‘माझ्या मना लागो छंद गोविंद-नित्य गोविंद’ ही भावना माझ्या मनात वृद्धिंगत होण्यासाठी कारण घडले, ते म्हणजे आमची मैत्रीण, निवृत्त झाल्यानंतर तिच्याकडून आम्ही घेतलेली गीतेची संथा; आणि तीसुद्धा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून! म्हणजे ‘व्हॉट्स अॅप व्हॉइस मेसेज’चा वापर करून. संजयाला महाभारतात जशी कुरुक्षेत्रावर काय घडत आहे ते पाहण्याची दिव्यदृष्टी लाभली तशीच सोय आम्हाला आमच्या वास्तव जीवनात या व्हॉइस मेसेजने लाभली आणि आम्हाला ‘भगवंताची वाणी’ मोबाईलच्या W/A वरून ऐकताना जणू काही ‘दिव्य कान’ लाभले!
या कहाणीची मुख्य नायिका आहे पुण्याची आमची गीतावृत्ती मैत्रीण सौ. अनुराधा म्हात्रे. गेली दोन वर्षें भगवद् गीतेतील श्लोकांचा आत्यंतिक शुद्ध उच्चारण कसे करायचे ते आम्ही दूर-दूरच्या/अतिदूरच्या मैत्रिणी तिच्याकडून घरी बसून मोबाईलवर शिकलो. गीता जशी ऐकली अगदी तशी आम्ही म्हणत गेलो.
प्रथम थोडे अनुराधा म्हात्रे यांच्या गीता गुरूबद्दल जाणून घेऊया – नंतर या गीता उच्चारण उपक्रमाबद्दल! अनुराधा मात्र या पूर्वाश्रमीच्या कुमारी हेमा रानवडे. आम्ही सर्वजणी तिला हेमाताई या नावानेच हाक मारतो. तिचे माहेर आलिबाग जवळील ‘चेंढरे’ नावाच्या निसर्गरम्य खेड्यात गेले. पानाआड लपलेला हिरवा चाफा आणि गुलाबी रंगाच्या मधुमालतीच्या फुलांच्या सानिध्यात अंगणातील पारिजातकाच्या फुलांतील ‘मौक्तिके’ आणि ‘प्रवाळ’ पाहत खेड्यामधील एका कौलारू घरात तिचे बालपण गेले.
मध्यमवर्गीय कुटुंबात सकाळी वडील म्हणत असलेल्या अभंगाने सश्रद्ध आई झोपाळ्यावर बसून ओव्या गात, वालाच्या शेंगा निवडत असायची. आल्यागेल्याचे मनापासून स्वागत करत, गरजू विद्यार्थ्यांची परीक्षेसाठी राहण्याची सोय करत, तिच्या सरळ साध्या आईवडिलांनी हेमाला उत्तम संस्कार करत वाढवले.
तिच्या प्राथमिक शिक्षणाची सुरुवात घराजवळच्या चेंढरे प्राथमिक शाळेत झाली. तिला शाळेत साजऱ्या होणाऱ्या टिळक पुण्यतिथी, गांधी जयंती वगैरे प्रसंगी भाषणे पाठ करून, लोकांसमोर उभे राहून बोलण्याची सवय; त्यामुळे स्वभावात सभाधीटपणा आला. शाळेतील शिक्षकांनी ऐतिहासिक नाटकांतील काही स्वगते तिच्याकडून बसवून घेतली. त्यामुळे तिचे अभिनयाचे, वाणीतील चढउताराचे शिक्षण त्याच काळात झाले.
पुढील शिक्षण ‘कोकण एज्युकेशन सोसायटी’च्या ‘जानकीबाई रघुनाथ हळदवणेकर कन्या शाळा’ येथे झाले. तेथे टिळक पुण्यतिथीला झालेल्या कार्यक्रमातील तिच्या उत्स्फूर्त भाषणाचे कौतुक झाले आणि तिने आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धांत भाग घेतला. त्यात बक्षिसे मिळवली. तिला पुण्यातील लक्ष्मीबाई रानडे ह्या प्रतिष्ठित वक्तृत्व स्पर्धेतील यशही मिळाले. तो शालेय जीवनातील बहुमान समजला जाई. पुढील शिक्षण ‘जेएस्एम’ कॉलेजमधून झाले. तिला मुंबई विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेतही मेडल मिळाले. ते भाषण आकाशवाणीच्या ‘युवावाणी’ ह्या कार्यक्रमात प्रसारित झाले. तिच्या कथा, कविता कॉलेजच्या नियतकालिकांतून प्रसिद्ध होत गेल्या.
