सिंगापूरच्या प्रगतीलाकोविद-19 ने खीळघातली आहे. त्याचे व्यापारउद्योगावरफारचदूरगामी-निगेटिव्हपरिणाम होणार आहेत. सिंगापूर हे आशियामधील सर्वातप्रगतआर्थिकव्यवहाराचे केंद्र मानले जाते. सेवाक्षेत्रासाठी दिल्या जाणाऱ्या सोयींसाठीजगातील सर्व राष्ट्रांमध्ये सिंगापूरचाक्रमांक सर्वांत वरचा आहे. सर्वबहुराष्ट्रीयबँका आणि कंपन्या यांनी त्यांची आशियातील मुख्य कार्यालये सिंगापूरमध्येवसवली आहेत. सिंगापूरमध्ये साधारणपणे 20जानेवारीच्या आसपासकोविदचीकुणकुणऐकण्यास मिळाली. लोकदबल्या आवाजात त्याबाबत चर्चा करू लागले. सरकारने तापमानतपासणीविमानतळ, कचेऱ्याआणिसार्वजनिकठिकाणे येथे 1फेब्रुवारीपासूनचालू केली. सिंगापूरला सार्सच्या साथीचा अनुभव होता. त्यामुळे लोक साधा सर्दी–खोकला झाला तरीसुद्धामास्कवापरतात.त्यामुळे कोरोनाची चाहूल लागताच लोकमास्कघालूनकामावरजाऊ लागले.सिंगापूरहेआशियामधील मोठेट्रान्झिटकेंद्रआहे. तेथे आंतरराष्ट्रीय प्रवाशांची व विमानांची ये-जा मोठ्या प्रमाणावर होत असते. तरीसुद्धा फेब्रुवारी महिनासंपेपर्यंत सिंगापूरमध्ये त्याचा विशेष प्रभाव जाणवला नाही. आजूबाजूच्या देशांत जरी रुग्णसंख्यावाढतहोतीतरीसिंगापूरलारुग्णसंख्या नियंत्रणात ठेवण्यात यश मिळाले. स्थानिक सरकारने सर्वसुविधासज्जकरूनठेवल्याहोत्या.
रुग्णांची संख्या नंतर वाढत गेली तेव्हा, 10मार्चनंतर सर्वकार्यालयांनी ‘वर्कफ्रॉमहोम‘ सुरू केले. पाश्चिमात्यदेशांतही कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत होती. त्यामुळे सिंगापूरच्या बाहेरराहणाऱ्यानागरिकांनापरतआणण्यास सुरूवातझाली. त्याचा परिणाम म्हणून सिंगापूरमधील रुग्णांचीसंख्याआणखी झपाट्याने वाढू लागली.सरकारने ‘सर्किटब्रेकर‘ला (साखळी तोडण्यास) 7 एप्रिलपासून सुरूवातकेली. सर्वव्यवहारठप्पझाले. फक्त अत्यावश्यक वस्तूंचीदुकाने वगळून सर्वगोष्टीबंदकरण्यातआल्या. मास्कबंधनकारककरण्यातआले.कुटुंबातील एकाचव्यक्तीस बाहेरून वस्तू आणण्यास सांगितले गेले. पणबसव एमआरटी मात्रदिवसभर चालू होती.
खाण्यापिण्याची सर्व दुकानेही चालूहोती मात्र, तेथेबसूनखाण्या-पिण्यास मनाई होती, पदार्थ घरी घेऊन जाता येत असत. कचेऱ्यांमध्ये दहा टक्के लोकांना कामास परवानगी देण्यातआली. कचेऱ्यांमध्ये जी कामे चालू होती त्यांना सिद्धकरावेलागे, की ती कामे घरूनकाकरता येऊ शकतनाहीत? शाळाबरेचदिवसचालूहोत्या, मात्र ज्या मुलांचे आईवडीलअत्यावश्यकनोकऱ्यांमध्येआहेतत्यामुलांनाफक्तशाळेतयेण्यासपरवानगीहोती; बाकीमुलांनाहोमबेस्डलर्निंग. त्यामुळे शाळांमध्ये वीस ते तीस टक्के मुले असत. शाळांच्या उन्हाळ्याच्यासुट्ट्याबदलून घेण्यात आल्या. आरोग्यमंत्री, पंतप्रधानआणि अन्य सरकारीअधिकारीहेलोकांनामाहिती देत.
