माझं गाव मोडनिंब! (Modnimb)

110
440
_Modnimb_5

पांढरी नावाची छोटी वाडी होती. लोक गुण्यागोविंदाने राहत होते. परंतु प्लेगची साथ आली आणि लोकांनी गाव सोडले. जवळच ओढा होता. ओढ्याच्या पलीकडे लिंबाची भरपूर झाडे होती. ती झाडे मोडून लोकांनी तेथे वस्ती केली आणि त्यामुळे गावाला नाव पडले मोडनिंब! काही लोक त्यास मोडलिंब असे म्हणतात.

गावाजवळच्या ओढ्यामध्ये श्री वेताळसाहेबांचा पार आहे, तर गावच्या पूर्वेला श्री सिद्धेश्वराची पावननगरी असे शेटफळ नावाचे खेडे आहे. पश्चिमेला भक्तीचा मळा फुलवणारे संत सावता माळी यांचे अरण. उत्तरेस जाधववाडी, बैरागवाडी तर दक्षिणेस सोलंकरवाडी. त्यांच्या मधोमध मोडनिंब!

स्वातंत्र्यपूर्व मिरज संस्थानात मोडनिंब हे तालुक्याचे ठिकाण होते. मिरज संस्थानचे राजे बाळासाहेब पटवर्धन यांच्या राजवाड्यातून भुयारी मार्ग होता. तो पश्चिमेकडे ओढ्याच्या पलीकडे जेथे संस्थानाची कोर्टकचेरी होती, तेथे निघे. तेथे सुंदर बाग होती. त्यात वेगवेगळ्या प्रकारची झाडे, वेली होत्या. त्या भागाला गोल असे म्हणत. तेथून पंढरीचा पांडुरंग अरण येथील श्री संत सावता माळी यांच्या भेटीस गेला अशी आख्यायिका आहे. ओढा ओलांडून गावात प्रवेश करताना मारुती मंदिर, मुस्लिमांची मशीद, महादेव मंदिर, विठ्ठल मंदिर व एक मोठी वेस लागते. ती वेस ओलांडली, की छोटी बाजारपेठ आहे. त्या पलीकडे, एकशेपंचवीस वर्षांपूर्वीचे जैन मंदिर. अतिशय सुंदर, कोरीव लेणेच जणू! तेथून पुढे, शहांचे कापडदुकान. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना शहा लोकांचीच घरे तर दक्षिणेकडे मुस्लिम घरे. तेथेच वाणी समाज, काही ब्राम्हण मंडळी आनंदाने राहतात. त्यांच्या पलीकडे रामोशीवाडा, मांगवाडा, महारवाडा. त्यांच्यानंतर गावची पश्चिमेकडील वेस. वेशीच्या बाहेर खंडोबा व देवीचे प्राचीन मंदिर. तसाच वळसा घातला, की सरकारी दवाखाना, तलाठी कार्यालय (चावडी), सुतार-लोहारांची घरे. पुढे, चांभारवाडा. पुन्हा वळसा घातला, की परीटवाडा, कासार गल्ली, कोळीवाडा, न्हावी गल्ली… गावाची रचना अशी गोलात गोल होत गेली आहे. गावाला तटबंदी होती आणि मधील गोलात पाटील व कुळकर्णी यांची घरे होती. अठरापगड जाती असलेले गाव. गावाच्या उत्तर बाजूस लांडी वेस. त्याच्याबाहेर करकंब व अरण रोड. गावापासून स्टेशन व स्टँड हे  फारच लांब, गावाजवळून जाणारा नॅशनल हायवे नंबर 9 व नॅरो गेज रेल्वेगाडी. त्याच्याच बाजूला श्री उमा विद्यालय (उमा स्मारक संस्था)

मोडनिंबची बाजारपेठ मिरची व कांदा यांच्यासाठी प्रसिद्ध आहे. तेथील मिरची ही मोडनिंबी मिरची म्हणून प्रसिद्ध होती व तेथून तिचे दर ठरवले जात. महाराष्ट्राच्या नकाशावर मिरचीमुळे मोडनिंबचे नाव कोरले गेले. परप्रांतातील मोठमोठे व्यापारी तेथे येत. तेथील बाजारपेठ कांद्यासाठीही प्रसिद्ध होती. जनावरांचा बाजार मोठा भरत असे.