अनुराधा ह्यांचे व्यक्तिमत्त्व आकाराला येण्याचे श्रेय त्या त्यांचे कॉलेजातील गुरुजन कै. अनंत जोग, कै. डॉ. अरविंद वामन कुलकर्णी, डॉ. श्री. सुरेश गोपाळ पळसोदकर ह्यांना देतात. त्यांना नोकरी एस्.टी.त लागली, विवाह झाला व नंतर त्या पुण्यात, विद्येच्या माहेरघरी स्थिरावल्या. त्यांना पायरी-पायरीने बढत्या मिळून त्या प्रशासकीय अधिकारी ह्या पदावरून निवृत्त झाल्या. त्या घरसंसार, नोकरी हे करत असताना हौशी रंगभूमीवर कार्यरत होत्या. त्यांनी आकाशवाणी (पुणे)ची आवाज चाचणी पास होऊन नभोनाट्यातदेखील काम केले; दूरदर्शन मालिकांतील कामे, सूत्रसंचालन हेही करता आले.
त्या भगवद्गीतेकडे नोकरी करत असतानाच वळल्या. त्यांना लहानपणापासून अध्ययन व अध्यापन यांची आवड आणि त्यांच्यावर अलिबागच्या ‘डोंगरे हॉल’ या नावाने परिचित असलेल्या सार्वजनिक ग्रंथालयातील वाचनाचे संस्कार. त्यांच्या अंगी हाती घेतलेले काम कुशलतेने व नेटाने पार पाडण्याचे कसब होतेच. त्या महाराष्ट्र शासनाचा ‘गुणवंत कामगार’ या पुरस्काराने 2000 साली सन्मानित झाल्या. त्यांनी नोकरदार महिलांसाठी सुरू झालेल्या गीता संथा वर्गात 2010 साली प्रवेश घेतला.
आता गीता उपक्रमाबद्दल जाणून घेऊया. पुण्यातील गीता धर्म मंडळातर्फे अनेक उपक्रम राबवले जातात. त्यांनी त्यांपैकी गीताव्रती व गीतापाठशाला ह्यात सहभाग घेतल्याने त्यांना गीता तत्त्वज्ञान व संस्कृत व्याकरण ह्यांचाही परिचय होत गेला; गीतेचे उच्चारशास्त्र समजू लागले. त्यांच्या त्या अभ्यासाला निवृत्तीनंतर वेग आला. त्यांना शास्त्रशुद्ध गीता म्हणताना आनंद वाटू लागला. त्यांना तो आनंद दुसऱ्यांनाही द्यावा अशी ओढ वाटू लागली. त्यांनी एका मैत्रिणीला फोनवर शिकवण्याची सुरुवात केली. परंतु दोघींना एकाच वेळी फुरसद मिळणे शक्य होईल असे वाटेना. ते साध्य कसे व्हावे ह्या विचारात असतानाच अलिबागची त्यांची कॉलेजमैत्रीण संध्या जोशी – पूर्वाश्रमीची संध्या रानडे हिच्याशी, अनेक वर्षांनी संपर्क झाला. तिच्याशी तो विषय बोलत असताना, तिला व तिच्या मैत्रिणींना गीता शिकण्यास आवडेल असे लक्षात आले आणि त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा म्हणजे W/A चा वापर करून एक ग्रूप बनवला. नाव दिले ‘गीता पठण’. त्या दोघींच्या मुंबईतील मैत्रिणी व पुण्यातील मैत्रिणी अशा आठ जणी एकत्र आल्या. संध्याची अमेरिकेतील एक गुजराथी मैत्रीण; तसेच, तिची अमेरिकेतील अजून एक मैत्रीण व तिची न्यूझीलंडची बहीण अशा विद्यार्थिनी/मैत्रिणी जोडल्या गेल्या.’ असे अनुराधा ऊर्फ हेमाताई म्हणतात.
