात.

चंद्रपूरच्या अचलेश्वर मंदिराची कथा खांडक्या बल्लाळ राजाच्या या रोगाशी जोडली गेली आहे. तो शिकारीस गेला असताना एका ठिकाणच्या पाण्याने त्याचा तो त्वचा रोग नाहीसा झाला.

‘अचलेश्वार’ दरवाज्यातून बाहेर पडताच डाव्या बाजूस शिवाचं तर नदी ओलांडून पुढे उजवीकडे शक्तीचे (महाकाली) मंदिर आहे. श्रीमाता महाकाली ही चंद्रपूरची नगरदेवता आहे.

खांडक्या ब‘ल्लाळानंतर राजा बीरशहाने महाकाली मंदिरासाठी बांधकाम सुरू केले. त्याच्या पश्चात राणी हिराईने ते पूर्णत्वास नेले. महाकाली मंदिराच्या तळघरात पाच फूट उंचीची देवीची मूर्ती आहे. मूर्तीच्या मागील बाजूस आणखी एक तळघर असून तेथे पलंग ठेवला आहे. मातेश्व्री तेथे विश्राम करते अशी भक्तांची धारणा आहे. गच्चीवर जाण्यासाठी बांधकामाच्या भिंतीमधूनच दोन चक्राकार जिने (पाय-या) आहेत.

मातेश्वरीला प्रत्येक मंगळवारी-शुक‘वारी आणि विशेष प्रसंगी व नवरात्रीत साजशृंगार चढवला जातो. चैत्रनवरात्रीत देवीचा गाभारा, मंदिर आणि परिसरात चैतन्य सळसळत असते. चैत्रपौर्णिमेस त्रिपूर चेतवला जातो. तेथे महिनाभर यात्रा चालते. पूर्वी मराठवाड्यातील नांदेड परिसरातून भाविक ‘पोहा’’ घेऊन दर्शनास येत. चार दिवस राहत व महापूजा बांधूनच परत जात असत.

महाकाली मंदिरात देवीपुढे गाभारा, त्यापुढे सभामंडप, स्तूप व यज्ञकुंड असून, पूर्वी तेथे पशुबळीही दिला जात असे. मंदिरासभोवती छोटासा परकोट असला तरी त्याचे पूर्ववैभव कालजमा झाले आहे. मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक स्त्री -पुरुष भक्ताला मातेपर्यंत जाता येऊन स्वहस्ते ओटी भरता येते व चरणस्पर्शही करता येतो!

अचलेश्वर मंदिराच्या बाहेर उजव्या हाताला, आतल्या बाजूस एका छोट्या परकोटात हडवाडा (बीरशहाची समाधी) हे ठिकाण आहे. तो भाग चंद्रपूर येथील पेंशनर राजे यादवराव यांच्या मालकीहक्कात अनेक वर्षं राहिला.

दारातून प्रवेश करताच एक समाधी टोलेजंग आहे. ती राजा बीरशहा (मृत्यू इस 1672) याची आहे. बीरशहाचा त्याच्या रजपूत अंगरक्षकांकडून खून झाला. समाधी त्याची राणी हिराइने बांधली. इमारत प्र‘माणबद्ध व सुदंर आहे. उत्कृष्ट शिल्पकलेचा नमुना म्हणून त्याकडे पाहिले जाते. त्याची संगमरवरी प्र‘तिकृती नागपूर येथील म्युझियममध्ये ठेवली आहे; इतकी सुंदर व टोलेजंग वास्तू नागपूर प्रदेशात तरी दुसरी नाही, म्हणून समाधीचे बांधकाम मोगल पद्धतीचे आहे. आत मध्यभागी थडग्याचा चबुतरा होता. तो कोणीतरी धनाभिलाषेने उद्ध्वस्त केलेला आहे!

बीरशहाचा उल्लेख फारसी इतिहासात आला आहे. औरंगजेब दक्षिणेचा सुभेदार असताना बीरशहाचे त्याच्याशी मैत्रीचे संबंध होते. औरंगजेबावर जटाशंकर हत्तीच्या प्र‘करणात तोहमत आली असताना बीरशहाने साक्ष देऊन औरंगजेबावर असलेला शहाजहाँनचा राग व संशय दूर केला होता. तेथे आणखी काही समाध्याही आहेत.

परकोटाच्या आत राजवाडा आहे. त्याचे बांधकाम काहीसे बालेकिल्ल्यासारखे आहे. राजवाडा जिल्हा कारागृहाच्या रूपात उभा आहे! चंद्रपूर ब्रि‘टिशांच्या ताब्यात गेल्यानंतर त्याचे रूपांतर ब्रि‘टिशांनी कारागृहात केले. वाड्यातील विहिरीचे पाणी पाचक असून, कारागृहात येणारा कैदी दोन-चार महिन्यांतच धष्टपुष्ट होऊन बाहेर पडतो!

