सांगली ही देशातीलच नव्हे तर जगातील हळदीची प्रमुख बाजारपेठ आहे. त्या परिसरात पिकली जाणारी दर्जेदार राजापुरी हळद, हळदीचा दर्जा वर्षानुवर्षे टिकवून ठेवणारी जमिनीखालची पेवांची व्यवस्था, पेवांतील हळदीची आकडेआकडी (बिल टू बिल) खरेदी-विक्री, सांगलीचा हळद वायदेबाजार, बँकांकडून हळदीचे पॉलिश अन् पावडर यांसाठी मिळणारे अर्थसाहाय्य, त्या परिसरात उभारलेल्या हळद पावडर आणि पॉलिश मिल्स-वेअरहाऊस-गोडाऊन्स, वाहतूक कंपन्या, अडते, खरेदीदार आणि हमीदार व्यवस्था इत्यादी घटक सांगली हे देशभरातले हळद केंद्र बनण्यास महत्त्वपूर्ण ठरले. व्यापा-यांनी व्यवहारात ठेवलेली सचोटी आणि सत्वर पेमेंटची व्यवस्थाही हळद व्यापार-वृध्दीस लाभदायक ठरली.
हळद ही मुळात बहूपयोगी आहे. हळद हा मसाल्याच्या पदार्थांतील प्रमुख घटक म्हणून मानला जातो. देशातील सर्व राज्यांत हळदीचे पीक घेतले जाते. हळदीचे पीक महाराष्ट्रातील सांगली, कराड, वाई, तुळजापूर, बार्शी, नांदेड ; आंध्र प्रदेशात कडाप्पा, दुग्गीराळा, निझामाबाद, मेट्टापल्ली, राजमहेंद्री, कोडू, राजमपेठ आणि नंद्याळ; तामिळनाडूत इरोडे, सालेम आणि कन्नूर; बिहारात बेटीया, दलसिंगराणी; ओरिसात ब्रह्मपूर या प्रदेशात सर्वाधिक घेतले जाते.
भारतात हळदीचे उत्पादन व्यापारी अंदाजानुसार १९४० साली आठ लाख पोती, १९५० ते ६० या दशकात प्रतिवर्षी दहा ते बारा लाख पोती, १९६० ते ७० या दशकात प्रतिवर्षी चौदा ते सोळा लाख पोती, १९७० ते ८० या दशकात प्रतिवर्षी वीस लाख पोती, १९८० ते ९० या दशकात तीस ते बत्तीस लाख पोती आणि २००१ ते २००८ या काळात प्रतिवर्षी चाळीस लाख पोती झाले. हळदीचे उत्पादन २००९ साली साठ लाख पोती झाले होते. त्यांतील आठ ते दहा लाख पोत्यांच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार सांगली बाजारपेठेतून झाल्याचा अंदाज आहे.
सांगलीच्या हळद व्यापाराने २००९ साली शंभर वर्षे पूर्ण केली. तेथील काही व्यापार्यांनी एकत्र येऊन १९१० साली हळदीचा वायदे बाजार सुरू केला. त्या वेळी व्यापारी एकमेकांच्या शब्दावर विश्वास ठेवून वायदे व्यापाराचे व्यवहार करत. व्यवहारांचे नियंत्रण करणारी संस्था वा पैशांच्या देवघेवीसाठी क्लिअरिंग हाऊसची सोय त्या वेळी नव्हती. कायद्याचेही नियंत्रण नव्हते. स्वातंत्र्यानंतर फॉर्वर्ड कॉण्टॅक्टस (रेग्युलेशन) अॅक्ट १९५२ साली अमलात आला. त्यापासून प्रेरणा घेऊन सांगलीच्या व्यापारी मंडळींनी वायदे व्यवहाराचे आयोजन व नियंत्रण करण्यासाठी ‘द स्पायसेस अँड ऑईल सीडस एक्स्चेंज लि.’ या कंपनीची स्थापना केली. ती ११ सप्टेंबर १९५३ रोजी कंपनी अॅक्टखाली नोंदण्यात आली. भारत सरकारने २३ एप्रिल १९५६ रोजी प्रत्यक्षात वायदे व्यापाराचे नियंत्रण करण्यास परवानगी दिली.
