‘महाराष्ट्राचे संस्कृतिसंचित’ हा ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ वेबपोर्टलवरील निवडक लेखनाचे संकलन असलेला ग्रंथ. वेबपोर्टलचे मुख्य संपादक दिनकर गांगल आणि कार्यकारी संपादक डॉ. यश वेलणकर यांनी तो संपादित केला आहे.
पुस्तकाच्या आरंभी संपादक दिनकर गांगल यांनी लिहिलेला ‘मेंढालेखातील खुशी’ हा सचित्र लेख आहे. मेंढालेखा हे आदिवासी गाव नक्षलवादी टापूत येते. तेथील गावक-यांनी अशा गावात लोकशाही विकेंद्रीकरणाचा लढा यशस्वी करून दाखवण्याचा चमत्कार घडवला आहे. पुस्तकातील सर्व लेख महाराष्ट्राचे सामाजिक आणि सांस्कृतिक वैशिष्ट्याचे प्रतिनिधीत्व करतात. मलखांबाचा इतिहास आणि वैशिष्ट्ये विषद करणारा ‘खेळांचा राजा – मल्लखांब’, पुण्याच्या वैशिष्ट्याची ओळख करून देणारा ‘पुण्यातील मंडई विद्यापीठ’, वीणा गोखले यांच्या आगळ्यावेगळ्या उपक्रमाची माहिती देणारा ‘देणे समाजाचे’, ओवळेकरांची मनमोहक आणि चित्तवेधक ‘फुलपाखरांची बाग’, तर कमळांच्या वेडातून कमळांची अनोखी बाग घडवणारे सतीश गदीया यांच्यासंबंधीचा लेख अशी त्या ग्रंथाची वैशिष्ट्ये सांगता येतात.
चळवळीमधील कार्यकर्त्यांपासून छांंदिष्ट व्यक्तींपर्यंत, भवताल समजून घेण्यास उत्सुक असलेल्या माणसांपासून समाजातला चांगुलपणा जाणून घेण्याची इच्छा असलेल्या प्रत्येक व्यक्तींपर्यंत, सा-यांसाठीच हा ग्रंथ उपयुक्त आहे.
महाराष्ट्राचे संस्कृतिसंचित
संपादक – दिनकर गांगल, डॉ. यश वेलणकर
प्रकाशक – व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन
पृष्ठ – १३८
किंमत – ३५० रुपये.
‘महाराष्ट्राचे संस्कृतिसंचित- हा ग्रंथ येथे ऑनलाईन विकत घेता येऊ शकेल. ग्रंथाची किंमत ३५० रुपये असून पैसे भरल्यानंतर दहा दिवसांच्या आत ग्रंथ कुरिअर किंवा स्पीडपोस्टद्वारे पाठवला जाईल. पैसे भरल्याची डिजिटल पावती वाचकांना इमेलवर पाठवण्यात येईल. (पोस्टींग खर्च ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’तर्फे करण्यात येईल. मात्र ही सवलत मर्यादीत काळासाठी उपलब्ध आहे. तथापी ही योजना केवळ महाराष्ट्रातील वाचकांसाठी आहे. महाराष्ट्राबाहेरील वाचकांनी पुस्तक घेण्याकरता कृपया ‘थिंक महाराष्ट्र’ला (०२२) २४१८३७१०,२४१३१००९ या क्रमांकावर संपर्क करावा. भारताबाहेरील वाचकांसाठी हे पुस्तक ‘रसिक मराठी डॉट कॉम’वर उपलब्ध आहे.)
ग्रंथ विकत घेण्यासाठी ऑनलाईन पैसे भरण्याकरता येथे क्लिक करावे.
‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ने ‘महाराष्ट्राचे संस्कृतिसंचित’ या ग्रंथाचा दुसरा खंड 23 सप्टेंबर 2017 रोजी प्रकाशित केला.
Khupch Chan
Khupch Chan
Vachun khup happy vatatay…
Vachun khup happy vatatay.khup Chan lekhan aahe.like you so much
अतिशय छान वाटते. आभारी आहोत
अतिशय छान वाटते. आभारी आहोत
Dear Sir/Madam, …
Dear Sir/Madam,
I have tried to register at your website twice, but haven’t recieved any activation mail.
So whenever I try to login using my user id or e-mail address, a message appears that “user id” is blocked or has not been activated yet.
Please advise further.
Regards,
Patiraj Yadav
9920908175
दिनकरजी,…
दिनकरजी,
आपल्या थींक महाराष्ट्र वेबपोर्टलवर असलेला साहित्यीक खजिना माहितीपूर्ण व ज्ञानात भर घालणारा आहे. महाराष्ट्राचा लौकीक यातून अधोरेखित होतो. वाचनीय सदरे मनाची-वाचनाची तृष्णा भागवतात.
दि. 24 नोव्हे. 2017
12.11 pm
इथला फेरफटका अतिशय छान वाटला…
इथला फेरफटका अतिशय छान वाटला.नवी माहिती,नवे ज्ञान देण्यासाठी आपली टीम तत्पर आहे,प्रयत्नशील आहे. आपणास मन;पूर्वक धन्यवाद!
आपल्या थिंक महाराष्ट…
आपल्या थिंक महाराष्ट वेबपोर्टलवरील माहिती अतिशय ज्ञानवर्धक असते.
राजेंद्र एन. घोटकर
२२/८/२०१९
आपण सांगितलेली माहिती ही…
आपण सांगितलेली माहिती ही अतिशय महत्वाचीआहे. त्यामुळे आमच्या माहितीमध्ये वाढ होते व निसर्ग समजायला मदत होते.
नव नवीन उद्योजक आणि…
नव नवीन उद्योजक आणि त्यांच्या उद्योगाविषयी माहिती वाचून एक नवीन ऊर्जा तर मिळते च आणि ज्ञानात ही भर पडते.
नव उद्योग करणारांसाठी अतिशय महत्त्वाचे व्यासपीठ उपलब्ध आहे, असे माझे मत आहे. सुंदर माहिती ओळख.
दिनकरजी,
आपल्या…
दिनकरजी,
आपल्या वेबपोर्टलच्या माध्यमातून गाव, निसर्ग, इतिहासाची अधोरेखित वाचनीय माहिती ज्ञानात भर घालते, ज्ञानवर्धक माहिती उपलब्ध करून दिल्याबद्दल मनस्वी धन्यवाद…
सदर वेबपोर्टल म्हणजे ज्ञान…
सदर वेबपोर्टल म्हणजे ज्ञान संकलनाचे, ज्ञान वितरणाचे तसेच महाराष्ट्रातील ग्रामीण, शहरी उपजत प्रतिभेला चालना देण्याचे व त्याद्वारे महाराष्ट्रीय ऐतिहासिक वारसा जोपासण्याचे अत्यंत महत्वाचे माध्यम आहे.
डॉ. विजय कुलकर्णी,
देगलूर. जिल्हा- नांदेड.
Comments are closed.