विद्यार्थ्यांमधून प्रतिशिक्षक – मैसनवाड गुरुजींचा उपक्रम (Tribal Teacher Takes up Challenge)

2
45

 

पेण्टू विठ्ठल मैसनवाड हा आदिवासी वस्तीत जन्मलेला मुलगा. ना अंगभर कपडे, ना पोटभर अन्न. शा परिस्थितीत त्याने डी एडपर्यंत शिक्षण घेतले. त्याची शिक्षक म्हणून नियुक्ती जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यात केंद्रिय प्राथमिक शाळा, (जयपूर) येथे 2009 साली झाली. त्यानंतर पेण्टूचामैसनवाड गुरुजीझाला. तो शैक्षणिक प्रवास प्रेरणादायी आहे.
जयपूरमधील शाळेच्या इमारतीची अवस्था भयावह होती. शाळेतील वर्गखोल्यांना दारेखिडक्या नव्हत्या. त्यामुळे व्यसनाधीन लोकांकडून शाळेच्या इमारतीचा उपयोग प्रातर्विधीसाठी आणि दारुचा अड्डा म्हणून होत असे. मैसनवाड स्वत: गलिच्छ वर्गखोल्यांची खराटा घेऊन साफसफाई कर. मग विद्यार्थ्यांना शिकव. त्यांना सुरुवातीला पाचसहा महिने तो त्रास झाला. व्यसनी लोक त्यांची कॉलर पकडून त्यांच्याकडून पैशाची मागणी कर, धमकाव. पण ते डगमगले नाहीत. त्यांचा आदर्श हात्मा ज्योतिबा व सावित्रीबाई फुले हा होता. मैसनवाड यांना कैलास म्हेत्रे, नाझरकर संजय यांच्यामध्ये उत्तम सहकारी लाभला. त्या दोघांनी त्रास देणाऱ्या लोकांशीच मैत्री केली!
मैसनवाड यांची विद्यार्थ्यांप्रतीची तळमळ पाहून लोकांमध्येही परिवर्तन घडून आले. सरपंचांनी अनुदानातून शाळेची रंगरंगोटी केली व दरवाजेखिडक्या बसवून दिल्या. दरम्यान, शिक्षणखात्याचे प्रधान सचिव नंदकुमार यांच्या मार्गदर्शनाखालीप्रगत शैक्षणिक महाराष्ट्रही संकल्पना 201415 साली राबवण्यात आली. त्याअंतर्गत मैसनवाड यांना कुमठीबीटला अभ्यासगटावर जाण्याची संधी मिळाली. तेथे त्यांना विद्यार्थ्यांच्या पूर्वज्ञानावर आधारित शिकवण्याची, ज्ञानरचनावादाचीओळख झाली. त्यांनी ती अध्यापन पद्धत शाळेत अवलंबली. त्याला चांगले यश मिळलागले; मुलांची गुणवत्ता सुधारू लागली. परिणामी, लोक स्वत:हून शैक्षणिक साहित्यासाठी वर्गणी काढू लागले. शाळेत लोकवर्गणीतून सीसीटीव्ही, कम्प्युटर, व्हिडियो स्क्रीन, लाऊडस्पीकर अशा सुविधा उपलब्ध झाल्या. तसेच बोअरवेलद्वारे शाळा परिसरातील झाडांसाठी ठिबक सिंचनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
जयपूर शाळेतील दहा वर्षांच्या कार्यकाळानंतर मैसनवाड यांची बदली परतूर तालुक्यातील दहिफळ भोंगाणे या गावी 2019 साली झाली. ते गाव जालनाजिल्ह्यात येते. जेमतेम वीसपंचवीस घरांचे हे गाव. पालक कामानिमित्त हंगामी स्थलांतर करणारे. त्यामुळे ते मुलांच्या शिक्षणाबाबत उदासीन. शाळेची पटसंख्या सव्वीस आहे. दोन शिक्षक मिळून शाळेचा कार्यभार सांभाळतात. मैसनवाड यांनी शाळेत रुजू झाल्यावर पालकांमधील शिक्षणाबद्दलची अनास्था घालवण्यासाठी जनजागृतीचे कार्यक्रम हाती घेतले. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली बालकपालक संबंधावर कार्यशाळा घेतल्या. त्यांनी घरातील भांडणतंटे मिटवण्यासाठी पालकांचे समुपदेशन केले. पालकांना वेळोवेळी शाळेशी जोडून घेतले. अशा कार्यक्रमांमधून पालकांना आधुनिक शिक्षणाची कास धरण्यास प्रेरित केले. मैसनवाड यांच्या त्या विधायक प्रयत्नांना पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मैसनवाड यांना ते कार्यक्रम राबवण्यासाठी मेंदू विकासशास्त्राचे समुपदेशक बाळासाहेब कचवे, प्राचार्य कांबळे, अधिव्याख्याता कांटे यांची साथ मिळाली.
