Home मंथन लिबरल आर्ट्सचा अभ्यास – नवे आव्हान

लिबरल आर्ट्सचा अभ्यास – नवे आव्हान

0

लिबर आर्ट्स ही शाखा महाविद्यालयीन अभ्यासक्रमात नव्याने उदयास आली आहे आणि फोफावत आहे. प्रतिष्ठाप्राप्त महाविद्यालयेविद्यापीठे आणि नव्याने उदयास आलेली खाजगी विद्यापीठे यांनी लिबर आर्ट्स हा मुक्त अभ्यासक्रम दशकभरापूर्वी सुरू केला. ज्ञानशाखांची नावे काळाप्रमाणे बदलत राहतात. पूर्वी या शाखेस ढोबळपणाने कला (आर्ट्स) किंवा काही ठिकाणी मानव्यविद्या शाखा असे म्हटले जाई. त्यात फरक होता – त्या शिक्षणक्रमास मर्यादा होती. पण आतात्यांच्याऐवजी बारावी परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर लिबरल आर्ट्स शाखेमध्ये प्रवेश घेण्याचा विद्यार्थ्यांचा ओढा दिसू लागला आहे. गेल्या दशकभरात प्रथम वर्ष पदवीला नव्वद टक्के गुणांना प्रवेश बंद होत आहेत. बदलत्या काळात ज्ञानशाखांच्या कक्षा रुंदावल्या. पालकांच्या व मुलांच्या दृष्टिकोनात बदल झाला. शिवाय डॉक्टर होणे खडतर आणि खर्चिक तर इंजिनीयरिंगची परीक्षा उत्तीर्ण झालेले पंच्याऐंशी टक्के विद्यार्थ्यांना लगेच नोकरी ‌मिळत नाही असा एका पाहणीचा निष्कर्ष आहे. आर्ट्सकॉमर्स आणि सायन्स या तीन पठडींतील, चाकोरीबद्ध विद्याशाखांत विषय निवडीला मर्यादा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यात स्वारस्य राहिलेले नाही. या परिस्थितीत लिबर आर्ट्स या ज्ञानशाखेमध्ये उपलब्ध असलेल्या आंतरशाखीय पर्यायांना विद्यार्थ्यांची पसंती अधिक मिळू लागली आहे. या ज्ञानशाखेत असे पर्याय किती असावेतसाहित्यइतिहासतत्त्वज्ञानसमाजशास्त्रभाषामानववंशशास्त्रराज्यशास्त्र, पत्रकारिता, जनसंपर्कसर्जनशील लेखनविधिशास्त्रराज्यशास्त्रभाषाशास्त्र, प्रकाशन, समाजकार्य, मानसशास्त्र, जनधोरण, नागरिकशास्त्र, आंतरराष्ट्रीय संबंधव्यवस्थापन अशा विषयांचा किंवा अभ्यासक्रमांचा लिबर आर्ट्समध्ये समावेश होतो. नवी पिढी ही स्वतंत्र विचार करणारीस्वतःचे वेगळेपण दाखवू पाहणारी आहे. विशेष करून त्यांच्यासाठी ही ज्ञानशाखा वरदान ठरत आहे. एक गोष्ट नमूद केली पाहिजेकी हे लोण अद्याप ग्रामीण भागात पोचलेले नाही. मात्र शहरांमध्ये विशेषतःबड्या शहरांमध्ये या अभ्यासक्रमाची मोठी चलती दिसते.

लिबर आर्ट्स हे शिक्षण मेंदूच्या सर्जनशील आणि विश्लेषणात्मकअशा दोन्ही बाजूंचा विकास होण्यास चालना देते’ असे नवीन शैक्षणिक धोरणात (2020) म्हटले आहे. विद्यार्थ्यांना काय’ विचार केला पाहिजे हे शिकवण्यापेक्षा कसा’ विचार करता आला पाहिजे हे शिकवण्याचा हेतू या शिक्षणात अभिप्रेत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना विविधांगी कौशल्याचे भांडार प्राप्त होते. त्याचे उपयोजन विद्यार्थी विविध क्षेत्रांत- नोकरी अथवा व्यवसाय यांत करू शकतात.