विहीर वैशिष्ट्यपूर्ण चौकोनी रूपात असून तिची खोली भरपूर आहे. आत तीन मजले आहेत. विहिरीत उतरण्यास पाय-या आहेत. प्रत्येक मजल्यावर दालन आहे. विहिरीतून गुप्तमार्ग असल्याच्या खाणाखुणा स्पष्ट दिसून येतात. राजाला दगाफटका झाल्यास गुप्त मार्गानं तेथून पसार होण्यासाठीची ती योजना असावी.

विहिरीच्या मागे गैबीशाह नावाच्या पीर बाबांची समाधी आहे, तेथे दरवर्षी मोहरमला बाबांच्या दर्शनासाठी सवा-या आणल्या जातात. तेव्हा जनतेसाठी कारागृह दर्शनार्थ मोकळे ठेवले जाते. राजवाड्याची अंतर्गत भव्यता ‘त्यावेळी लक्षात येते.

गंगासिंग जाट याचे पूर्ववृत्त अज्ञात असल्याचे इतिहासकार सांगतात. नागपूरच्या गादीवर आप्पासाहेब भोसले विराजमान झाल्यावर त्याने त्याचा एक विश्वासू कारभारी गंगासिंग जाट यास चंद्रपूर येथे कि‘ल्लेदार नेमले. त्याचा व्याही गणेशराव जाट जटपुरा दरवाज्यावर पहारेदार होता. आप्पासाहेबाने तैनाती फैाजेचा तह मोडून बंडावा केला. तेव्हा त्यास व त्याचा मित्र द्वितीय बाजीराव पेशवे या दोघांना चंद्रपूरच्या किल्ल्यात आश्रय घेता येऊ नये म्हणून कॅप्टन स्कॉट याने किल्ल्यास वेढा दिला. माना टेकडीवरून तोफा डागताच परकोट ढासळला. इंग्रज लष्कर आत घुसले. मात्र त्या झटापटीत पठाणपुरा दरवाज्यावरील जामदार अलिखान पठाण याने तोफेच्या एका गोळ्याने मेजर कोरहॅमला ठार केले. नंतर मराठ्यांचा प्र‘तिकार मोडत इंग‘ज फौज आत घुसली. गंगासिंगाच्या कचेरीसमोर (सध्याचे शहर पोलिस ठाणे) हातघाईची लढाई होऊन गंगासिंग ठार झाला. त्याने प्रा‘ण सोडण्यापूर्वी अलिखानाचा गौरव करून, त्याने दाखवलेल्या बहाद्दुरीबद्दल त्यास बक्षीस दिले. अलिखान जिवंत होता. गंगासिंगाची समाधी जटपुरा दरवाज्याच्या बाहेर, महादेवसिंगजी ठाकूर (दीक्षित) यांच्या घरासमोर आहे. मात्र गोंडराजाच्या समाधीवर जशी छत्री (बांधकाम) आहे, तशी तेथे नाही. समाधी छोटी व साध्या रूपात आहे. समाधीच्या मागे महादेवाचे मंदिर आहे. देऊळ व समाधी गंगासिंगाची सून रत्नमालाबाई हिने बांधली. लढाईनंतर सर्व निरवानिरव झाल्यावर रत्नाबाईने समाधी बांधली असावी. पण देऊळ मात्र 1852 साली बांधले गेले आहे. महादेवाच्या देवळात दरवाज्याच्या दोन्ही बाजूंस भिंतीत कोरलेले दोन शिलालेख आहेत. त्यावरून ती माहिती मिळते.

राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मागील परिसरात मूर्तिसमूहास अप्रतिम कलाकृती आहेत. त्यावरून गोंडवनातील शिल्पकला किती प्र‘गत होती याची साक्ष पटते.

सर्वांत मोठी मूर्ती जमिनीवर सपशेल निद्रिस्त असलेली सव्वीस फूट लांब, अठरा फूट रुंद व तीन फूट जाड अशी आहे. तिला दहा तोंडे आहेत. त्यामुळे  रावण समजून पूर्वी दरवर्षी विजयादशमीला सीमो‘लंघन केले जाई. लोक त्या मूर्तीवर दगडफेक करत असत. त्यामुळे ती विद्रूपही झाली आहे. दशमुखी दुर्गा, महिषासुर मर्दिनी, मत्स्यावतार, कूर्मावतार, शिवलिंग, नंदी, हत्ती, गणेश, मारुती, कालभैरव, दोन नागिणींसह शेषशायी, चतुर्भुज शंकर, दिगंबर शिव, गरुड, द्वारपाल असा एकूण पंधरा मूर्तींचा समूह तेथे आहे.