मुले स्वयंस्फूर्तीने अधिक चांगल्या प्रकारे ज्ञानार्जन करतात, त्यांची जिज्ञासू वृत्ती वाढीस लागते, हे मैसनवाड गुरुजींना पहिल्या शाळेतील अनुभवातून माहीत होते. त्यांनी ज्ञानरचनावाद याही शाळेत राबवण्ास सुरुवात केली. त्यामुळे मैसनवाड यांचा शिक्षणातील नवनवे प्रयोग करणाऱ्या अभ्यासगटात (वेध  परिवार) समावेश आहे. वेध महाराष्ट्रातील शिक्षकअधिकारी यांचा तो अभ्यासगट आहे. त्यातूनच मैसनवाड यांनाआंतरराष्ट्रीय शिक्षणाचे प्रारंभिक विचारही संकल्पना कळून आली. त्यासाठी महाराष्ट्राचे प्रधान सचिव नंदकुमार यांची व वेध गटाची साथ मिळत आहे.
आंतरराष्ट्रीय शिक्षणाच्या प्रारंभिक विचारांमध्ये सतरा बाबींचा प्रामुख्याने विचार करण्यात आला आहे :- शिक्षकाने मुलांना स्वत: शिकण्यास प्रेरित करणे, मुलांना विविध आव्हाने देणे, पॅडागॉजिकल इंटरव्हेन्शनमध्ये पिअर लर्निंगग्रप लर्निंग, विषयमित्र निवडणे, मुलांच्या जिज्ञासू वृत्तीचा सन्मान करणे, अभ्यासक्रम एकतृतीयांश वेळेत पूर्ण करणे, शिक्षणात तंत्रज्ञानाचा उपयोग करणे, पुढील वर्गाचा अभ्यासक्रम शिकण्याची संधी देणे, विविध स्पर्धापरीक्षांची तयारी करून घेणे, इंग्रजी शिकण्यासाठी प्रक्रिया राबवणे, अभ्यासक्रम लवकर संपल्याने उपलब्ध झालेला वेळ मुलांचे कलागुण व जीवनावश्यक कौशल्ये शिकण्यासाठी वापरणे, भविष्यात येणाऱ्या तंत्राविषयी संधी उपलब्ध करणे, पर्यावरणात जाऊन शिकणे, विविध भाषा शिकण्याची संधी उपलब्ध करणे, इतर शाळांबरोबर पार्टनरशिप करणे, क्रडासंधी उपलब्ध करून देणे, बहुविध बुद्धिमत्तेचा विचार करून अध्ययनअध्यापन प्रक्रिया राबवणे; तसेच संगीत, कला व नाट्य शिकण्याची संधी उपलब्ध करून देणे.
मैसनवाड गुरुजींनी आंतरराष्ट्रीय शिक्षणाचे प्रयोग त्यांच्या शाळेत सुरू केले आहेत. त्या संदर्भात वाबळेवाडीचे मुख्याध्यापक दत्ताजी यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले. मुलांच्या प्रगतीवर लक्ष ठेवून त्यांच्या जिज्ञासेचे योग्य निरसन करणे हे शिक्षकाचे काम. मैसनवाड गुरुजी ते काम प्रभावीपणे करत आहेत. अभ्यासक्रम एकतृतीयांश वेळेत पूर्ण झाल्यामुळे उर्वरित वेळात मुलांच्या कलागुणांना वाव मिळतो. काही मुलांनी तर पुढील वर्षाचा अभ्यासक्रम एकाच वर्षात पूर्ण केला आहे. त्यात पालकांचाही महत्त्वाचा वाटा आहे.