लिबरल आर्ट्समध्ये चिकित्सक विचारप्रभावी संज्ञापनसमस्यांचे निराकरण या क्षमता आणि कौशल्ये यांच्याबरोबर एकूण मानवी समाजाचे सखोलव्यापक आकलन यांवर भर आहे. इतर ज्ञानशाखांसारखे व्यवसाय प्रशिक्षण यामध्ये असणार नाही. लिबर आर्ट्स हा तीन वर्षांचा अभ्यासक्रम असूनचौथे वर्ष हे काही विद्यापीठांत संशोधनासाठीप्रबंध लिहिण्यासाठी दिले जाते. काही विद्यापीठांनी इतकी मोकळीक दिलेली आहेकी विद्यार्थी स्वतःहून विषयांची निवड करून पदवी अभ्यासक्रम स्वतःच तयार करू शकतात. पण लिबरल आर्ट्सचे वैशिष्ट्य असेकी त्यात सर्जनशीलताकलात्मकतानाविन्य आणि कल्पनाशक्ती यांना भरपूर वाव आहे. शिवायत्यासोबत संगणकशास्त्रगणित किंवा संख्याशास्त्र असा कोणताही एखादा उपयुक्त विषय जोडीला घेता येतो. विद्यार्थ्याला वेगवेगळ्या ज्ञानशाखा धुंडाळतानात्याची क्षितिजे रुंदावतात व त्यातून आंतरशाखीय विचारप्रक्रियेतून नवेचिरंतन असे काही हाती येऊ शकते. सद्यकाळात आंतरशाखीय अभ्यास आणि संशोधन यांस महत्त्व आले आहे. तेथे व्यवहारी फायद्यांपेक्षा जीवनभर शिकण्याची ऊर्मी ताजी कशी राहील अशी दृष्टी निर्माण करण्यावर भर असतो. त्यातून जगण्याचा हेतू गवसण्याच्या शक्यता निर्माण होतात. उदाहरणार्थ, कोणतीही भाषा चांगली अवगत असेल आणि शब्दांची निवड चपखल करता येत असेल तर जाहिरातींच्या क्षेत्रात भरपूर वाव आहे. विद्यार्थी स्क्रिप्टकॅप्शन, कंटेंट लेखन यांत करियर करू शकतात. विद्यार्थ्याला त्याच्या स्वत:च्या मातृभाषेबरोबर अन्य भारतीय किंवा विदेशी भाषा चांगली येत असेल तर दुभाषीअनुवादक होता येते. विद्यार्थ्याचे हुन्नर किंवा त्याचा छंद याला व्यवसायाशी जोडता येते हे लिबर आर्ट्सचे वैशिष्ट्य म्हणता येईल. त्या शाखेतील विविध विषयांतर्गत संबंध शोधण्याची कुवत असणे गरजेचे आहे. अनेक विषयांचे व्यापक आकलन होण्यासाठी समग्रएकत्रित विचार करण्याची क्षमता तेथे महत्त्वाची आहे. उदाहरणार्थ जनसंज्ञापन अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर चित्रपटरेडिओवृत्तवाहिन्यादूरचित्रवाणीपत्रकारिताजनसंपर्क अशा अनेक क्षेत्रांत वाव मिळू शकतो. लिबरल आर्ट्स शाखेतील पदवीमुळे विद्यार्थ्यांत जीवनातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी लागणारा दृष्टिकोन आणि आत्मविश्वास मिळण्यास मदत होते.

ऑटोमेशन व कृत्रिम बुद्धिमत्ता या नव्या तंत्रज्ञानामुळे सर्व क्षेत्रांत क्रांतिकारक व थक्क करणारे अंतर्बाह्य बदल घडून येतील. येत्या काळात विशिष्ट मानवी कौशल्ये अवगत असणाऱ्यांची गरज भासणार आहे. त्यात चिकित्सक विचार करणेनव्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेणेसांस्कृतिक बुद्धिमत्तापरानुभूती (Empathy); तसेचप्रभावी संवाद अशा साऱ्या कौशल्यांमुळे लिबर आर्ट्स शाखेद्वारे कार्पोरेट क्षेत्रातही प्रविष्ट होता येते. अमेरिकेत सिलिकॉन व्हॅलीतील माहिती व तंत्रज्ञानाच्या अनेक कंपन्यांमध्ये संगणकाबरोबर अन्य विषयांमध्येउदाहरणार्थ भारतीय संगीतआदिवासी नृत्य किंवा सनईवादन अशा कोणत्या तरी विषयात, पारंगत अथवा संशोधन असणाऱ्यांची मागणी वाढत आहे. कला शाखेमध्ये केवळ साहित्याचे नोबेल पारितोषिक दिले जात होते. सद्यकालात आंतरशाखीय विद्याव्यासंगाचे मूल्य समजावे- त्याबद्दलची जाण व जाणीव समाजात निर्माण व्हावी या उद्देशाने नॉर्वेजियन सरकारने 2004 पासून लुडविग इंटरनॅशनल मेमोरियल प्राईझ देण्यास सुरुवात केली. नटाली झेमॉन डेव्हिस या पारितोषिकाच्या पहिल्या मानकरी ठरल्या आहेत. त्यांनी विमेन्स हिस्ट्री आणि मानववंश विज्ञान या दोन शाखांत संशोधनपर लेखन केले. महाराष्ट्रातील दोन विदुषी इरावती कर्वे आणि दुर्गाबाई भागवत यांचे कार्य त्याच तोडीचे होते हे या ठिकाणी नमूद करावेसे वाटते. त्यांनी मानववंशशास्त्र आणि साहित्य यांना जोडणारे लेखन केले.

