अशोक हांडे यांनी शेतकऱ्यांची हतबलता मांडली. दरम्यान आनंदाची एक बातमी आली, की ‘थिंक महाराष्ट्र’चे लेखक, कार्यकर्ते राजा पटवर्धन यांनी रिकामपणाचा सदुपयोग केला आहे. त्याचीच ही कहाणी.
आंबे कोकणातून निघाले!
तीन दिवस होऊन गेले, तयार आंबे सांगली मार्केटला नेईन म्हणणारा एक वाहक तयार झाला. टेंपोमालकही तयार. आंबे एक, दोन डझनच्या खोक्यात भरले. तेथून निघाल्यानंतर एक वाट पोलीसांनी अडवली. दुसऱ्या वाटेवरही तेच झाले. तिसऱ्या ठिकाणीही प्रवेश बंद. भरलेला टेंपो परतला. आंबे बागायतदार चिंतेत. पंतप्रधान मोदी यांनी एकवीस दिवसांची संचारबंदी जाहीर केली. हापूसचा घमघमाटी दरवळ टेंपोतून चहूकडे येऊ लागला. मी चिंता वाढत असताना एक बातमीऐकली. ‘किराणा माल, भाजीपाला, शेतीमाल, फळे इत्यादी आणण्यास परवानगी’. माझ्या पत्रकार मित्राने समस्त शासकीय उच्चाधिकाऱ्यांचे फोन नंबर दिले. आमदार, खासदार, राजकीय नेते इत्यादींच्याफोनने पान भरले. लोकप्रतिनिधींपासून सुरवात केली. ‘आंबा तयार झाला आहे, झाडावर पिकायला सुरुवात होईल, पिकून खाली पडला, की संपले. सर्व मातीमोल. पिकून पडलेला आंबा म्हणजे नासलेले दूध. दूध हा नाशिवंत पदार्थ. आंबा हे नाशिवंतच फळ आहे. अन्य कोणतेही उत्पन्न नसलेल्या आंबा उत्पादकांचे एकमेव साधन. त्यांना मार्गदर्शन करा’. यंत्रणा हलली. दुसऱ्या दिवशी मी सर्वांना फोन करुन नको नको जीव केले. “मार्गदर्शन करा”. लोकप्रतिनिधींचे फोन सुरु झाले. आपण किती किती करत आहोत, आंब्याची वाहतूक अडवली जाणार नाही असे स्पष्ट तोंडी आश्र्वासन. आम्ही लेखी आदेश, परवानगी हातात हवी असा आग्रह धरला. कोणी जी आर निघाला म्हणतोय तर मग “जी आर नंबर सांगा” तो कोणाकडेही नव्हता. सरकारकडून कोणताही जी आर नाही हे स्पष्ट झाले. प्रांताधिकाऱ्याने जी आर नसल्याचे सांगितले. मी थेट फोनवरून जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क केला. “तुम्ही तालुक्याच्या कृषीअधिकाऱ्याला भेटा. सर्व तपशील द्या. तो एक पास देईल, तो दाखवा. पुढची मार्केटची आरोग्य यंत्रणा सतर्क केली आहे”. आज सकाळी आमची टीम राजापूर गाठून पास हाती मिळाला, की सांगली मार्केटच्या वाटेवर चालकाला रवाना करणार. सर्व अधिकाऱ्यांचे आभार.
– राजा पटवर्धन9820071975
———————————————————————————————-———
राजा पटवर्धन
राजा पटवर्धन हे ‘थिंक महाराष्ट्र’च्या ‘सोलापूर जिल्हा संस्कृतिवेध’ मोहिमेत कार्यकर्ते म्हणून सामील होते. त्यांनी ‘महाराष्ट्र टाईम्स’मध्ये आंबा विषयावर पुरवणी लिहिली होती. त्यांचे अणुशक्तीवर ‘जैतापूरचे अणुमंथन’ हे पुस्तक आहे. त्या पुस्तकाला राज्य शासनाचा यशवंतराव चव्हाण वाङ्मय पुरस्कार मिळाला आहे. त्यांचे अलीकडेच ‘पुनर्शोध महाभारता’चा पुस्तक प्रसिद्ध झाले आहे. राजा पटवर्धन यांचा जन्म जैतापूरच्या प्रकल्प परिसरातील जानशी गावातला. ते जैतापूरच्या हायस्कूलमध्ये नववीपर्यंत शिक्षण घेऊन पुढील शिक्षणासाठी मुंबईत आले. त्यांनी शिक्षण झाल्यानंतर रासायनिक उद्योगात नोकरी केली. ते कोकण विकास, देशापुढील आर्थिक प्रश्न आणि विशेष करून ऊर्जा समस्या यांबद्दल लिखाण व व्याख्याने करत असतात. त्यांचा हा लेख.
राजा पटवर्धन हे ‘थिंक महाराष्ट्र‘च्या ‘सोलापूर जिल्हा संस्कृतिवेध‘ मोहिमेत कार्यकर्ते म्हणून सामील होते. त्यांचे अणुशक्तीवर ‘जैतापूरचे अणुमंथन’ हे पुस्तक आहे. त्या पुस्तकाला राज्य शासनाचा यशवंतराव चव्हाण वाङ्मय पुरस्कार मिळाला आहे. त्यांचे अलीकडेच ‘पुनर्शोध महाभारता‘चा पुस्तक प्रसिद्ध झाले आहे. राजा पटवर्धन यांचा जन्म जैतापूरच्या प्रकल्प परिसरातील जानशी गावातला. त्यांनी शिक्षण झाल्यानंतर रासायनिक उद्योगात नोकरी केली. ते कोकण विकास, देशापुढील आर्थिक प्रश्न आणि विशेष करून ऊर्जा समस्या यांबद्दल लिखाण व व्याख्याने करत असतात.