दहिफळ भोंगाणे येथील जिल्हा परिषद शाळा पत्र्यांची आहे. पावसाळ्यात शाळेतील पत्रे गळतात. शाळेसाठी आर्थिक पाठबळ नाही. निधीअभावी शाळेत कोणत्याही भौतिक सुविधा उपलब्ध नाहीत. तरीही, शाळेतील मुलांची गुणवत्ता उल्लेखनीय आहे. पहिलीची मुलेदेखील विषयमित्रगल्लीमित्र म्हणून कामगिरी बजावतात. विषयमित्र म्हणजे प्रतिशिक्षकच होय. मैसनवाड यांनी शिक्षणात तंत्रज्ञानाचा वापर करून घेण्याचे ठरवले. त्यांनी स्वत: चार टॅब प्रत्येक वर्गासाठी दिले. शाळेत इंटरनेट सुविधेसाठी एक डोंगल घेतले. मुलांना टॅबद्वारे चंद्रयानाचे लाइव्ह प्रक्षेपण दाखवले. ‘नासाच्या उपक्रमांची माहिती करून दिली. दरम्यान, कोरोना विषाणूमुळे मार्च 2020 मध्ये लॉकडाऊन झाले. मुले शाळेतील शिक्षणापासून वंचित झाली. ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय पुढे आला. विद्यार्थ्यांच्या सर्वच पालकांकडे स्मार्टफोनची सुविधा नव्हती. इंटरनेटचा प्रश्न होताच. मैसनवाड गुरुजींनी पालकसभा घेऊन टॅबद्वारे मुलांचे शिक्षण सुरू राहू शकते हे पटवून दिले. पालकांनी टॅबसाठी मैसनवाड गुरुजींकडे प्रत्येकी सहा हजार रुपये जमा केले. गुरुजींनी टॅबबरोबर तीन डोंगलच्या माध्यमातून संपूर्ण गावात इंटरनेटची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्याचा महिन्याला हजार रुपये खर्च येतो. ऑनलाईन अभ्यासासाठी पालक व विद्यार्थ्यांचे गट करण्यात आले आहेत. शाळेतील मुलांचे ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. बोलो अॅप, युट्युब व्हिडिओ, दीक्षा अॅप, डिजिटल साक्षर अॅप, वॉट्सअॅप ग्रप यांच्या माध्यमातून मुले शिकत आहेत. वर्षभराचा अभ्यासक्रम व्हिडिओ पीडीएफच्या स्वरूपात विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आला आहे. मुलांना गुगल मीटवर सूचना देणे, आढावा घेणे, मार्गदर्शन करणे, रोजचा अभ्यास तपासणे ही कामे मैसनवाड गुरुजी नियमितपणे करतात.
पेण्टू मैसनवाड यांचा जन्म 10 मे 1983 रोजी झाला. त्यांचे आईवडील, पाच भावंडे, एक बहीण असे मोठे कुटुंब. त्यांना वह्यापुस्तके कधी मिळाली नाहीत. त्यांचे मित्र त्यांना वहतील कोरी पाने फाडून देत. त्यावर ते त्यांचा अभ्यास करत. त्यांना बारावीला एकोणसत्तर टक्के मार्क्स 2001 साली मिळाले. मैसनवाड सांगतात, “मी शेतातील जांभळे विकून अकरावीबारावीची वह्यापुस्तके व पहिल्यांदाच स्वत:साठी नवीन कपडे घेतले. शिक्षकांनी मार्गदर्शन व प्रोत्साहन दिले. मित्रांनी वेळोवेळी मदत केली. त्यामुळे मी घडत गेलो.” मैसनवाड यांनी यशवंत डी एड कॉलेज (कोडोली, कोल्हापूर) येथून प्रशिक्षण पूर्ण केले. मैसनवाड विवाहित आहेत. त्यांची पत्नीही शिक्षिका आहे. त्यांना दोन मुले आहेत. मैसनवाड यांनी शाळापरिसरात जुलै 2020 मध्ये पर्यावरणपूरक एक हजार एकशेएक झाडांची लागवड केली. मैसनवाड यांना निसर्गाच्या सान्निध्यात मुलांना शिक्षण द्यायचे आहे. तोच त्यांचा शाळापरिसरात झाडे लावण्याचा उद्देश आहे.
पेण्टू मैसनवाड 7798615505
संतोष मुसळे 9763521094
santoshmusle1983@gmail.com
पुनर्लेखन वृंदा राणेपरब
vrunda.rane@gmail.com
 

————————————————————————————————————————–

About Post Author

2 COMMENTS

  1. शिक्षक म्हणून खरं काम आपण पोचवत आहात मुलांपर्यंत!पालक, मुलं आणि शिक्षक मिळून हे काम आपण करत असल्याने मुलं खरी साक्षर होतील यात शंकाच नाही!!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here