रांगोळी-नृत्यकलाकार – भूषण पाटील

9
38
carasole

जूचंद्र हे गाव रांगोळी कलाकारांसाठी प्रसिद्ध आहे. ते ठाणे जिल्ह्याच्या वसई तालुक्यात येते. जूचंद्रचे कलाकार प्रसिद्धीच्या झोतात नव्वदच्या दशकापर्यंत फारसे नव्हते. परंतु तेव्हा सुनील गावसकर करत असलेल्या ‘थम्स अप’च्या जाहिरातीत थम, अंगठा चितारला आहे जूचंद्र येथील जयवंत रामचंद्र पाटील यांनी म्हणजे जयवंत पेंटरने. ती गोष्ट ऐंशीच्या दशकातील. जयवंत पेंटर हयात नाहीत. तेथील भालचंद्र म्हात्रे हेदेखील रांगोळी आणि गणेशोत्सवातील देखावे यांसाठी प्रसिद्ध आहेत. गावासाठी १९९० साल महत्त्वाचे ठरले. वसई शहरातील शिक्षक, चित्रकाररांगोळीकार शंकर मोदगेकर यांनी जूचंद्र गावातील शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी रांगोळीचे वर्कशॉप घेतले. तशी वर्कशॉप अनेकदा झाल्यानंतर, तेथील मुलांना ती गोडी लागली. त्यातूनच तयार झाली पन्नासेक कलाकार मंडळी. त्यांतील भूषण लक्ष्मीकांत पाटील, शैलेश पाटील, हर्षद पाटील, प्रणीत भोईर, प्रदीप भोईर, जयकुमार भोईर, जयेश म्हात्रे ही काही नावे त्यांपैकी. भूषणला तर फारच लौकिक लाभला. त्यांचा जन्म २६ जानेवारीचा (१९७९). त्यांचे आईवडील शेतकरी. भूषण यांचे शिक्षण जूचंद्र शाळेत आणि वसईतील आप्पासाहेब वर्तक महाविद्यालयात (एम.ए. बी.एड.) झाले. त्यांची रांगोळीशी ओळख अकराव्या वर्षी झाली, ती शंकर मोदगेकर यांच्या कार्यशाळेत. भूषणने महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले ते त्याला रांगोळीसाठी मिळालेल्या मानधनातून. त्याचा भाऊ हर्षद पाटील यानेही डिप्लोमापर्यंतचे शिक्षण घेतले व तोही आर्ट टिचर म्हणून नोकरी करत आहे. गावातील पन्नासेकजण विविध शाळा, महाविद्यालये येथे आर्ट टिचर म्हणून नोकरी करत आहेत.

वसईतील आगरी, भंडारी, वाडवळ, सामवेदी, पानमाळी हे समाज उत्सवप्रिय. त्यात ख्रिस्ती वाडवळ, ख्रिस्ती सामवेदीदेखील येतात. उत्सव, सण, देवीची यात्रा, लग्नादी कार्यक्रम अशा निमित्ताने रांगोळ्या पूर्वापार काढल्या जात असत. उमेळे, उमेळमान, जूचंद्र या गावांतून न कळते पोरदेखील त्याच्या कलाकारीला चिमटीत रांगोळी घेऊन सुरुवात करते. तेथील कलावंतांना त्यांची ताकद प्रकट करण्यासाठी लागणारा विश्वास मोदगेकर यांनी प्रशिक्षणामधून दिला. हौशी कलाकार बाजारात मिळणारे साधे रंग वापरतात. ते खड्यांच्या स्वरूपात मिळतात. ते चांगले घासून त्यांची पूड तयार करावी लागते. ते जितके घासाल तितके जास्त चमकतात. खडे, रंग तीनशे रुपये किलो या भावाने मिळतात.

साधारणपणे, ‘लॅक कलर’ रांगोळीसाठी वापरतात. ते अर्थात प्रोफेशनल आणि स्पर्धांसाठीच्या रांगोळ्यांसाठी. भूषण यांनी फ्लुरोसंट रंगांतही रांगोळी टाकली आहे.

भूषण नृत्यदिग्दर्शक आहेत. भूषण पाटील यांनी ‘झी मराठी’ वाहिनीसाठी जेव्हा ऑडिशन टेस्ट दिली तेव्हा कलादिग्दर्शक नितिन देसाई यांनीही त्यांचे कौतुक केले. ‘मराठी पाऊल पडते पुढे’ ह्या कार्यक्रमात ते गाजले आहेत. त्यांनी ‘डान्स विथ रांगोळी’ असा कार्यक्रम सादर केला. म्हणजे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ह्या विषयावर आठजणांचे नृत्य, भूषण यांच्या दिग्दर्शनाखाली आणि त्याचवेळी दुसऱ्या बाजूला त्यांच्यासह आठजण राज्याभिषेकाची रांगोळी चितारत आहेत, असा तो कार्यक्रम. आणखी काही स्पर्धांमधून त्यांनी चमक दाखवली आहे. ‘ताक धीना धीन धा’, ‘दम दमा दम’, ‘बुगी बुगी’ ह्या स्पर्धात्मक कार्यक्रमांत ते उपविजेते ठरले आहेत. शिवसेनेच्या अंधेरी क्रीडा संकुलातील ‘जल्लोष’ कार्यक्रमात त्यांनी आठ मिनिटांत पन्नास फुटांची शिवराज्याभिषेकाची रांगोळी चितारली होती!