मोडनिंबचा खून खटला व शहा यांच्या घरावर पडलेला दरोडा यांमुळे मोडनिंब गाव महाराष्ट्रभर माहीत झाले. हिराचंद नथुराम शहा हे मोडनिंबचे फार मोठे व्यापारी होते. त्यांच्या  घरावर पारधी समाजातील कल्याण बाजी काळे या माणसाने दरोडा टाकला होता. ती संपत्ती लुटून नेत असताना मोडनिंब पासून अनगरपर्यंत ब-याच ठिकाणी पडली होती. तो दरोडा खूप गाजला. पण मोडनिंब म्हणजे सर्वांना समजून घेणारे व्यापारी वृत्तीचे गाव, आपसात न भांडणारे गाव. सहनशीलता काय असते ते त्या गावाकडूनच शिकावे असे स्थानिकांचे मत.

धाब्याची घरे, सरकारी दवाखाना, चावडी, धर्मशाळा, ग्रामपंचायत, 1942 च्या आसपासचा राजवाडा, सिनेमाचे टॉकिज, गाढवलोळी, गावातील वेताळसाहेब. त्या सर्व गावच्या प्रमुख खुणा. मोडनिंबच्या एका भागात खूप गाढवे होती, म्हणून त्या भागाला गाढवलोळी हे नाव पडले.

मोडनिंब ग्रामपंचायतीची स्थापना झाली. प्रथम सरपंच चंद्रभान पाटील व नंतरचे प्रभाकरपंत साठे. मालक म्हणून नावारूपास आलेले. मोडनिंबची सत्ता त्यांच्याच भोवती फिरू लागली. गावातील अंतुनाना साठे यांचा मोठा वाडा चौसोपी आहे. त्याच वाड्यात स्वातंत्र्यपूर्व काळातील चर्चा रंगायच्या.

छात्रसाल व सम्राट अशोक या कादंबरीचे लेखक कै. वालचंद नानचंद शहा म्हणजे मोडनिंबचे भूषण शहा. त्यांचा जन्म मोडनिंब येथे 1886 साली झाला. त्यांचे शिक्षण पुणे व मुंबई येथे डिस्ट्रिक्ट प्लीडर व हायकोर्ट प्लीडर इतके झाले.

पहिल्या महायुद्धाच्या सुमारास कादंबरीकार वालचंद नाणचंद शहा वकील ही नवीन व्यक्ती उदयास आली. त्यांची ‘सम्राट अशोक’ ही पहिली कादंबरी 1913 साली प्रसिद्ध झाली. कादंबरीची उच्च भाषाशैली वाङ्मयात शोभून दिसणारी होती. त्यानंतर 1915 मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘छात्रसाल’ या कादंबरीमुळे शहा यांचे नाव दैदिप्यमान झाले. मुंबई विद्यापीठात व हिंगणे महाविद्यालयात बी.ए. व एम.ए.साठी या दोन्ही कादंबऱ्या अभ्यासक्रमात होत्या. ‘सम्राट अशोक’चे भाषांतर अनेक भाषांत झाले. त्यांच्या एकूण अकरा कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या. शहा यांनी मोडनिंबला वकिली व्यवसाय केला. ते श्रीमंत राजे बाळासाहेब पटवर्धन मिरजकर यांच्या दरबारचे प्रमुख वकील होते. श्रीमंत उमाबाईसाहेब पटवर्धन यांनी मोडनिंब येथे शहा यांच्या अधिपत्याखाली ‘श्री उमा विद्यालय’ स्थापन केले. एक थोर साहित्यिक म्हणून त्यांचा सत्कार 1953 साली माढा येथे झाला. त्यांची प्राणज्योत वयाच्या एकोणसत्तराव्या वर्षी मोडनिंब येथे 1ऑक्टोबर 1955 रोजी हृदय विकाराने मालवली.