हळद वायदेबाजारात शेंगतेल आणि हळदीचा व्यापार प्रथम सुरू झाला. तेव्हा हळदीचा वायदेबाजार आणि शेंगतेलाचा व्यापार हेच तेथील व्यापाराचे मुख्य व्यवहार होते. व्यापारी हळदीचा वायदेबाजार महाजन दौल नावाच्या इमारतीत करत असत. हळद वायदे व्यापाराचे आयोजन व नियंत्रण करणारी भारत सरकारची मान्यताप्राप्त अशी भारतातील ती एकमेव संस्था. अमेरिकेसारख्या प्रगत देशात अनेक शेतीमाल वस्तूंचे वायदे व्यापार चालतात ; पण तेथेही हळदीचा वायदा चालू असल्याचे ऐकिवात नाही. विशेष म्हणजे सांगलीच्या या कंपनीचा स्वत:चा हळद व्यापार-उद्योग व्यवहार नाही. कंपनीचा कारभार संचालक मंडळ पाहते. त्यात भारत सरकारच्या नियुक्त संचालकाचाही अंतर्भाव असतो. एकेकाळी रूईचा व्यापार करणारे व्यापारी न्यू यॉर्क कॉटन फ्युचरचा भाव काय असे विचारून त्या आधारे आपला दर निश्चित करत असत. त्याच धर्तीवर, देशातील हळद व्यापारी सांगलीचा भाव काय? हे विचारून हळदीचा व्यापार करू लागले आणि सांगलीच्या हळद बाजारास देशात महत्त्वाचे स्थान लाभत गेले. ती बाजारपेठ २००५च्या महापुराने निस्तेज बनवली.
सांगलीच्या स्पाइसेस अॅण्ड ऑइलसीड्स एक्स्चेंज लिमिटेडचे अध्यक्ष बनवारीलाल नेमाणी म्हणाले, की सांगली हळद बाजारपेठ जागतिक दर्जाची होती. वर्षाला एक हजार टन हळद जपानला निर्यात होत असे. सांगलीच्या राजापुरी हळदीतून चोरा नावाच्या तेलाची निर्मिती होते. त्या तेलापासून चेह-याला लावण्याची आयुर्वेदिक उत्पादने बनवली जातात. त्यामुळे ती केरळलाही पाठवली जायची. सांगलीची त्यांची संस्था, बॉम्बे ऑईल एक्स्चेंज, बॉम्बे एरंडा एक्स्चेंज, अहमदाबाद एरंडा एक्स्चेंज, इंदूर सोयाबिन एक्स्चेंज, कोचिन ऑईल एक्स्चेंज, इत्यादी संस्था भविष्यकाळात एकत्र येऊन हळदीसह देशातील आयुर्वेद व जीवनोपयोगी घटकांचा वायदेबाजार व विक्री व्यवस्थेसाठी प्रयत्न करणार आहेत. तसा प्रस्ताव भारत सरकारकडे गेल्याचेही त्यांनी सांगितले.
सांगलीचे हळदक्षेत्रातील जुने, जाणकार व्यापारी गोवर्धनदास नेगांधी म्हणाले, की सांगलीच्या हळद बाजारपेठेच्या नुकसानीस महापूर हे कारण आहे; तसेच, हळद हंगामासाठी लेबर अॅक्ट लागू झाला हेही कारण ठरले आहे. या कायद्यामुळे कामाच्या वेळेवर व म्हणून हळदीची सत्वर उलाढाल, ने-आण व्हायची त्यावर बंधने आली. हळद पॉलिश वा पावडर करण्याची गती धिमी झाली. मालाचा सत्वर पुरवठा करणे अडचणीचे ठरले. ऊस, द्राक्षे या नगदी पिकांची लागण झाल्याने शेतकरी हळद पिकाच्या निर्मितीकडे दुर्लक्ष करू लागले. हळद पीक कालावधी नऊ महिन्यांचा असल्याने शेतकरीवर्ग त्या पिकावर नाखूष आहे.
हमालीचे ओझे उचलण्याचे काम असल्याने कामगारांना कंबर व गुडघेदुखीचा त्रास होतो. हळद मोसमाच्या काळात दिवसाला कधी शंभर रुपये तर कधी दोनशे रुपये, तर कधी त्यापेक्षा जास्त पैसे मिळतात. हमालांच्या बायकांनाही गोडाऊनमध्ये हळद निवडण्याचे काम मिळते. त्या हळद कणी, मोठी व मध्यम अशा तीन प्रकारांत निवडतात.