सरकारने नागरिकांना सर्किटब्रेकरच्याकाळातझालेल्याआर्थिकनुकसानासाठी भरपाई देऊ केली. त्यातून दुकानाचेभाडे, टॅक्सीचालकांचे हप्तेअशा रकमा भरण्याची सुविधा प्राप्त झाली. वयस्करलोकांनाही आर्थिकमदत मिळाली. सरकारने वेगळीआर्थिकयोजनाही बनवली. सिंगापूरची सर्वव्यवस्था ही आयातगोष्टींवरचालते. तेथे स्थानिक उत्पादन काहीच होत नाही. तरीही सरकारने कटाक्षाने पाहिले, की कोठल्याहीपरिस्थितीत खाण्यापिण्याच्यागोष्टींचा, औषधवामास्कह्यांचातुटवडापडणार नाही.
बाहेरूनआलेल्या व्यक्तीवा स्थानिक कुटुंबांमध्ये आढळलेल्याव्यक्ती व मुले यांना क्वारंटाइनकरण्यासाठीसर्वसुविधासरकारनेसज्ज केल्याहोत्या.कायदेपालनआणिसिंगापूरह्याएकाचनाण्याच्यादोनबाजूआहेत. सिंगापूरमध्ये नागरिक प्रचंडशिस्तप्रियआणिकायदेपालनकरणारेआहेत. तेमेहनती, हुशारआणिव्यावहारिकआहेत. सरकारने जेवढेप्रयत्नसुविधा पुरवण्यासाठीकेले, नागरिकांनी तेवढेचप्रयत्न नियमांचे पालनकरण्यासाठी केले. मास्कनवापरताबाहेरपडणाऱ्याव्यक्तीला तीनशे सिंगापूरडॉलरचादंड होता.क्वारंटाइनचाआदेशमोडणाऱ्यांचीरवानगी जेलमध्ये करण्यात येई.देशाबाहेरजाऊनसार्वजनिकठिकाणीचुकीची माहितीदेणारे आणि लॉकडाऊनकाळातसार्वजनिक ठिकाणी गर्दीकरणारे यांचे व्हिसानेहमीसाठीरद्दकेलेगेले. एकाव्यक्तीलाफक्तअर्धातासआधी क्वारंटाइनमधूनबाहेरपडल्याबद्दल सहा आठवड्यांचीकारावासाचीशिक्षाझाली हे मी पाहिले आहे. एकाविदेशीनागरिकाने सरकारीकार्यालयात जाऊन चुकीचीमाहितीदिल्याबद्दल व्हिसारद्दकरण्यातआला. मास्कन घालतासार्वजनिकठिकाणीसरकारीअधिकाऱ्यांशीहुज्जतघालणाऱ्याएकामहिलेलाकारावासाचीशिक्षा देण्यात आली. मुद्दाम सांगितली पाहिजे, अशी बाब म्हणजे हेसर्वगुन्हे घडल्यापासून पंधरा दिवसांत त्यांचा निकाल लावला गेला आणि गुन्हेगारांना शिक्षादेण्यात आल्या.
