विजयवाडा येथील श्री शाकंभरी देवी

शाकंभरी देवी सुपरिचित आहे. तिचे मुख्य स्थान कर्नाटकातील बदामी येथे आहे. हिमालयातील शिवालीक पर्वतात, राजस्थानात जयपूरजवळ सिक्कर येथे, आंध्र प्रदेशात विजयवाडा येथे आणि महाराष्ट्रात कुंभोज, तुळजापूर, सोलापूर येथे त्या देवीची मंदिरे आहेत. देवीचे नवरात्र पौष शुक्ल अष्टमीपासून पौष पौर्णिमेपर्यंत असते. विजयवाड्याच्या ‘कनकदुर्गा’ मंदिरात मात्र श्री शाकंभरी देवीचा उत्सव दरवर्षी आषाढ महिन्यात शुद्ध त्रयोदशी ते पौर्णिमेदरम्यान साजरा होतो. तेथे उत्सवादरम्यान श्री दुर्गमल्लेश्वर स्वामी मंदिरात कनकदुर्गादेवीची पूजा ‘श्रीशांकभरी देवी’ स्वरूपात केली जाते, तेच त्या उत्सवाचे वैशिष्ट्य. अनेक प्रकारच्या भाज्या आणि फळे यांनी शाकंभरी देवीस नटवले जाते.

– नरेंद्र उंब्रजकर, पुणे
९४०३३६०१८५

(आदिमाता जानेवारी २०१६ वरून उद्धृत)

About Post Author