‘औट घटकेचं राज्य’ किंवा ‘औट घटकेचा राजा’ असे शब्दप्रयोग मराठीत आहेत. त्याचा अर्थ अल्प काळाचे राज्य आणि अल्प काळाचा राजा असा होतो. एक घटका म्हणजे चोवीस मिनिटे. औट घटका किंवा साडेतीन घटका म्हणजे चौऱ्याऐंशी मिनिटे. त्यामुळे एखादे सरकार वर्षा-दीड ‘औट’ म्हणजे साडेतीन. ‘इन मीन साडेतीन’मधील साडेतीन. ‘औट घटकेचे राज्य’ किंवा ‘औट घटकेचा राजा’ असे शब्दप्रयोग केले जातात. त्यांचे अर्थ ‘अल्प काळाचे राज्य’ आणि ‘अल्प काळाचा राजा’ असे होतात. एक घटका म्हणजे चोवीस मिनिटे. औट घटका किंवा साडेतीन घटका म्हणजे चौऱ्याऐंशी मिनिटे. त्यामुळे एखादे सरकार वर्षा-दीड वर्षांत पडले, तर त्याचा उल्लेख ‘औट घटकेचे राज्य’ असा केला जातो. माणसाच्या शरीरराचा उल्लेखही ‘औट हाताचा देह’ असा केला जातो. अंगुळ, वीत, हात ही माणसाची प्राचीन काळची परिमाणे आहेत. बोटांची रुंदी म्हणजे ‘अंगुळ’. ताणलेला अंगठा आणि करंगळी यांच्या टोकातील अंतर म्हणजे ‘एक वीत’, तर कोपरापासून मधील बोटाच्या टोकाइतके अंतर म्हणजे ‘एक हात’. माणसाची उंची त्याच्या साडेतीन हाताइतकी म्हणजे ‘औट हात’ असते.
ज्ञानेश्वरीच्या तेराव्या अध्यायातील ‘औट हात मोटके! की केवढे पां कौतुके| बरड की पिके| कोणाचे हे||’ ह्या ओवीत माणसाच्या ‘साडेतीन हात देहा’चे वर्णन आले आहे. कवी वसंत बापट यांनी ‘होडी’ ह्या कवितेत मानवी देहाला होडीची उपमा देताना म्हटले आहे,
‘औट हात होडीला माझ्या / आभाळाहून मोठे शीड
बंदर धक्के चुकवून बेटी / भलत्या जागा घे निर्भीड’
विश्वाच्या ह्या अफाट पसाऱ्यात आणि काळाच्या अनंत विस्तारात माणूस ‘औट घटकेचा राजा’ असतो, त्याच्या राज्याचा विस्तार ‘औट हात’ एवढाच असतो आणि मृत्यूनंतर त्याला लागणारी जागाही ‘औट हात’ इतकीच असते!
– डॉ. उमेश करंबेळकर
अप्रतिम
अप्रतिम
अनेकजणांना नसलेली छान माहिती…
अनेकजणांना नसलेली छान माहिती दिली आहे. मात्र सुरुवातीला आलेल्या ओट घटकेचा राजा किंवा औट घटकेचे राज्य या शब्दांंचा उगम असलेल्या शिराळशेटीच्या गोष्टीचा उल्लेख केला असता तर अधिक चांगले झाले असते.