अण्णा हजारेंनी आग्रह धरलेल्या जनलोकपाल विधेयकाच्या समितीवर ज्येष्ठ कायदेतज्ञ पितापुत्र शांतीभूषण आणि प्रशांतभूषण यांची नियुक्ती करण्यात आली. या दोघांची नियुक्ती व्हावी असे अण्णा हजारेंकडूनच सांगण्यात आले होते. मात्र या दोघांनाही उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती यांनी नोएडा येथे संशयास्पद पद्धतीने भूखंड दिला असल्याचे उजेडात आले आहे. त्यामुळे आता अण्णा आपणच सुचवलेल्या या व्यक्तींबाबत कोणता निर्णय घेतात ते पाहणे इष्ट ठरेल.
लोकसत्तेच्या दिनांक 20 एप्रिल 2011 च्या वृत्तवेध या सदरात जयपूरचे महाराजा भवानीसिंह यांची माहिती देण्यात आली आहे. भवानीसिंह हे उत्तम पोलो खेळत असत. त्यावेळी ब्रुनोईच्या राजाने भारतात काही गुंतवणूक केली होती आणि काही कारणास्तव ती काढून घेण्याचा विचार केला. त्यावेळी या राजाची पोलो खेळाची आवड जाणून घेवून भवानीसिंह यांची ब्रुनोईमध्ये राजदूत म्हणून नेमणूक करण्यात आली आणि त्यामुळे या राजाची भारतातील गुंतवणूक सुरक्षीत राहिली. या माहितीवरून आंतरराष्ट्रीय स्तरावर राजकिय डावपेच आणि शिष्टाचार कसे आखले जातात याची माहिती मिळते.
अशोक जैन
पत्रकार-लेखक
दिनांक – 20/04/201
{jcomments on}