येथील वर्धा नदीच्या तीरावरील किल्ला खांडक्या बल्लाळ राजाने बांधवला. त्यात तो राहत असे. ती वास्तू भग्नावस्थेत आहे. किल्ल्याच्या भिंतीवरून वर्धा नदीचे पात्र व क्षितिजापर्यंतची चौफेर पसरलेली भूमी अवलोकन करत असताना किल्ल्याकरता किती योग्य अशा जागेची निवड केली होती ते प्र‘त्ययास येते.

वरोरा येथील जगप्र‘सिद्ध ‘आनंदवन’ म्हणजे आधुनिक तीर्थक्षेत्रच! ते 1950 साली सुरू झाले. बाबा आमटे यांच्यापासून सुरू झालेले कुष्ठरोग्यांचे ते सेवाकेंद्र‘ आमटे परिवारातील तिस-या पिढीपर्यंत अव्याहत सुरू आहे. ‘‘आनंदवन’ ’ चंद्रपूर-नागपूर मार्गावर चंद्रपूरपासून पंचेचाळीस किलोमीटर अंतरावर तर सोमनाथ पन्नास किलोमीटर अंतरावर (मूल तालुक्यात) आहे.

मार्कण्डा नावाचे गाव चंद्रपूरपासून सत्तर किलोमीटरवर वैनगंगेकिनारी वसले आहे. तेथे वैनगंगा उत्तरवाहिनी आहे. मार्कण्डेय ऋषींचे हेमाडपंती मंदिर वैनगंगेच्या काठावर आहे. ते स्थान प्राचीन देवळांकरता प्र‘सिद्ध असून, परिसरात एकूण पंधरा देवळे आहेत. तेथील मुख्य मंदिर शिवाचे आहे. शिल्पकृतींवरून वाटते, की हे मंदिर दहाव्या किंवा अकराव्या शतकात बांधले गेले असावे. मु‘ख्य शिवमंदिरावर तडिताघात झाल्याने देवळाचा कळस कोलमडून सभामंडपावर पडला. सभामंडप बराचसा भग्न पावला आहे. राणी हिराईने तिच्या कारकिर्दीत तो पुन्हा बांधून, त्याचा जीर्णोद्धार केला. मंदिराबद्दल अनेक दंतकथा आहेत. वास्तुशिल्पअभ्यासक गो.बं. देगलूरकर यांचा अभ्यासपूर्ण ग्रं‘थ त्यावर प्रसिद्ध आहे. तीर्थक्षेत्र गडचिरोली जिल्ह्यात समाविष्ट झाले आहे.

भद्रावती हे गाव चंद्रपूरपासून साधारणत: अठ्ठावीस किलोमीटर अंतरावर, चंद्रपूर-नागपूर मार्गावर आहे. ती यौवनाश्व राजाची राजधानी. त्याचे अवशेष दृष्टोत्पत्तीस येतात, बौद्धकालीन युगात सांची-नालंदासारखी जी विद्यापीठे निर्माण झाली तसे तेथेही असावे. भद्रावतीजवळ विद्यासन नावाची टेकडी आहे. तेथील बुद्धांच्या मूर्ती व सभामंडप या गोष्टीही तशी साक्ष देतात.

तेथील श्री भद‘नागोबा मंदिर प्रसिद्ध आहे. लग्न, मुंज, जावळेफेड आदी धर्मप्र‘कार तेथे सदैव चालतात.

भद्रावतीचे आणखी एक आकर्षण म्हणजे श्री पार्श्वलनाथ मंदिर. ते तीर्थंकराचे स्थानक म्हणून देशभर वि‘ख्यात आहे. ‘चिमूरचा घोडा, चंद्रपूरचा वडा, चिमूरचा घोडा, ब‘ह्मपुरीचा जोडा, भद्रावतीचा सिंगाडा जगन्नाथाचा भात, जग पसारे हात!’

ही जुनी म्हण प्रचलित आहे. चिमूरचा घोडा की घोड्याचे चिमूर असा संभ‘म निर्माण व्हावा असे तेथील श्री बालाजीच्या मंदिराचे प्रवेशद्वार पाहिले असता वाटते. या ठिकाणी किल्ला असावा पण त्याची एकही भिंत तेथे शिल्लक नाही. उंचवटा मात्र आहे.