गीता संथा देणारे ग्रूप बरेच आहेत. परंतु त्यांच्या ग्रूपचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांना त्यांच्या ‘गुरू’ श्लोकांचे उच्चार कसे करायचे, किती अक्षरांनंतर थांबायचे, छंदाप्रमाणे चाल कशी बदलायची हे सर्व W/A Voice Message वर सांगत असतात. ह्यासाठी त्या नियमावलीचा संदर्भ म्हणून उपयोजतात. ‘गुरू’ अनुराधा (हेमाताई) यांनी सर्व ‘विद्यार्थ्यां’ना व्याकरणाच्या नियमांच्या प्रती आधी पाठवल्या होत्याच. श्लोक शिकवताना त्यांचा संदर्भ असतो. संथा घेण्यासाठी गोरखपूर प्रेसचे मोठ्या अक्षरांतील गीतेचे पुस्तक नं.22 ह्याचा वापर केला गेला आहे. त्यामुळे गुरू स्पष्टीकरण देत असताना, विद्यार्थिनी पुस्तकावर खुणा करून घेत असतात. अनुराधा श्लोक म्हणून दाखवतात व विद्यार्थिनी त्यांच्या सवडीने त्यांची त्यांची पुस्तकप्रत समोर ठेवून ते आत्मसात करतात व अनुराधाला उलटा Voice Message पाठवतात.
ह्यामुळे विद्यार्थ्यांना घरबसल्या घरसंसार सांभाळून गीता शिकता आली. ‘गुरू’ गीता श्लोकांतील शब्दांच्या अचूक उच्चारांबाबत काटेकोर आहेत. विद्यार्थिनीही श्लोक दक्षतेने म्हणण्याचा प्रयत्न करत असतात. तरीही चुका झाल्या तरी अनुराधा न चिडता, समजुतीने परत परत सांगत असतात असा गीतामृत पान करणाऱ्या आम्हा सर्व विद्यार्थिनींचा अनुभव आहे. सर्व विद्यार्थिनी अचूकतेने अठरा अध्याय म्हणू लागल्या.
अनुराधा म्हात्रे त्यांच्या या उपक्रमाबद्दल अधिक सांगताना म्हणतात, की, “वॉट्स ॲपवर व्हाइस मेलने गीता शिकवण्यास सुरुवात केली, तो एक प्रयोगच होता पण आम्हा सर्वांनाच तो अत्यंत उपयुक्त वाटला. शिकवणाऱ्याने त्याच्या सोयीच्या वेळी प्रत्येक शब्दाचा उच्चार कसा करायचा ते सांगायचे व संपूर्ण श्लोक म्हणून दाखवायचा. त्या सर्वांचे व्हॉइस रेकॉर्डिंग करायचे व व्हॉट्स अॅपवर पोस्ट करायचे. शिकणाऱ्याने त्याच्या सोयीच्या वेळी व्हाइस मेल ओपन करायची, श्लोकांचा अभ्यास करायचा, स्वत: म्हणून दाखवायचा व त्याचे रेकॉर्डिंग व्हाइस मेलने पाठवून द्यायचे. मग तो ‘चेक’ करून त्यातील दुरुस्ती सांगायच्या किंवा बरोबर असेल, तर तसे सांगायचे व व्हाइस मेल पोस्ट करायची. अशी ही साधी सोपी पद्धत.
या पद्धतीने सर्वात मोठा फायदा म्हणजे शिकवणाऱ्याला/शिकणाऱ्याला कोठे जावे लागत नाही. घर बसल्या शिकता येते. विशिष्ट वेळची बांधिलकी नाही. विद्यार्थी त्याच्या वा तिच्या सोयीने रात्री बारा वाजता किंवा पहाटे चार वाजता शिकू शकतो. गावाला गेला म्हणूनही क्लास बुडण्याचा धोका नाही. गावाहून आल्यावर पोस्ट करू शकतो किंवा प्रवासातही वेळ मिळाल्यावर पोस्ट करू शकतो. कायम प्रवासात असणारी आमची एक मैत्रीण विमानतळावरील लाऊंजमधूनही पोस्ट करते. कारमधून प्रवास करतानाही पोस्ट करते. अशी ही उपयुक्त पद्धत. व्हॉट्स अॅपचा वापर असा करण्याची कल्पना संध्या जोशी हिची.
आम्हाला आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर असा सुंदर करता आला आणि तेसुद्धा आमच्या निवृत्तीनंतरच्या काळात; त्यामुळे आम्हाला धन्यता वाटते. अनुराधा म्हात्रे ह्यांनी हे सर्व विनामोबदला स्वान्त सुखाय केले. केवळ आत्मिक समाधान आणि गीतेच्या प्रसारासाठी त्यांचा पण खारीचा वाटावा असावा म्हणून. त्यांचे पुढील पाऊल म्हणजे शाळेत जाणाऱ्या आठ-नऊ वर्षांच्या मुलांसाठीपण हे काम त्या करतात. त्यांनी तीन-चार मुलांना गीतेतील ‘स्थितप्रज्ञाची लक्षणे’ ह्यावरील अठरा श्लोक त्यांच्या मदतीने शिकवलेदेखील. ती मुले ते श्लोक अस्खलिततपणे म्हणतात. त्या मुलांच्या आजीने, हेमातार्इंच्या मार्गदर्शनाखाली हे गीता नित्यपाठाचे अठरा श्लोक मुलांकडून मुखोद्गत करून घेतले.