साहित्यसम्राट नरसिंह चिंतामण केळकर यांचा जन्म मोडनिंब येथील श्री नातू यांच्या वाड्यात झाला. म्हणून त्यांचा वरदहस्त या भूमीला मिळाला. मिरज संस्थानचे शिक्षणमंत्री मारुतीराव हरिराव महाडिक (तात्या) हे पेशाने वकील आणि पंचक्रोशीतील वैद्य म्हणून नाव मिळवणारे नफाराव गोरे व मिरज संस्थानातील वकील शंकरराव दफ्तरदार त्याच गावचे. हिराचंद नथुराम शहा (वेणाभाई) व श्री राघव गडधरे हे जातिवंत व्यापारी मोडनिंबचेच, तर नाट्यरसिक श्री कोठारीदादा त्याच भूमीतील. त्यांच्यामुळे अनेक नाटक मंडळी तेथे येऊन गेली.

मोडनिंबमध्ये महिलांनी स्‍वतःच्‍या पायावर उभे राहावे, सक्षम व्‍हावे यासाठी त्‍यांच्या कलेला वाव दिला जातो. त्‍यांना रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या अनेक कला आहेत. उदाहरणार्थ, शिवणकला, भरतकाम, पाककला आणि विविध हस्तकला. त्यांच्या नेहमी स्पर्धा भरवल्या जातात. मोडनिंबचा आठवडी बाजार हा शनिवारी भरतो. बाजारामध्ये डोंबारी व साप-गारुडी यांचा खेळ बघता येतो. तसेच रात्री, खास तमाशाही असतो. लोक त्याचा परिपूर्ण आनंद घेतात.

मोडनिंबमध्ये सध्या तीन कलाकेंद्रे आहेत. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे लावणी, पंढरपूर तेथील पठ्ठे बापुराव पुरस्कृत कै. ज्ञानोबा उत्पात हे येथील कलाकारांना लावणी शिकवण्यासाठी येत.

गावात पाऊस खूप पडायचा. ओढा सतत भरलेला असायचा. ओढ्यालगत विहीर होती. तिला ‘झरा’ असे म्हणत. संपूर्ण गाव तिचे पाणी पित असे. शेतकरी हा तेथील राजा होता. गहू, ज्वारी, कापूस, कांदा, मिरची इत्यादी पिके भरपूर होत. आज मात्र गावात पाणी नाही!

– विद्या केशवराव पाटील

Last Updated On 15th July 2017

About Post Author

110 COMMENTS

 1. खुप छान लीहिले अप्ल्या गावा
  खूप छान लिहिले आपल्‍या गावाबद्दल.आपले अभिनंदन.

 2. ताई आपला मोडनिंब गावाचा
  ताई, आपला मोडनिंब गावाचा अभ्यास खूप आवडला. खरंच आपण मोडनिंब गावची माहिती नवीन पिढीला करुन दिली. त्याबद्दल आभार!

 3. Chan eityahasik mahiti gola
  Chan eityahasik mahiti gola keli. Modnimb cha itihasa baddal atachya pidhila janiv karun dili tyabaddal hardhik hardhik abhar, fakt ashich writing karun modnimb madhe development sathi help hot rahavi v jankar vyaktina, navya pidhila jagaruk karave, jenekarun modnimbacha ajun chehara mora badalel. Dhanyavad!

 4. मोडनिंब च्या इतिहासबद्दल
  मोडनिंबच्या इतिहासाबद्दल माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.

 5. खुप छान माहिती
  खूप छान माहिती.

 6. खुप छान माहिती
  खुप छान माहिती

 7. आवड निर्माण झाली
  आवड निर्माण झाली.

 8. माझ्या आजोबांनी ही जुण्या
  माझ्या आजोबांनी ही जुन्‍या काळी खूपच नाटके केली होती, असं मी ऐकले आहे. त्याचा उल्लेख नाही.

 9. Information is good. Include
  Information is good. Include the information about ‘GRAMDAIVAT YATRA’.

 10. Atishay sundar mahit modnimb
  Modnimb baddalchi atishay sundar mahit tumchya mule amhala milali. Tyabaddal pratham tumche abhar. Mazya mate baryapaiki lokana gavabaddalcha itihas mahiti nasel.