डॉर्मेटरीमध्ये राहणारे कामगार ही सिंगापूरमध्ये वेगळीच समस्या आहे. त्यामुळेसर्वातकमीरुग्णअसणाऱ्यासिंगापूरचाआकडाASEAN देशांमध्येसर्वातजास्तरुग्णअसणाऱ्यादेशामध्येपरिवर्तितझाला.बाहेरच्यादेशांतूनबांधकामक्षेत्रातकामकरण्यासाठी सिंगापूरमध्ये बरेच कामगार येत असतात. ते सर्वकामगार पैसेकमावूनपरत जाण्याच्या उद्देशानेयेतात. त्यामुळेते स्वस्तडॉर्मेटरींमध्येराहतात. त्यांचीतेथे दाटलोकवस्तीअसते. त्यामुळे तेथे कोरोनाचाप्रादुर्भावप्रचंडझालाआणिपसरलादेखील. सरकारने पंचवीस हजारमजुरांसाठी क्वारंटाइन सेंटरबांधले आणि तेथे दररोज आठ हजार चाचण्याघेणे सुरू केले.रोजच्यावाढवलेल्याचाचण्यांमुळेएकूणरुग्णांचाआकडाप्रचंडप्रमाणातवाढला. मे महिन्यामध्येरुग्णसंख्या त्रेचाळीस हजारवर गेली. पण यश असे, की त्यापैकी छत्तीस हजार लोकांवर कोरोनाउपचारहोऊन ते बरे होऊ शकले. मृतव्यक्तींचाआकडाफक्त सव्वीस आहे. त्यातही बऱ्याचशा व्यक्तीह्यावयस्करकिंवादुसऱ्याआजाराने पीडितहोत्या.
सरकारने1 जूनपासून येथील लॉकडाऊनशिथिलकेला. सर्वव्यवहार19 जूनपासूननियमघालूनचालूकरण्याचीपरवानगी दिली. सर्वठिकाणी एक मीटरचेमार्किंगकरण्यातआले. लोकतेकाटेकोरपणे पाळतआहेत. अजूनहीबऱ्याचशा कचेऱ्या‘वर्क फ्रॉम होम‘करत आहेत. शाळांमध्येपन्नास टक्के मुलेशाळेतहजर असतात आणि पन्नास टक्के मुलेहोमबेस्डलर्निंग करतआहेत. पाचपर्यंतलोकांना खेळणे, जेवण करणे यासाठी एकत्रयेण्याची परवानगीआहे. या गोष्टीहळुहळूपूर्वपदावरयेतीलअसा विश्वास वाटतो.
श्रीकांत गांगल परिवारासोबत
मी आणि माझे कुटुंब सिंगापूरला 2018साली नोकरीच्या निमित्ताने आलो. सिंगापूर मुंबईपासूनपाच तासांच्या हवाई अंतरावर,विषुववृत्ताजवळ वसलेलेआहे. सिंगापूरला उतरल्यावरउमटलेला पहिलाठसाम्हणजेतेथील स्वच्छता, कार्यक्षमविमानतळआणि तेथील दक्ष व्यवस्थापण.
सिंगापूर हे मलेशियापासूनवेगळेहोऊन9 ऑगस्ट1965 सालीस्वतंत्र राष्ट्रम्हणूनस्थापन झाले. त्यावेळीतोमागासलेलाव गरीबदेशहोता. पणगेल्या पंचावन्न वर्षांत सिंगापूरने प्रचंड प्रगती केली आहे. ते आज वैभवसंपन्न राष्ट्र म्हणून गणले जाते. सिंगापूरची प्रगतीआणित्याचे यश याचे श्रेय लीकुआनयेव या राष्ट्रप्रमुखास दिले जाते. सिंगापूरचेक्षेत्रफळफक्तसातशेचौऱ्याण्णव चौरस किलोमीटरआहे, म्हणजेमुंबईपेक्षा थोडे जास्तआणितेथील लोकसंख्याफक्तपंचावन्न लाख. तेथे ना मोठया कंपन्या आहेत ना कारखाने,तरीहीASEAN देशांची सर्वकारभार सूत्रेसिंगापूरमधून चालतात.सिंगापूरच्या यशाचे कारण सरकारची दृढ इच्छाशक्ती, दूरदृष्टी आणि नियोजन या तीन मंत्रांमध्ये आहे असे सांगितले जाते.