रांगोळी कलेला व्यावसायिक स्वरूप देण्यामध्ये महत्त्वाचा वाटा जूचंद्रकरांचा आहे. ते संस्कार भारतीमधून; तसेच, सोलो व ग्रूप परफॉर्मन्स करून बर्थडे, महापूजा, लग्न, उत्सव, मिरवणुका अशा विविध प्रसंगांसाठी रांगोळ्या काढतात.

भूषण पाटील यांच्या रांगोळीचे वैशिष्ट्य म्हणजे त्यातील व्यक्तिरेखांमधील जिवंतपणा. त्यातील महत्त्वाचा, अतिशय नाजूक व कौशल्याचा भाग म्हणजे डोळे रेखाटणी. डोळे व्यक्तिमत्त्वाची वा व्यक्तिचित्राची ओळख करून देतात. त्यांचे प्रभुत्व रंगसंगतीवर आहे. ते पाण्यावरील रांगोळीदेखील काढतात. चित्राचा समतोल साधण्यात त्यांचा हातखंडा मानला जातो. महाराष्ट्र संस्कृतिदर्शन, भारतीय संस्कृती हे त्यांचे खास विषय आहेत. ते प्रसंगा-घटनानुरूप विविध विषयांवरील रांगोळ्या काढतात. ते ‘मराठी पाऊल पडते पुढे’ हा रांगोळी-नृत्य कार्यक्रम सादर करतात. त्यात पन्नास रांगोळी, नृत्यकलाकारांचा सहभाग असतो.

ते सह्याद्री शिक्षण संस्था, जूचंद्र येथील महाविद्यालयात मराठी व फाउंडेशन कोर्स हे विषय शिकवतात. ते काही विषयांचे धडे जूचंद्र येथील शांती गोविंद विद्यालयातील मुलांनाही देतात. ते सामाजिक बांधिलकी मानतात. ते त्यांच्या कलाकार ताफ्यातील माणसांच्या मुलामुलींच्या शिक्षणाच्या खर्चाचा काही भाग उचलतात. महाराष्ट्रीय तसेच, भारतीय संस्कृतीचे संवर्धन झाले पाहिजे. त्यासाठीच लहान मुलांना त्याची ओळख होणे आवश्यक आहे असे ते मानतात.

भूषण पाटील
9270140939, hharshpatil9009@gmail.com

– संदीप राऊत

About Post Author

9 COMMENTS

  1. Gr8 job Bhushan.proub to have
    Gr8 job Bhushan.proub to have frnd like u.keep it up.n god bless u.

  2. जूचंद्र गावाचे नाव रोशन
    जूचंद्र गावाचे नाव रोशन केलेल्या भूषण पाटिल तसेच सर्व कलाकारांचा आम्हाला अभिमान आहे.

  3. आगरी छावा
    आगरी छावा

  4. खरोखरच स्फूर्तिदायक असे
    खरोखरच स्फूर्तिदायक असे व्यक्तिमत्व

  5. तुमचि कामगिरी खूप कौतुकास्पद
    तुमची कामगिरी खूप कौतुकास्पद आहे. असेच नाव मोठे नाव करा. आम्ही सदा तुमच्या बरोबर आहोत.

  6. आभिमांन वाटतो की तुमच्या
    अभिमान वाटतो, की तुमच्यासारखे कलाकार आज या देशात जिवंत आहेत. म्हणून आज ही महाराष्ट्राची संस्कृती टिकून आहे. पुढील कामासाठी खुप खूप सदिच्छा ……विरार ग्रुप.

  7. harhunnari ,srusajnshil,….
    harhunnari ,srujanshil,.. tuzyatil kalecha utkrsh asaach ghdat raho, yashvant, kirtimant vhaa! Hi aai chandike charani prarthana.

  8. सुंदर विचार मराठी मातीतले वसा
    सुंदर विचार मराठी मातीतले वसा व जोपासना

  9. चांगलं बोलणं,चांगले विचार
    चांगलं बोलणं,चांगले विचार ,चांगला माणूस सन्माननीय होतात.जसे तुम्ही .

Comments are closed.