सोलापूरचा किल्ला नक्की केव्हा बांधला याबद्दल मतभिन्नता आढळते. कॅम्पबेल यांच्या मते बहामनी बादशहा महंमदशहा याने तो 1358 ते 1375 या दरम्यान बांधला असावा तर डॉ. हंटर यांच्या मते, तो 1345 मध्ये बांधला असावा. तोरो यांच्या मताप्रमाणे, हसन गंगू बहामनी याने बाहेरील कोट 1313 मध्ये तर आतील कोट हिंदू राजांनी बाराव्या शतकात बांधला आहे. सोलापूरचे मल्लिकार्जुन पाटील यांनी हा किल्ला इ.स. 1456 साली बांधला असे मत नोंदवून ठेवले आहे. दुसरा महंमदशहा बहामनी (1466 ते 1482) यांचा हुशार दिवाण महमद गवान याने सोलापूर व परांडा हे दोन्ही समान बांधण असलेले किल्ले एकाचवेळी बांधले असावे, असे काहींचे मत आहे.
सोलापूरच्या भुईकोट किल्ल्यात हेमाडपंथी अवशेष आढळतात. त्या किल्ल्यात पूर्वी तीनशे घरे होती. उत्तरेच्या भिंतीत बुजलेले देऊळ आढळते. त्याचे उत्खनन 1919 साली झाले व ते चालुक्य देवालय असल्याचे कळले. तेथे हिंदू स्थापत्यकलेची ओळख सांगणारी शिल्पे कोरलेली दिसतात.
मुघल बादशहा औरंगजेब १६८५-८६ या काळात सुमारे वर्षभर या किल्ल्यावर राहिला होता. येथेच त्याच्या टांकसाळीतून चांदीची नाणी निर्माण झाल्याचे पुरावे आढळतात. ती नाणी कोलकता येथील म्युझियममध्ये आढळतात. १७९५ ते १८१८ या काळात हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात होता. दुसरा बाजीराव पेशवा यांचा निवास या किल्ल्यावर होता. इंग्रजांनी सोलापूरवर आक्रमण करून बाजीरावाचा पाडाव मे, १८१८ मध्ये केला.
Solapur kille
Solapur kille.
Comments are closed.