अजिंठा लेणी या अद्भुत लेणींचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. मात्र या लेणींचे महत्त्व वेगळ्या प्रकारे नोंदवण्यास ‘थिंक महाराष्ट्र’ला आनंद होत आहे. अजिंठ्याचे महत्त्व आणि वैशिष्ट्य अधोरेखित करण्याच्या उद्देशाने सांस्कृतिक ठेवा म्हणून अत्यंत अनमोल असलेल्या या लेण्यांचेसौंदर्य, त्यांची रचना आणि विशेष म्हणजे तत्कालिन कलाकारांचा वास्तुरचनेतील खगोलशास्त्रीय दृष्टीकोन अशी त्रिवेणी माहिती आज ‘थिंक महाराष्ट्र’कडून प्रसिद्ध केली जात आहे.
अजिंठा लेणी या अद्भुत लेणींचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. मात्र या लेणींचे महत्त्व वेगळ्या अंगाने नोंदवण्यास ‘थिंक महाराष्ट्र’ला आनंद होत आहे. प्रकाश पेठे यांनी सुमारे चाळीस वर्षांपूर्वी अजिंठा लेणींना भेट दिली. त्या वेळी त्यांना जाणवलेले, भावलेले या लेणींचे अभूतपूर्व सौंदर्य आणि तेथील गूढ वातावरणाचा त्यांच्यावर झालेला परिणाम त्यांनी तितक्याच सुंदर शब्दांत येथे नोंदवला आहे. सोबत राजेंद्र शिंदे यांनी या लेणींची रचना, कला आणि तेथील जातककथांबद्दल विविध पुस्तकांतून शोध घेऊन तयार केलेला मजकूर प्रसिद्ध करत आहोत. सौंदर्य आणि कलेचा उत्तम आविष्कार असणारी ही लेणी खगोलशास्त्रीय दृष्टीकोनातून तितकीच महत्त्वाची आहे. पराग महाजनी यांनी पुरातत्व शास्त्राचे प्राध्यापक अरविंद जामखेडकर यांसोबत अजिंठा लेण्यांचा खगोलशास्त्रीय दृष्टीकोनातून वेध घेतला. त्याचीही माहिती प्रसिद्ध करण्यात येत आहे.
जगप्रसिद्ध अजिंठा लेणी म्हणजे केवळ चित्रकला किंवा कोरीव शिल्पकलेचा नमुना नव्हे तर बदलत्या आधुनिक काळात ही शांततापूर्ण चांगलं जीवन जगण्याचा संदेश देणारे एक ठिकाण असल्याचे मत अजिंठा लेणी येथे जानेवारी 2011मध्ये पार पडलेल्या राष्ट्रस्तरीय अजिंठा परिषदेत अजिंठा अभ्यासकांनी मत व्यक्त केले आहे. हजारो वर्षांपूर्वी घडवण्यात आलेली ही लेणी भारतीय संस्कृतीचा अनमोल ठेवा आहे. जो जतन करणं ही आपली व पुढील पिढ्यांची जबाबदारी आहे. या लेणींमध्ये कोरण्यात आलेली शिल्पे, चितारण्यात आलेली भित्तीचित्रे, त्यातून व्यक्त झालेल्या कल्पना, येथील वास्तुकला अशा अनेक गोष्टी अभ्यासण्यासारख्या आहेत. म्हणूनच अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठा चे प्राध्यापक वॉल्टर स्पिंक्स गेली चाळीस वर्षे सातत्याने अजिंठ्याला भेट देऊन या लेण्यांचा अभ्यास करत आहेत.
अजिंठ्याचे महत्त्व आणि वैशिष्ट्य अधोरेखित करण्याच्या उद्देशाने सांस्कृतिक ठेवा म्हणून अत्यंत अनमोल असलेल्या या लेण्यांचे सौंदर्य, त्यांची रचना आणि विशेष म्हणजे तत्कालिन कलाकारांचा वास्तुरचनेतील खगोलशास्त्रीय दृष्टीकोन अशी त्रिवेणी माहिती आज ‘थिंक महाराष्ट्र’कडून प्रसिद्ध केली जात आहे. तथापी ही सर्व माहिती परिपूर्ण असेलच असे नाही. वाचकांनी सहभाग दर्शवून ही माहिती अधिक सघन करण्यास मदत करावी.
– संपादक
info@thinkmaharashtra.com