गोपुर

0
30
carasole

‘पुरद्वारं तु गोपुरम्’ – नगरद्वाराला गोपुर म्‍हणावे असे अमरकोश सांगतो. गोपुर हा द्रविड शिल्‍पाचा एक प्रकार आहे. दक्षिण भारतात मंदिरांच्‍या प्राकाराभोवती उंच भिंती असून त्‍यांच्‍या प्रवेशद्वारांवर शिखरासारखे उंच शिल्‍पकाम केलेले असते. त्‍यास गोपुर असे म्‍हणतात. त्‍यास अनेक मजले असून त्यावर पुष्‍कळ नक्षीकाम केलेले असते. गोपुरांचे पहिले दोन मजले बहुधा सरळ व दगडी असतात. त्‍यावर विटांचे बांधकाम असते. प्रत्‍येक मजला क्रमाने लहान होत गेलेला असतो. अगदी वरच्‍या टोकाची रुंदी सर्वसाधारणपणे खाालच्‍या मजल्‍याच्‍या रुंदीच्‍या निम्‍मी (अर्ध्या आकाराची) असते. त्‍यावर अर्धवर्तुळाकार पण लांबट आकाराचे छप्‍पर असते. त्‍या शिल्‍पकामाची एक बाजू जास्‍त लांब असते. त्‍यामुळे वरचे छप्‍पर घुमटाकार न होता ते चैत्‍यगृहावरील लांबट छपरासारखे दिसते. शिरोभागी दोन्‍ही बाजूंना दोन अंर्तवक्र शृंगे असणे हे शैव मंदिराच्‍या गोपुराचे लक्षण समजले जाते. ती शृंगे नंदीच्‍या मस्‍तकाचे प्रतिक असतात.

(भारतीय संस्‍कृतिकोश – खंड 3)

About Post Author