 11. मोडनिंबच्या इतिहासाबद्दल
  मोडनिंबच्या इतिहासाबद्दल माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.

 12. ऊमा विद्यालयाचा मि विद्यथी
  मी उमा विद्यालयाचा विद्यार्थी आहे.

 13. Thank U For The Information..
  Thank U For The Information….I Learn At M.H.M College Modnimb….

 14. किरण गांधी सोलापूर, शुध्दोहम् ज्वेलर्स ।

  खुपच छान माहिती आहे. येथील,
  खुपच छान माहिती आहे. येथील, जैन मंदिराचा इतिहास ही अतिशय क्षेत्र आहे।धन्यवाद ।

 15. खुपच जुना खरा इतिहास आहे.
  खुपच जुना खरा इतिहास आहे. माझ्या स्मृति जागृत होऊन आनंद वाला ,

 16. My grandfather late shri
  My grandfather late shri valchand nanchand shah is the founder of school uma Vidyalaya Modnimb. This was residesial school.

 17. very nice info given. we are
  very nice info given. we are proud of you bha (grandfather) Mr. Walchand Nanchand shah.

 18. I am the granddaughter of
  I am the granddaughter of late shri walchand nanchand shah , the great well known personality. Of Modnimb.
  Thanks for giving rare and detailed information about Modnimb in such a nice way

 19. अप्रतिम सुंदर, आवडली गावाची
  अप्रतिम सुंदर, आवडली गावाची माहीती नवीन पीडीला ही कळने गरजेच होत,तुमचा मनापासुन आभारी आहे…

 20. मला अभिमान वाटला हे सर्व
  मला अभिमान वाटला हे सर्व वाचून

 21. जुन्या आठवणी वा मस्त लेखन
  जुन्या आठवणी व मस्त लेखन

 22. Aadhi gavabaddal aapulaki
  Aadhi gavabaddal aapulaki hoti hi mahiti vachalayane abhiman pan vatu lagala. Thanks

 23. खुप छान अतिशय उपयुक्त माहिती
  खुप छान अतिशय उपयुक्त माहिती दिल्याबद्दल मनःपुर्वक धन्यवाद……,,

 24. खरंच मोडनिंबचा इतिहास
  खरंच मोडनिंबचा इतिहास देदीप्यमान आहे.
  Proud of being Modnimbkar

 25. Khupach chan modnimb gavachi
  Khupach chan modnimb gavachi history lihilyabaddal navin pidhila samaju shakel

 26. नविन पिढीला ही माहीती करून
  नविन पिढीला ही माहीती करून दिल्याबद्दल खुप खुप आभार.आणि आपण ही असेच लिहीत रहा त्यासाठी शुभेच्छा…!

 27. chan ahe pan tumhi phadnis
  chan ahe pan tumhi phadnis wada baddal kahich lihile nahit. ani tumhala mahit ahe ka shi gajanan vijay granth lihinare lekhak das ganu maharaj modlimb che hote

 28. Manapasun abhar madam,apan…
  Manapasun abhar madam,apan dilelya maulyawan mahiti nehmuch smarnat thevin ani aplya Modnimb gavachi mahiti ethun pydhchya pidhila denyacha prayatna karin..Mala sarth Abhiman ahe mazya ya Modnimb gavacha…

 29. नेमकेपणाने मोडनिंबचे वैभव…
  नेमकेपणाने मोडनिंबचे वैभव मांडले आहे.

  डाँ महादेव राऊत

 30. खुप सुंदर लिहिले आहे.
  खुप सुंदर लिहिले आहे.

 31. खुप छान लिहिले आहे. जुन्या…
  खुप छान लिहिले आहे. जुन्या आठवणी ताज्या झाल्या.

 32. खुप छान माहिती आहे.नवीन…
  खुप छान माहिती आहे.नवीन पिढीला माहिती करून दिल्या बद्दल धन्यवाद

 33. खुप छान माहिती ….
  खुप छान माहिती ….