ज्योती दलाल स्कूल ऑफ लिबर आर्ट्स (मुंबई)अजीम प्रेमजी विद्यापीठ (बंगळुरू)शिव नाडर विद्यापीठ (दिल्ली)थापर स्कूल ऑफ लिबर आर्ट्स (पतियाळा) फ्लेम विद्यापीठ (पुणे)ऑरो विद्यापीठ (पडुचेरी)ओ.पी. जिंदाल विद्यापीठ (सोनीपत-हरियाणा) अशी काही नवी व खासगी विद्यापीठेत्यांच्या अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांची मागणी दहा पटीनी वाढली असल्याचे सांगतात. त्यामुळे तेथे प्रवेश मिळणे स्पर्धात्मक झाले आहे. प्रत्येक विद्यापीठांच्या प्रवेश परीक्षेद्वारे तेथे प्रवेश दिला जातो. त्या अभ्यासक्रमासाठी शुल्काच्या रकमाही मोठ्या आहेत. सिम्बॉयसिस (पुणे) त्यासाठी तीन लाख पंच्याऐंशी हजार रुपये शुल्क आकारते. तर जिंदाल विद्यापीठाने पाच ते अठरा लाखांपर्यंत शुल्क विषयनिवडीप्रमाणे ठरवले आहे. आयआयटी (कोझिकोडे) येथे पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी पंधरा लाख रुपये मोजावे लागतात.

हा पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्यांपैकी नव्वद टक्के विद्यार्थ्यांना नोकऱ्यांची संधी मिळालेली आहे. तसेचत्यांना वार्षिक पगारही सहा ते दहा लाखांपर्यंत मिळू शकतो. उदाहरण द्यायचे झाल्यास श्रीराम कॉलेज फॉर वुमेनमध्ये एकूण शंभरावर कंपन्यांनी एकशेपंधरा विद्यार्थिनींची नेमणूक नोकऱ्यांसाठी केली. त्या नेमणुका वार्षिक साडेसात लाखांपर्यंत पगारावर झाल्यातर एका विद्यार्थिनीची बँक ऑफ अमेरिकेकडून वार्षिक अडतीस लाख रुपये पगारावर नेमणूक करण्यात आली आहे‌. कॉलेजच्या नेमणूक कक्षाने इंटर्नशिपची संधी विद्यार्थिनींना उपलब्ध केल्याने तीनशेपन्नास बड्या कंपन्यांनी या विद्यार्थिनींची इंटर्नशिपसाठी निवड केली. सर्वात जास्त म्हणजे दीड लाख रुपये दोन महिन्यांकरता मानधन एका विद्यार्थिनीला देण्यात आले. मुंबईच्या सेंट झेवियर्स कॉलेजमधून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना सर्वात जास्त म्हणजे वार्षिक सहा ते वीस लाख रुपयांपर्यंत पगाराच्या नोकऱ्या मिळाल्या आहेत.

लिबर आर्ट्स विद्याशाखेत आंतरशाखीय संशोधनासाठीविशेषतः परदेशातील ऑक्सफर्डकेंब्रिज यांसारखी अनेक विद्यापीठे स्वागतशील आहेत. एकूणचही विद्याशाखा नव्या शतकाच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आणि नव्या जगाच्या आशा-आकांक्षांना पंख देण्यासाठी उभी ठाकत आहे.

– अजित मगदूम 7506067709 ajitbalwant@gmail.com

About Post Author

Previous articleगुणवंत नगरकर यांची वॉश टेक्निक चित्रशैली !
Next articleएस.एम. जोशी यांच्या नावे संकेतस्थळ (VMF’s website released to cover S M Joshi’s life and work)
अजित मगदूम यांनी ‘रयत शिक्षण संस्थे’च्या वाशी येथील 'कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालया'मध्ये इंग्रजी विषयाचा अधिव्याख्याता, विभागप्रमुख आणि उपप्राचार्य अशा विविध पदांवर काम केले. त्यांनी एम. ए, एम. फिल आणि पीएचडी या पदवी मिळवल्या आहेत. मगदूम हे संस्थेच्या उरण आणि मलकापूर येथील महाविद्यालयात प्राचार्य म्हणून कार्यरत होते. तौलनिक साहित्य हा त्यांच्या अभ्यासाचा विषय. त्यांनी मराठी दलित साहित्य आणि आफ्रिकन-अमेरिकन साहित्य या विषयांवर संशोधन केले आहे. मुल्कराज आनंद, चेकॉव्ह, टॉलस्टॉय अशा अनेक कथांचे मराठी अनुवाद केले. त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’मधून सत्तर हून अधिक पुस्तकांचे परीक्षण लिहिले आहे. तसेच, आकाशवाणी, दूरदर्शनवर मुलाखती घेण्याचे कार्यक्रम केले आहेत. ते किशोरवयीन व महाविद्यालयीन युवकांशी व्यसन विरोधी काtर्यक्रमांद्वारे संवाद साधतात. लेखकाचा दूरध्वनी 7506067709

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version