बाबासाहेब आंबेडकरांना आगळीवेगळी श्रद्धांजली – भूमिका आणि विचार

1
28

डॉ. हर्षदीप कांबळे (I.A.S., उद्योग विकास अायुक्त, महाराष्ट्र राज्य) आणि दंतवैद्य विजय कदम या दोघांनी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समिती’ स्थापना केली. त्या समितीमार्फत त्या दोघांनी एकशेसव्वीसावी आंबेडकर जयंती वेगळ्या ढंगात साजरी केली. त्यांनी भावनेत आणि उत्साहात अडकलेला 14 एप्रिलचा जयंती दिन बाहेर काढला आणि त्या उत्सवाला कालानुरूप समर्पक असा अर्थ दिला.

बाबासाहेब आंबेडकर हयातभर त्यांच्या अनुयायांच्या कानीकपाळी ओरडत राहिले, की इतर समाज तुमच्या चळवळीत सामील होईल असे वागा. तुम्हाला त्यांच्या समस्या कळू द्या. त्यांना त्या समस्या सोडवण्यात सहाय्य करा. म्हणजे त्यांनाही तुम्ही ‘आपले’ वाटाल! निवडणुकांत इतरांच्या सहाय्याशिवाय यशस्वी होता येत नाही. हर्षदीप कांबळे व विजय कदम यांना बाबासाहेबांचा तो कानमंत्र उमगला आहे. आंबेडकर यांना त्यांच्या महाड चवदार तळे सत्याग्रहात, नाशिकच्या काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहात दलित समाजाव्यतिरिक्त विविध जातिधर्मांतील लोकांनी साथ दिली होती. हर्षदीप व विजय या व्दयीने समाजभान असणा-या त्या महनीयांच्या वंशजांना एकत्र आणले आणि त्यांचा सत्कार घडवून आणला.

हर्षदीप कांबळे यांनी त्या कार्यक्रमामागची भूमिका अाणि विचार ‘थिंक महाराष्ट्र’ला सांगितला.

– टीम ‘थिंक महाराष्ट्र’

डॉ. हर्षदीप कांबळे अाणि विजय कदम यांनी घडवलेल्या त्या कार्यक्रमाची कहाणी सुहास सोनावणे यांनी ‘थिंक महाराष्ट्र’च्या वेबपोर्टलवर लिहिली अाहे.

About Post Author

1 COMMENT

  1. खूपच आवश्यक, आगळीवेगळी, आणि…
    खूपच आवश्यक, आगळीवेगळी, आणि दीर्घ काळ वाटपाहिल्यावर घडलेलीहीघटना आहे! दोघांचेही मनापासून अभिनंदन.

Comments are closed.