हिंगोली

0
29

हिंगोली हा महाराष्ट्राच्या मराठवाड्यातील जिल्हा आहे. परभणी ह्या जिल्ह्यातून विभागून १ मे १९९९ रोजी हिंगोली हा स्वतंत्र जिल्हा तयार झाला आहे. हिंगोली हा त्यापूर्वी तालुका होता. हिंगोली जिल्ह्यामध्ये संत नामदेव महाराज यांचा जन्म नर्सी (नामदेव) येथे झाला. तसेच, महाराष्ट्रातील बारा ज्योतिर्लिंगातील आठवे ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ त्या जिल्ह्यात आहे. हिंगोलीमध्ये मुख्य व्यवसाय शेती आहे. हिंगोली जिल्ह्याच्या बाजूस नांदेड, परभणी, यवतमाळ व वाशीम या जिल्ह्यांच्या सीमा आहेत. हिंगोली हा महाराष्ट्राच्या मराठवाडा विभागातील शेवटचा जिल्हा आहे.

About Post Author