गीता हा धर्मग्रंथ आहे. म्हणजे तो नुसता पूजा करून, बासनात बांधण्याचा नसून गीतेचे तत्त्वज्ञान आचरणात आणण्याचा आहे. गीता तत्त्व हे अखिल मानवजातीसाठी आवश्यक आहे. सर्वत्र एक चैतन्य व्यापून राहिलेले असताना राग, द्वेष, जातीयवाद, श्रेष्ठ-कनिष्ठता ह्याला थाराच का द्यावा? धर्म आणि संप्रदाय ह्या गोष्टी वेगवेगळ्या आहेत. सनातन धर्म हा सर्वांसाठी सारखा असला पाहिजे. त्यासाठी गीतेचा अभ्यास महत्त्वाचा वाटतो. अनुराधा म्हात्रे यांनी त्याचा प्रचार करण्याचे ठरवले आहे. त्यांचे ‘गीता सर्वांसाठी’ ह्या विषयावरील पहिले प्रवचन पावसला स्वामी स्वरूपानंदांच्या समाधी मंदिरात 4 मार्च 2018 रोजी झाले. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. आम्ही गीतेचे तत्त्वज्ञान किती आनंद देऊन जाते ह्याचा अनुभव घेतच आहोत. हा अक्षुण्ण आनंद आमच्यासारख्या इतरांपण मिळाला पाहिजे असे वाटते.
आधुनिक तंत्रज्ञान हे आमच्यासाठी वरदान ठरले. आम्ही जेष्ठ व्यक्तींनी त्याचा चांगला उपयोग करून घेतला. नवीन पिढीला तर ह्या तंत्रज्ञानाचे अनेक बारकावे माहीत असतात. तेव्हा त्याचा सदुपयोग तशा पद्धतीने व्हावा. तरुण पिढीत नैराश्याचे प्रमाण वाढताना दिसत आहे. त्यासाठी माणसाने आयुष्याबद्दलचा दृष्टिकोन कसा ठेवावा, त्यांच्या श्रद्धा – वर्तन – वागणूक ह्याविषयी भगवंतानी गीतेत केलेले मार्गदर्शन जर आयुष्याच्या पूर्वार्धात समजले तर सकारात्मक आयुष्य जगण्यात मोलाची मदत होईल.
– अंजली अ. आपटे
खुप चांगला ऊपक्रम आहे.
खुप चांगला ऊपक्रम आहे.
फार फार सुंदर उपक्रम.
फार फार सुंदर उपक्रम.
This should spread to more…
This should spread to more and more people
फारच स्तुत्य !…
फारच स्तुत्य !!म्हात्रेताईंचे अभिनंदन!! अंजली आपटे भाषा शैली छान
छान उपक्रम
छान उपक्रम
अंजु अनुराधा ताईंच्या वरती…
अंजु अनुराधा ताईंच्या वरती जो लेख तु लिहीला आहेस तो खुपच अप्रतिम आहे,मी त्या उपक्रमाचा एक भाग यांचा मला खुप अभिमान वाटतो ,हा लेख वाचुन अनेक जणांना गीता शिकण्याची प्रेरणा मिळेल ,तुझ्या लिखाणासाठी ,तुझं खुप कौतुक व हेमा ताईंना माझा नमस्कार
Khup chan shikwle tyanche…
Khup chan shikwle tyanche uchar Sanskrit shabdanche uchar khup shudha ahet ani aple Jo paryant barobar yet nahi toparyant n kantalta Sangate Thanks hematai
Very good article.Excellent…
Very good article.Excellent idea of using whts app.
उपक्रम स्तुत्य लेख खूप छान
उपक्रम स्तुत्य लेख खूप छान
Anuradha Mhatrw who is our…
Anuradha Mhatrw who is our loving Hematai truly teaches Greta like a mother cow would teach an immature student. From uchchar shuddhi with santha paddhati to explaining meaning and deep understanding, Hematai not only consistently progresses on her spiritual path, she is taking a lot of people forward with her.