हळद व्यापारी उत्तमभाई शहा म्हणाले, की १९६० साली व्यापार नव्या मार्केट यार्डात गेला. व्यापार्यांना व्यापारासाठी सुविधा मिळाल्या. विशेषत: बँकांचे सहकार्य मोठया प्रमाणात लाभल्याने परदेशातून हळदीची मागणी येताच बहात्तर तासांच्या आत हळद पॉलिश करून विदेशी जाण्यासाठी बंदरावर हजर असायची. उत्तर भारतातील बाजारपेठ सांगलीच्या हळदीच्या भावावर ठरत होती. सांगली, कवठे महांकाळ, जत, कराड, मसूर, उंब्रज, वाई या भागांत राजापुरी आणि कोपरा या दोन दर्जेदार पध्दतीच्या हळदपिकांचे उत्पादन घेतले जायचे. हळदीमध्ये हळद कुंड, गठ्ठा, बीज, सोरा, चोरा, कोच्या अशा वेगवेगळ्या प्रकारचे पीक घेतले जाते. हळद ही नैसर्गिक असल्याने पिवळा व नारिंगी रंगांसाठी तिचा उपयोग केला जातो. कॅन्सरच्या संशोधनात म्हैसूर लॅबोरेटरीने हळद उपयुक्त ठरवली आहे. सौंदर्यप्रसाधनांच्या निर्मितीत जपान, अमेरिका व युरोपमध्ये हळदीचा वापर सुरू झाला आहे.
सांगलीचे हळदीचे बडे व्यापारी शरद शहा म्हणाले, की सांगली व कोल्हापूरच्या आसपास दोनशे किलोमीटरच्या परिसरात राजापुरी हळदीचे उत्पादन होते. हळद निर्यातीसाठी राजापूर बंदरातून बाहेर जात होती, म्हणून त्या हळदीला राजापुरी हळद असे संबोधले जाऊ लागले. जगातील बाजारात केमिकलचे रंग वापरण्यास बंदी आल्याने नैसर्गिक रंग म्हणून हळदीचा वापर वाढला आहे. त्यामुळे हळदीच्या पिकाला भविष्यकाळात पुन्हा चांगले दिवस येतील. त्या भागातील हवामान, पाणी व पिकाचा दर्जा, जमीन यांमुळे हळदीला तेथे पुन्हा महत्त्व येईल असा त्यांना विश्वास आहे.
सांगलीत हळदीचे पॉलिश व पावडर बनवणारे चाळीस कारखाने आहेत. सांगलीत दहा कोटी रुपये खर्चाचा, आंतरराष्ट्रीय निकषांवर आधारित अत्याधुनिक कारखाना २००९ साली सुरू झाला आहे. जगाच्या बाजारपेठेत कुठेही माल वेळेत पोच करण्याची व्यवस्था केली गेली आहे. देशात पंजाब, आसाम व मध्यप्रदेश; तसेच चीन, व्हिएतनाम व ब्रह्मदेशात हळदीचे पीक घेण्याचा प्रयत्न तिथला शेतकरी करत आहे. मात्र अजून त्यांना म्हणावे तसे यश लाभलेले नाही.
सांगलीत गेली बारा वर्षे हळद व्यवसायात हमाली करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणारे विलास तातोबा चोरमुले हे मूळचे कवठे महांकाळ तालुक्यातील दुधेभावी गावचे. त्यांचे शिक्षण पाचवीपर्यंत झाले आहे. विलास चोरमुले म्हणाले, की त्यांच्या परिसरात दुष्काळी परिस्थिती असल्याने जगण्याचे साधन नाही. म्हणून सांगलीला यावे लागले. सांगलीच्या मार्केट यार्डात त्यांच्या गावातील तब्बल चारशे लोक हमालीचा व्यवसाय करतात. सांगलीच्या मार्केट यार्डात एकूण दोन हजारांहून अधिक लोक हमाली काम करतात.
(हळदीचा दर २००७ साली क्विंटलला साडेतीन हजार रुपये होता. तो त्यानंतरच्या वर्षी, एकदम पंधरा हजार रुपये झाला. २०११ साली हळदीचा दर एकवीस हजार रूपये क्विंटलपर्यंत गेला. त्यामुळे २०१२ साली हळदीची लागवड वाढल्याचे निदर्शनास आले.)
हळदीची जी धूळ असते ती खंडोबाचा भंडारा म्हणून वापरली जाते. तसेच, त्या धुळीपासून कुंकू आणि बुक्का तयार केला जातो.
अशोक मेहता,
प्लॉट क्र. २७,पत्रकारनगर,
एस.टी. स्टॅंडच्या मागे, सांगली – ४१६४१६
९८८१६५८३५३,
ashok.mehta94@yahoo.com
श्री अशोक मेहता,
श्री अशोक मेहता,
प्लॉट क्र. २७,पत्रकारनगर,
एस.टी. स्टॅंडच्या मागे, –
स.न.वि.वि.
आपला थिंक महाराष्ट्र या ब्लॉगवरील ‘सांगलीची हळद बाजारपेठ’ हा सचित्र लेख वाचाला मला तो खूप आवडला . आपणास लगेच मेल केला फोनवरही तुमच्याशी बोलणे झाले.तुम्ही आपुलकीने माझ्या चौकशीला आस्था दाखवून मला मदत करण्याचे सहकार्य केले त्याबद्दल आभारी आहे.
