दर महिन्यात जशी संक्रांत असते तशीच प्रत्येक महिन्याच्या वद्य चतुर्दशीला शिवरात्र असते. परंतु माघ महिन्यातील शिवरात्रीस ‘महाशिवरात्र’ असे म्हणतात. तो दिवस शिवोपासनेचा आहे. त्या दिवशी शिवलिंगावर रुद्राभिषेक करतात. भगवान शंकरांना बिल्वपत्रांबरोबर आंब्याचा मोहोर व धोतऱ्याची फुले वाहतात. कवठाचे फळ शंकरांना ठेवतात. दिवसभर उपवास करतात.
महाशिवरात्रीचे व्रत हे काम्य व नैमित्तिक असे दोन्ही प्रकारचे आहे. ते सर्व वर्णांतील स्त्री-पुरूषांना विहीत आहे. उपवास, पूजा व जागरण ही त्या व्रताची तीन अंगे असून, ती सारखीच महत्त्वाची आहेत. शिव ही या व्रताची प्रधान देवता आहे.
Rahul dilip veer
Rahul dilip veer
Comments are closed.