खूपच कौतुकास्पद कार्य!…
खूपच कौतुकास्पद कार्य! यामुळे बर्याच
जणांना प्रेरणा मिळू शकते.
लेख प्रसिध्द केल्याबद्दल…
लेख प्रसिध्द केल्याबद्दल धन्यवाद
लेख अतिशय सुंदर ….
नविन…
लेख अतिशय सुंदर ….
नविन तंत्रज्ञानाचा विधायक कार्यासाठी छान वापर होतोय .
अनुराधाताईं ना त्यांच्या कार्यासाठी शुभेच्छा….
W/app चा इतका सर्जनशील उपयोग सुचवल्याबद्दल संध्याताई ना धन्यवाद!
दोघीही अलिबागच्या असल्याने अभिमान वाटतो .
ॲड . स्वाती लेले
अलिबाग
Good idea
Good idea
उपक्रम वाचून निवृत्तीनंतरचा…
उपक्रम वाचून निवृत्तीनंतरचा वेळ सत्कारणी लावण्याचा उत्तम मार्ग सापडला. धन्यवाद
काकू लेख एकदम उत्तम आहे…
काकू लेख एकदम उत्तम आहे. ह्या लेखाच्या निमित्ताने हेमाआजींचा गीता प्रवास व त्यांच्या व्यक्तीमत्वाबद्दलचे अनेक पैलू कळले. अशा व तुमच्या सारख्या गुरु आम्हाला लाभल्या हे आमच्या मुलांचे भाग्यच आहे.
Very nice thoughts
Very nice thoughts
खूप सुंदर लिहिले आहेस ग!
खूप सुंदर लिहिले आहेस ग!
Good attempt
Good attempt
हेमा म्हणजेच अनुराधा…
हेमा म्हणजेच अनुराधा म्हात्रे माझी मैत्रीण.खणखणीत आवाज, स्पष्ट उच्चाांसह तिच्याकडून गीता शिकण्याचा अनुभव मीही घेतला आहे. तो अविस्मरणीय आहे. तिच्या कार्याला सुयश लाभो.
अंजली आपटे यांनी अनुराधा…
अंजली आपटे यांनी अनुराधा म्हात्रे उर्फ हेमाताई यांच अभ्यासू करारी व्यक्तिमत्व सुंदर रीत्या शब्दांकीत केले . आज हेमाताईंमुळे मी गीता पूर्ण व्याकरण शुध्द वाचू शकते. What’s app चा एवढा योग्य उपयोग क्वचित केला जातो जो हेमाताईंनी केला व आज अनेक लोकांपर्यंत त्या पोचल्या व गीता ज्ञान दानाचे त्यांचे पुण्य कर्म अखंड करीत आहेत .
हा तुमचा उपक्रम असाच चालू राहून त्या पासून आमच्या सारख्या अनेकांना त्याचा लाभ घेतां यावा .
??
khup chan lihile ahe!
khup chan lihile ahe!
अंजली,
हेमाताईंचा उपक्रम…
अंजली,
हेमाताईंचा उपक्रम खूपच स्तुत्य आहे. या मधे तुझा सक्रीय सहभाग नक्कीच अभिनंदनीय आहे. एका विद्वान व तळमळीने काम करणार्या व्यक्तीचा परीचय करून दिल्याबद्दल शतश:आभार
हेमा मावशी, खूपच छान, असेच…
हेमा मावशी, खूपच छान, असेच लेख पुढे लिहित रहा
I am learning Geeta from…
I am learning Geeta from Arundhati Matre. She is great mentor. She is very knowledgeable in Geeta. I live in U.S. and enjoy learning from her on Whatapp. She is very patient.her perfect Sanskrit pronounciation. She is very devoted to teaching Geeta.
Anju lekh vachla khrokhar…
Anju lekh vachla khrokhar khup Chan upkram aahe hya aadhunic tantryatun Geeta gharoghar pohochel and pratyekachya manamadhye Ramrajya ghadayala vel lagnar nahi..
Anju vahini , khoop chhan…
Anju vahini , khoop chhan lekhan. Hemataina namskar. Ak Stutya upkram. ??
श्रीराम
आम्हालाही असे…
श्रीराम, आम्हालाही असे शिकायचे आहे. अशा व्हाट्सएपच्या ग्रुपमध्ये येण्यासाठी लिंक पाठवू शकाल का?
Comments are closed.