सोलापूरच्या मंगळवेढा तालुक्यात माचणूरच्या सिद्धेश्वर मंदिरापासून जवळच औरंगजेबाचा किल्ला आहे. औरंगजेबाच्या सैन्याचा तळ 1694 ते 1701 या काळात तेथे होता. स्वत: औरंगजेबही त्या काळात तेथे राहत असे. किल्ला व तेथील बुरुज काही ठिकाणी मोडकळीस आले आहेत. किल्ल्याचा परिसर मोठा असून आतमध्ये रान माजले आहे. तेथे वस्ती नाही. जवळूनच भीमा नदी वाहते.
किल्ल्यातच एक पडकी मशीद आहे व बाजूला एक कबर दिसते. कबर साधी असून ती औरंगजेबाची मुलगी झेब्बुन्निसाची असावी असे लोक म्हणतात, पण नक्की माहिती कोणालाच नसल्याने ती कबर कोणाची हा प्रश्न पडतो. सोलापूरचे शासकीय पुरातत्त्व खाते तेथील कारभार पाहते.
-राजा/राणी पटवर्धन, प्रमोद शेंडे