संपादकीय

1
36

चित्रकार रघुवीर मुळगावकर यांनी महाराष्ट्राचे कलाजगत एके काळी फार गाजवले.  त्यांची शंभर मुद्रित चित्रे मुंबईचे विनय काळे यांच्या संग्रहात आहेत. त्याबाबतची माहिती ‘थिंक महाराष्ट्र’वर दोन आठवड्यांपूर्वी सादर करताच जगभरातून विचारणांचा व प्रतिक्रियांचा पूर लोटला. ‘थिंक महाराष्ट्र’ची अपेक्षा अशी आहे, की रसिकांनी त्याबाबतची किंबहुना या साइटवर येणा-या सर्व मजकुराबाबतची अधिक माहिती आमच्याकडे पाठवावी. उदाहरणार्थ, डॉ. रवीन थत्ते ह्यांचे ‘ओबडधोबड ज्ञानेश्वरी’ हे पुस्तक केशव भिकाजी ढवळे या संस्थेतर्फे गेल्या आठवड्यात प्रसिद्ध झाले. त्यावेळी ज्योती ढवळे भेटल्या. त्यांनी ह्या संदर्भात अधिक माहिती दिली त्यात म्हणाल्या, की रघुवीरांनी ढवळे प्रकाशनासाठी पुस्तकांची सात-आठ मुखपृष्ठे केली आणि ती मूळ स्वरूपात त्यांनी फ्रेम करून ठेवली आहेत. विनय काळे यांच्या चित्रसंग्रहाबाबत औत्सुक्य असल्यास त्यांचा ईमेल – vinaykale7@gmail.com

हीच गोष्ट ‘डुडुळगावच्या कमळबागे’ची. त्याबाबत वाचक-प्रेक्षकांना बरेच कुतूहल दिसून आले. सतीश गदिया ह्यांचा कमळांच्या बागेचा ध्यास आहे. ते कमळासंबंधी माहिती गोळा करत आहेत. त्यांच्या ह्या शोधाला आपण आपल्याकडे काही विशेष माहिती असेल तर ती पुरवून सहाय्य करू शकतो. किंबहुना, वेबसाईटच्या माध्यमाची ती ताकद आहे – अनेकांच्या सहभागातून माहितीची परिपूर्णता साधणे! ‘थिंक महाराष्ट्र’ला ते अभिप्रेत आहे.

वाचक-प्रेक्षक पुढील पत्त्यावर thinkm2010@gmail.com किंवा ‘थिंक महाराष्ट्र’, पूजासॉफ्ट हाऊस, यु-१२८, दुर्गामाता मंदिराजवळ, सेक्टर -४, ऐरोली, नवी मुंबई – 400708 आपले लेखन पाठवू शकता.

संपादक म्हणून माझ्याशीही संपर्क साधता येईल.dinkarhgangal@yahoo.co.in, Tel: (022) 25221648, 9867118517

नोंदी म्हणून ‘सांस्कृतिक’मध्ये नवा विभाग देत आहोत. वेगवेगळ्या लेखांत जे शब्द वा व्यक्ती ऐतिहासिक व पारंपरिक महत्त्वाच्या असतात, त्यांच्याबाबत अधिक तपशिलातील माहिती तेथे मिळते. उदाहरणार्थ ‘वास्तवातील नवलाई’मध्ये जेजुरीवरील टिपणात संबळचा उल्लेख आला तर ती नोंद तेथे आहे व तळेगावसंबंधीच्या लेखात गो.नी. दांडेकरांचा उल्लेख अटळपणे येणार; तर तो लेख ‘नोंदी’मध्ये येईलच. अशा नोंदी काढत जाऊन महाराष्ट्राचे ‘संचित’ येथे तयार होईल असे अभिप्रेत आहे.

दिनकर गांगल
  संपादक

About Post Author

Previous articleशिक्षण, निर्णयक्षमता आणि मूल्ये
Next article‘चाळेगत’ – नेमाडेपंथातील नवी पिढी
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.

1 COMMENT

  1. Waril mahiti wachali. Tya tya
    Waril mahiti wachali. Tya tya vyaktinna savistar vicharinach. kalawe. dhanyawad.

Comments are closed.