 34. ज्येष्ठ साहित्य सम्राट श्री…
  ज्येष्ठ साहित्य सम्राट श्री न चि केळकर यांच्या जन्मभूमीत माझा जन्म झाला याचा मला अभिमान आहे.
  मोडनिंब गावचा इतिहास खरच दैदिप्यमान आहे,मोडनिंबची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.

 35. खरच मोडनिंबचा इतिहास…
  खरच मोडनिंबचा इतिहास दैदिप्यमान आहे.
  मला मोडनिंब बद्दल खूप प्रेम आहे.
  मी श्री उमा विद्यालयाचा माजी विद्यार्थी आहे..

 36. खूपच छान इतिहास. मोडनिंबकर…
  खूपच छान इतिहास. मोडनिंबकर असल्याचा अभिमान आहे.

 37. Best information about…
  Best information about Modnimb. Proud to be Modnimbkar

 38. हरवलेला गुप्त खजिना…
  हरवलेला गुप्त खजिना सापडल्याचा खुपच आनंद झाला, विद्या..

 39. अप्रतिम…. collection…
  अप्रतिम…. collection……
  बहुतांश चालु पिढी ला ही माहिती नसलेली व भावी पिढी ला ही आपल्या गावाचा अभिमान वाटावा असेच आहे हे……?

 40. Proud to be a part of…
  Proud to be a part of Modnimb.
  मोडनिंबच्या इतिहासाबद्दल माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.. ?

 41. माझे जन्मगाव मोडनिंबप्राथमिक…
  माझे जन्मगाव मोडनिंबप्राथमिक व माध्यमिकशिक्षण मोडनिंब मधे झाले. नंतर नोकरी निमित्त पुण्यात स्थायिक झालो पण मोडनिंबच्या मातीला कधी विसरलो नाही. मोडनिंब गावाला माझा मानाचा मुजरा.
  २२/०१/२०१९

 42. खरच वाचून खुप आनंद वाटला…
  खरच वाचून खुप आनंद वाटला मोडनिंब चे नाव इतिहासात आज हि आहे
  मी उमा विद्यालयाचा विद्यार्थी आहे
  बालाजी वाघमारे
  22/1/2019

 43. मी या गावचा नागरिक. आहे याचा…
  मी या गावचा नागरिक. आहे याचा मला अभिमान आहे.वेताल बाबा क्रिकेट क्ल ब

 44. खूप सुंदर पद्धतीने मोडनिब…
  खूप सुंदर पद्धतीने मोडनिब बद्दल माहिती मिळाली,

 45. खूप छान लिहिले आहे ‌‌‌?
  खूप छान लिहिले आहे ‌‌‌?

 46. सुंदर लेखण माझ गाव माझा…
  सुंदर लेखण माझ गाव माझा अभिमान
  अँड.विजयसिंह गिड्डे-निकम

 47. खूप छान माहिती दिली.गावाच्या…
  खूप छान माहिती दिली.गावाच्या इतिहासा बद्दल धन्यवाद

 48. मोडनिंबच्या इतिहासाबद्दल…
  मोडनिंबच्या इतिहासाबद्दल माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.

 49. वाचुन खुपच छान वाटले आपले…
  वाचुन खुपच छान वाटले आपले गाव पण काही छोटे नाही.
  ज्यांची कल्पना त्यांना सलाम

 50. मैने प्यार किया मधील नटी…
  मैने प्यार किया मधील नटी भाग्यश्री पटवध॔न यांचा वाडा

 51. मोडनिंबच्या शहराच्या वैभवात…
  मोडनिंबच्या शहराच्या वैभवात सर्व जातीधर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात अभिमान आहे मी मोडनिंबकर

 52. Very nice ??? Best…
  Very nice ??? Best information About modnimb.proud to be Modnimbkar.

 53. नेटक्या व आचूक शब्दात ,…
  नेटक्या व आचूक शब्दात , सर्वांगसुदंर असे वर्नण ! अप्र तिम!ो

 54. Khup chan book aaj khara…
  Khup chan book aaj khara modnimb gavachi histroy samajli

 55. खुपच छान लेखन केले आहे. हि…
  खुपच छान लेखन केले आहे. हि माहिती अजूनही आपल्या गावकरी यांना जास्त माहिती नाही…तरी आपण सर्वांनी ही माहिती ईतर लोकांना पुरवावी..