सु.मा. कुळकर्णी, जिल्हा प्रतिनिधी , दैनिक महाराष्ट्र टाईम्स,नांदेड .9226118836
kup chgli mahite badle
kup chgli mahite badle dhanawad
मला हळद सांगली येथे विकनेसाठी
मला हळद सांगली येथे विकनेसाठी आनायला परवाडेल का आज काय भाव आहे.आपला लेख वाचला तेथून प्रेरणा मिळाली.
धन्यवाद
धन्यवाद
मी हिंगोली जिल्ह्यात राहतो,
मी हिंगोली जिल्ह्यात राहतो, माझेकडे शलम जातीची हळद आहे, सांगली येथे काय भाव आहे
हळद विक्री करावी कि ठेवावी
हळद विक्री करावी कि ठेवावी पुढील भाव कसे राहतील
हलद विकावे कि ठेवावी पुढील
हळद विकावी कि ठेवावी? पुढील भाव काय राहतील? 9923518495
पुढील भाव काय राहतील?
पुढील भाव काय राहतील?
Olli Haldi parchesh kadi
Oli Haldi purchase kadhi karaychi?
मी, वाशिम जिल्हयामधील शेतकरी
मी, वाशिम जिल्हयामधील शेतकरी असून, माझ्याकडे शेलम जातीची हळद आहे, ती आपल्या सांगली हळद मार्केटमध्ये विकण्यासाठी आणावयाची असून तरी कृपया आपला बाजारभाव मला सांगण्यात यावा. मो. 9145358040, 9158773772.
हाळदीला सदाचे भाव काय आहे त
हळदीला सध्याचे भाव काय आहेत? 9689585317
हळद वाडेल का सेलम जात आहे
हळद वाढेल का? सेलम जात आहे माझ्याकडे. 9881162945
आजचे हळद भाव काय आहेत
आजचे हळद भाव काय आहेत?
श्री अशोक मेहता, प्लॉट क्र.
श्री अशोक मेहता, स.न.वि.वि. आपला थिंक महाराष्ट्र या ब्लॉगवरील ‘सांगलीची हळद बाजारपेठ’ हा सचित्र लेख वाचला. मला तो खूप आवडला .
bazar bhav sangnyat
bazar bhav sangnyat yava 9921450686
मी हिगोली जिल्ह्याचा रहिवाशी
मी हिंगोली जिल्ह्याचा रहिवाशी आहे तरी माझी हळद विक्रीला तयार आहे. भाव कसे आहेत व कधी विकावी?
मी,ता.औंढा नागनाथ जि.हिंगोली
मी. ता.औंढा नागनाथ जि. हिंगोली येथील शेतकरी असून माझ्याकडे व माझ्या इतर शेतकरी बांधवांकडे शेलम जातीची हळद आहे. ती सांगलीच्या बाजारात आणायचा विचार आहे. तरी कृपया तेथील हळद बाजार भाव व खरेदी केंद्र पत्ता सांगण्यात यावा ही नम्र विनंती.
मो.क्रं.९६८९९७९८४९/९५६१८१८९६५
मित्रानो मि शेतकरी कुटूंबातला
मित्रांनो, मी शेतकरी कुटूंबातला असून मी मागणीनुसार परदेशात हळद व हळकुंड पाठवतो. संपर्क 8390336688
पुढील भाव काय राहातील
पुढील भाव काय राहातील
आंबि हळद म्हणजे काय
आंबि हळद म्हणजे काय
माझ्या कडे सेलम जातीची हळद
माझ्या कडे सेलम जातीची हळद आहे मला हळद विकायची आहे तरी भावाची माहिती देण्यात यावी 9922300857
मि जालना जिला तला आहे माझा
मि जालना जिला तला आहे माझा जवळजवळ 40 0 kg सेलम हा आहे मला भाव सांगा 8275270941 9404505446
2017 मध्ये हळदीचा दर काय
2017 मध्ये हळदीचा दर काय निघेल ते सांगा
haldi cha kay bhav chalu aahe
haldi cha kay bhav chalu aahe
माझ्या कडे सेलमधल्या जाती चि
माझ्या कडे सेलमधल्या जाती चि हळदीची आहे
माझ्याकडे हळद आहे सध्याचे
माझ्याकडे हळद आहे सध्याचे हळदीचे भाव काय ?भाव वाढतील काय? विकावे ठेवावे कृपया मार्गदर्शन करावे..
सर मला 2000 सालापासून हळदीचे
सर मला 2000 सालापासून हळदीचे भाव मिळू शकतील का
Kachhi halad vikaychi aahe…
Kachhi halad vikaychi aahe
Mo. 7030277752
Comments are closed.