तीर्थस्थान म्हणून चिमूरची पूर्वी फार प्र‘सिद्धी होती. साडेतीनशे वर्षांपूर्वी श्री व्यंकटेश्वराची मूर्ती तेथील भिकू पाटील डाहुले घराण्याच्या गृहस्थाला, घरी गोठा बांधण्यासाठी पायवाट खोदताना सापडली. त्यावर साधे झोपडे उभारण्यात आले. मंदिराची रचना अवर्णनीय आहे. दर्शनी भागावरील महाद्वार, आत सभोवताली परकोट तर चार कोनांस चार बुरूज आणि ध्रुवता-याचे लक्ष वेधणारा सभामंडप पाहून मन सुखावते. परकोटास पूर्वेला व पश्चिमेला प्रवेशद्वार असून तेथेही बुरूज आहेत. सभामंडपातील लाकडी कोरीवकाम कलात्मक आहे. आतील गाभा-यातील पाषाणस्तंभांनी मंडित केलेला मंडप उत्कृष्ट स्थापत्यकलेचे दर्शन घडवतो.

जिल्ह्यातील चिमूर, भिसी व महादवाडी ह्या क्षेत्राच्या परिसरांत, मेडूर नदीच्या तीरावर वसलेल्या नेरी येथे तलावाच्या काठावर हेमाडपंती शिवमंदिर असून ते प्रेक्षणीय आहे. देवालयाचा घुमट कोरीव-रेखीव आहे. तलावाच्या पाय-या दगडांनी बांधल्या आहेत. मंदिराचा सभामंडप पाषाणाचा असून मूर्तीची घडण कौशल्यपूर्ण आहे. मंदिर परिसरात अनेक संत-महात्म्यांनी त्यांची साधनापूर्ती करून घेतल्याचा इतिहास आहे. कोलारीचे एकनाथ व कापसीचे नानाजी महाराज; तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ह्या सा-यांचे बालपण नेरीच्या परिसरात गेले. जवळच राष्ट्रसंताचे ‘तपोधाम’ गोंदोडा हे महत्त्वाचे ठिकाण आहे. गोंदोडा येथील गुंफेत बसून महाराजांनी परमात्मस्वरूपाची प्राप्ती करून घेतली.

चिमूर येथील हुतात्मा स्मारक त्याचे वेगळेपण अखिल भारतात राखून असून, तेथील घटना ऑगस्ट क्रांतीशी निगडीत आहे.

अब काहे को धूम मचाते हो?
दुखवाकर भारत सारे!
आते है नाथ हमारे!
झाड-झडूले शस्त्र बनेंगे,
भक्त बनेगी सेना!

ऑगस्ट 1942 मधील राष्ट्रसंतांच्या या वीर रसात्मक काव्याने राष्ट्राभिमानाचे स्फुल्लिंग चेतवले गेले. त्यात कुमार बालाजी रायपूरकर हा बालक पहिला शहीद ठरला. समस्त हिंदुस्थानात बि‘टिश सत्ता नांदत असूनही चिमूर मात्र चार दिवसांपर्यंत सतत स्वतंत्र राहिले.

चंद्रपूरचे राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय शिक्षणक्षेत्रात त्याच्या वैशिष्ट्यांनी अख्या देशात तळपत आहे. त्याचे नाव सरदार पटेल महाविद्यालय.

शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालय आणि श्रीमती सुशीलाबाई मामीडवार समाजकार्य महाविद्यालय ही मूळ पटेल महाविद्यालयाचीच अपत्ये असून उभय महाविद्यालयांनीही त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात नावे कमावली आहेत.

माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री, चंद्रपूरभूषण शांताराम पोटदुखे यांच्या मार्गदर्शनाखाली त्या महाविद्यालयांची घोडदौड यशस्वीरीत्या सुरू आहे.

शेकडो लोकांची कुटुंबे उदरनिर्वाहासाठी कामाच्या शोधात 1984 नंतर चंद्रपूरला आल्याने तेथील लोकसं‘ख्येत झपाट्याने भर पडली. मात्र शहरातील रस्ते तेच राहिले. त्यामुळे तेथे सतत वाहतुकीची कोंडी होते. वाढती लोकसंख्या आणि महानगरपालिकेची नव्याने मान्यता यामुळे तेथील जमिनींचे भाव गगनाला भिडले आहेत. नवे चंद्रपूर वसल्यानंतरच समस्या थोडीफार सुटू शकेल.

(सौजन्य अ.ज. राजूरकर. चंद्रपूर , प‘. जोशी, चिमूर)

– डॉ. अ.तु. काटकर (निवृत्त प्राचार्य)

 (मूळ लेख ‘शब्द रूची’ मासिकामधून साभार)

About Post Author

2 COMMENTS

  1. इतिहास खाडाखोड करून आणि…
    इतिहास खाडाखोड करून आणि चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी लिहिण्यात आला आहे अगदी दिशाभूल करणारी माहिती लिहलेली आहे.

Comments are closed.