कुस्ती स्पर्धा दरवर्षी 14 जानेवारी (मकर संक्रातीला) पासून सलग तीन दिवस असते. स्पर्धेत साडेसातशे-आठशे स्पर्धक असतात. स्पर्धेसाठी कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, नगर, जळगाव, पुणे आणि उर्वरित महाराष्ट्रातून पैलवान येतात. दिल्ली, पंजाब, हरियाणा या राज्यांतूनही स्पर्धक स्पर्धेत भाग घेतात. स्पर्धा पंचवीस किलोपासून पुढे खुल्या गटात खेळवल्या जातात. कुस्ती स्पर्धेसाठी आठ ते दहा लाखांपर्यंत बक्षिसे दिली जातात. प्रथम क्रमांक मिळवणाऱ्यास त्रिमूर्ती चषक दिला जातो. स्पर्धेत खेळलेले पैलवान पुढे ‘महाराष्ट्र केसरी’चे पैलवान म्हणून तयार झाले. मगराचे निमगाव येथील छोटा रावसाहेब मगर, तानाजी बनकर, मुंबई महापौर केसरी तानाजी माने इत्यादी पैलवान राज्य पातळीवर महाराष्ट्र केसरी झाले. त्याचप्रमाणे हिरामण बनकर हा ‘महाराष्ट्र केसरी’ शिवतीर्थ आखाड्यातून तयार झाला.
महाशिवरात्रीला खुल्या कुस्ती, मैदानी कुस्त्या लावल्या जातात.
जयसिंह मोहिते पाटील यांनी ग्रामीण भागातील कुस्ती या खेळाची जोपासना केली. तशीच जोपासना करण्याचा नेहमी प्रयत्न केला जातो. मदनसिंह मोहिते-पाटील यांनी त्यांची स्वत:ची तालीम तयार करून मुलांना प्रशिक्षण दिले. कुस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी गावोगावी तालमी बांधून दिल्या आहेत. व्यायाम साहित्य उपलब्ध करून दिले आहे.
(माहिती स्रोत – वसंत पांडुरंग जाधव, 9960002462)
– गणेश पोळ