 56. खुपच छान माहिती
  Mahesh…

  खुपच छान माहिती
  Mahesh Salunkhe

 57. खूप छान माहिती दिली आहे…
  खूप छान माहिती दिली आहे तुम्ही नवीन पिढिला माहिती करून दिल्याबद्दल धन्यवाद

 58. मोडनिंबच्या इतिहासाबद्दल…
  मोडनिंबच्या इतिहासाबद्दल माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.

 59. खूप सुंदर संकलन केले आहे…
  खूप सुंदर संकलन केले आहे. आम्ही आपले शतशः आभारी आहोत

 60. खूप सुंदर संकलन केले आहे…
  खूप सुंदर संकलन केले आहे. आम्ही आपले शतशः आभारी आहोत..

 61. मोडनिंब गावचा नादच खुळा
  मोडनिंब गावचा नादच खुळा

 62. खुप छान माहीती दिली अंगदी…
  खुप छान माहीती दिली अंगदी सुंदर लेखन केले आहे

 63. धन्यवाद आम्हाला युवा पिढीला…
  आम्हा युवा पिढीला मोडनिंबचा इतिहासाची जाणीव करून दिल्याबद्दल धन्यवाद.

 64. It’s very interesting…
  It’s very interesting information about my birthplace. Most people of Modnimb are loyal, humble n kind-hearted. I enjoyed my childhood n college life there. I love my Modnimb very much!!

 65. आजच्या पिढीत मोडनिंब बद्दल…
  आजच्या पिढीत मोडनिंब बद्दल एवढी माहिती कोणालाही बहुतेक नव्हती खूप खूप धन्यवाद पाटील मॅडम

 66. || जे जे आपणास ठावे ,ते ते…
  || जे जे आपणास ठावे ,ते ते इतरांस सांगावे ||
  || शहाणे करून सोडावे , सकळ जन ||
  सर्वप्रथम मी श्री व सौ पाटील यांचे एक मोडनिंबकर या या नात्याने त्यांचे आभार व्यक्ती करतो त्यांनी आम्हाला जाणीव करून दिली की आपण एका सुप्रसिद्ध अशा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या मोडनिंब नगरीचे रहिवासी आहोत तीच जाणीव त्यांनी एखाद्या पुस्तकाच्या माध्यमातून व्यक्त करावी हीच अपेक्षा..!
  आपलाच
  (ऋषिकेश कोठावळे)
  ९५०३९७४०२०

 67. Chhan ahe lekh Vidya Tai…
  Chhan ahe lekh Vidya Tai
  Tumhi Modnimb gawatlyach aahat ka
  Ki mahiti jama krun mg tila ya lekhach rup dil

  Ajun takat ja asech lekh chhan watat wachayla ani imp mhanje junya sanskrutichi pusat chalaleli aathavan punha lakshat rahayla pn madat hote

 68. संत सावता माळी यांची माहिती…
  संत सावता माळी यांची माहिती शोधता शोधता त्यांची समाधी गुगल म्याप मध्ये मिळाली नंतर मग मोडनिंब हे जराशे विचित्र नावाचे गाव नकाशात दिसले आणि वरील लेखावरून तर एक खजिनाच मिळाला . गुगल मयाप मध्ये ही सर्व स्थळे दाखवली तर मला फार आनंद आणि अभिमान वाटेल . आपला : अविनाश गोवर्धन नागपूर

 69. स्टेशन पासून ते स्टॅन्ड…
  स्टेशन पासून ते स्टॅन्ड पर्यंत चे अंतर खूप मोडनिंब येथील वेताळबा व ओढा,तसेच तेथील लिंबाची झाडे.संस्थानाचा राजवाडा

 70. अप्रतिम….. खूपच सुंदर लेखन…
  अप्रतिम….. खूपच सुंदर लेखन !

Comments are closed.