सिंगापूरमधीलबरेचलोकजहाजआणिकच्च्या मालाच्याव्यवसायातआहेत.तेथे ट्रान्झीटपॉईंटआणिपर्यटन यावरअधिक भरआहे. सिंगापूरमध्येकाहीबाबीप्रकर्षानेजाणवतात. येथेसर्वानाखाण्यापिण्याचीप्रचंडआवडआहेआणि बरीचशी कुटुंबेतिन्हीवेळचे जेवणबाहेरचकरतात.खाण्याची लोकप्रियजागाम्हणजे ‘फूडकोर्ट‘. सिंगापूरची लोकसंख्याचीन, मलेशियाआणि भारत येथून मूळ आलेली आहे. त्यामुळे जनसंख्येमध्येबरीचविविधताआहे.सिंगापूरमध्ये पुरुषांना दोन वर्षराष्ट्रसेवाबंधनकारकआहे. त्यांनावयाच्या पस्तीसाव्या वर्षापर्यंत वर्षातील पंधरा दिवसकधीही राष्ट्रसेवेसाठी बोलावले जाते– मग ते डॉक्टर, वकील, नोकरीकरणारेकोणीहीअसोत.
सिंगापूरचे वेगळे वैशिष्ट्य म्हणजे तेथेराजकीय नेत्यांनासर्वातजास्तपगारदिलाजातो. म्हणूनचसरकारमध्येसर्वजणउच्चशिक्षितआहेत. राष्ट्रम्हणूनत्यांचा जपानसारखा होण्याचा प्रयत्नआहेअसे मला वाटते. देशाला ज्या प्रकारच्या तज्ज्ञतेची गरज आहे, ती लक्षात घेऊन सरकार मुलांनी काय प्रकारचे शिक्षण घ्यावे हे ठरवते; जरूर तर बाहेर देशातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या व शिक्षण देऊन आकृष्ट केले जाते.
– श्रीकांत गांगल shrikantg@gmail.com
श्रीकांत गांगल ब्लूमबर्ग सिंगापूर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत बारा वर्षांपासून काम करत आहेत. ते 2018मध्ये सिंगापूरला गेले. त्यांनी नाशिकमध्ये इंजिनीयरींगचे, पुणे विद्यापीठातून एमबीए आणि इंग्लंडमधून वित्त पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. ते अठरा वर्षे मुंबईत वास्तव्यास होते. त्यांची पत्नी प्राची यांनी बीए आणि एलएलबीचे शिक्षण घेतले आहे. त्यांना अनुष्का ही बारा वर्षांची मुलगी आणि अंश हा पाच वर्षांचा मुलगा आहे.
श्रीकांत गांगल ब्लूमबर्ग सिंगापूर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत बारा वर्षांपासून काम करत आहेत. ते 2018मध्ये सिंगापूरला गेले. त्यांनी नाशिकमध्ये इंजिनीयरींगचे, पुणे विद्यापीठातून एमबीए आणि इंग्लंडमधून वित्त पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. ते अठरा वर्षे मुंबईत वास्तव्यास होते. त्यांची पत्नी प्राची यांनी बीए आणि एलएलबीचे शिक्षण घेतले आहे. त्यांना अनुष्का ही बारा वर्षांची मुलगी आणि अंश हा पाच वर्षांचा मुलगा आहे.
Beautiful narration
Nicely written by a person in financial field.congrats for Good write up.Shrikant ji
श्रीकांत, उत्तम लिखाण
Well written, Shrikant!!
छान माहिती व करोनाशी लढण्याचा आत्मविश्वास आला
लेख आवडला.
माहितीपूर्ण लेख ��
आतिशय छान लेख देश मोठा का होतो कोरोनावर नियम पाळून मात करता येते
खूप छान आणि नेमकी माहिती . छान लेख !