संरक्षित घर

0
33

2009माणसाला आपल्या जीव-जुमल्याचे संरक्षण करण्याची फिकीर कोणत्याही काळात असते. आज मुंबई-पुण्यात सुरक्षित गृहसंकुले बांधण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. चहुबाजूंनी कोट असतो. प्रवेशद्वारावर गुरखा असतो. आलेल्या पाहुण्याची चौकशी केल्यावर त्याला आत सोडले जाते. अनेक ठिकाणच्या कंपाउंडच्या भिंती आठ फूट उंच असतात. तसाच हा नाशिकचा जुना वाडा. भुरटया चोरांपासून रक्षण करणारा. याच्या तळमजल्यावरच्या भिंती भक्कम दगडाच्या आहेत. तळमजल्यावर खिडक्यांच प्रमाण कमी असून वाड्यात शिरण्यास एकच दरवाजा आहे.
पैठणचा वाडा, मे 1979.

तसेच हे पैठणचेही एक जुने घर. वास्तविक पैठण आणि नाशकात पुष्कळ अंतर आहे.तरीही गृहसंरक्षणाची कल्पना बदललेली दिसत नाही. तसं पैठणमधलं एका माहेश्वरी कुटुंबाचं हे घर. ते तीनशे वर्षांपूवी बांधलं गेलं आहे. असं कळलं. जसा काही किल्लाच! या घरातही चौक आहे. तळमजल्यावरच्या भिंती दगडाच्या आहेत आणि खिडक्या नाहीत. प्रवेशद्वारातून आत गेलं की चौक आहे. मोठ्या कुटुंबाला दोन वर्षें पुरेल इतक्या धान्याचा साठा करायची सोय आहे. या घरातलं स्वैपाकघर मोठं असून चुलीतला धूर निघून जाण्यासाठी उंच छताखाली खिडक्या आहेत. या घराचे प्रवेशद्वार किल्ल्याच्या दरवाजासारखे आहेमुंबईतलं अल्टामाऊटं रोडवरील बांधलं जात असलेलं मुकेश अंबानींचं घर. याची उंची 173 मीटर असेल. ते शिकागोच्या पर्किन्स आणि विल यांनी डिझाईन केलं आहे.या घरावर आधुनिक काळाप्रमाणे हेलिकॉप्टर उतरवण्याची सोय आहे. त्यात पाहुणे, पोहण्याचा तलाव, जिम, आरोग्य केंद्र, बगिचे, करमणुकीची साधनं असतील. सिनेमा पाहण्याची सोय असेल. याचा खर्च दोनशें कोटी डॉलर्स येईल असा अंदाज आहे. ह्याचं संरक्षण करायला पाच-पंचवीस पहारेकरी असतील.खालचे पाच-दहा मजले पार्किंग व अशा सोयींसाठीच जाणार आहेत. अंबानी कुटुंब सर्पहल्ला पासून बचावासाठी संरक्षित झालेल्या जनमैजयासारखं तिथे राहील.

संदर्भ : www.luxemag.org/real-estate/mukesh-ambani-house.html – www.rediff.com

About Post Author

Previous articleतुरुंगातले काव्य
Next articleलेखसूची..
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.