बडोद्यातील विनाशकारी प्लेग, 1896 (KILLER PLAGUE 1896 IN VADODARA)

2
36
‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ या वेबपोर्टलवर महाराष्ट्र व मराठी माणूस यांबाबतची विविध तऱ्हांची माहिती आपल्याला संकलित करायची आहे. काही ऐतिहासिक महत्त्वाचा डेटादेखील गावोगावाहून, स्थानिक पातळीवरील प्रयत्नांतून उपलब्ध होऊ शकतो. तशी एक धुळे तालुक्यातील जुन्या महामारीबाबतची ऐतिहासिक महत्त्वाची माहिती संजय झेंडे यांनी संकलित केली व आपण ती ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’वर प्रसिद्ध केली. तशीच प्रकाश पेठे यांनी संकलित केलेली जुनी हकीकत येथे प्रसिद्ध करत आहोत. आपणा सर्वांना ठाऊकच आहे, की बडोदे हे गुजरात येथील मराठी राज्य होते(व आहेही). पेठे यांनी ‘थिंक महाराष्ट्र‘वर विविध तऱ्हाचे लेखन केले आहे.

अजिंठा लेणे

रेम्ब्रांटची वास्तू

गरूडेश्वरचे वासुदेवानंद सरस्वती

स्वामी रंग अवधूत – नारेश्वरनो नाथ (Swami Rang Avdhoot)

गुजरातमधील कुटुंबसंस्था आणि कुटुंबकबिला हरवला!

गणदेवी (गुजरात) – राम गणेश गडकरी यांचे जन्मगाव

यवतमाळचे सर्पमित्र श्याम जोशी

गुजराती श्रीमंत का असतात?

अख्ख्या भारताचे मोजमाप – द ग्रेट इंडियन आर्क

चित्रसप्तमा

तिंतल तिंतल लितिल ताल !

बनारसचे मराठी

पारांच्या ओळींचे पारोळा

गुजरात : 1 मे – 1960 ते 2010

जेजुरी

बडोद्यातील विनाशकारी प्लेग, 1896 (KILLER  PLAGUE 1896 IN VADODARA)
बडोद्याचा नकाशा
बडोद्याचा नकाशा

बडोदे गावावर प्लेगचा पंजा 1896 साली पडला होता. भारतात प्लेगमुळे पाच लाखांहून जास्त माणसे त्यावेळी मृत्युमुखी पडली होती. आम्ही लहान असताना आमचे वडील प्लेगच्या गोष्टी सांगत, त्या घाबरवून टाकणाऱ्या होत्या. आमच्या कुटुंबातील काही व्यक्ती प्लेगमुळे गेल्याही होत्या. महाराजा सयाजीराव गायकवाड यांचे कुटुंब त्याआधी चार वर्षे, 1892 साली गावापासून दूर मोकळ्या लक्ष्मीविलास राजवाड्यात राहण्यास गेले होते. त्याचे कारण मूळ गावात लोकांची दाटीवाटी झाली होती. प्लेगने थैमान घातल्यावर तर गायकवाड यांचे नातेवाईक, सरदार आणि अन्य श्रीमंत लोक यांनीही गावाबाहेर बंगले किंवा हवेल्या बांधल्या. ते लोकांपासून दूर राहण्यास गेले. त्यात नगररचना किंवा शहरी आयोजन असा काहीही विचार नव्हता.
          विनाशकारी प्लेग इतका भयंकर होता, की बडोदे राज्यातील बडोदे, नवसारी, मेहसाणा, अमरेली, द्वारका या प्रदेशांत मिळून 1902-03 एवढ्या एका वर्षात दहा हजार एकशेशहाण्णव व्यक्ती मृत्युमुखी पडल्या. त्यापुढील 1903-04 या वर्षात चौदा हजार नऊशे सेहेचाळीस मृत्यू झाले आणि 1906-07 या वर्षात चौदा हजार सहाशेअठरा व्यक्ती मृत्यू पावल्या. त्याकाळी जी कोणी व्यक्ती मृत्यू पावेल तिच्या कुटुंबाला घर सोडून जाण्यास सांगण्यात येत असे. ते क्लेशकारक होते. नगरपालिका घरोघरी जाऊन सगळा तपास करत असे. जिवाला घाबरून अनेक लोक जवळपासच्या खेडोपाड्यांत राहण्यास गेले. त्यांच्या तेथे जाण्याने बडोदे तालुक्यातील अनेक खेड्यांत प्लेग पसरला. लोक निघून जाऊ नयेत म्हणून सरकारने प्रयत्न केले, पण ते सफल झाले नाहीत आणि प्लेग पसरला.
          मी बडोद्याच्या विकास नकाशावर 1966 साली काम करत असताना शिरगणतीचे आकडे पाहून चमकलो होतो. बडोदे शहराच्या शिरगणतीनुसार1891साली शहराची वस्ती एक लाख बारा हजार चारशे एकाहत्तर होती. ती 1901 साली एक लाख तीन हजार आठशे झाली. ती 1911 साली नव्व्याण्णव हजार तीनशे झाली आणि 1921 साली चौऱ्याण्णव हजार सातशे इतकी झाली. प्लेगमधील मृत्युमुळे ती लोकवस्ती कमी झाली हे कोणाच्याही लक्षात येईल.
          बडोदे शहराच्या जुन्या गावातील गल्ल्या फार अरुंद आहेत आणि तेथे वस्ती दाट आहे. काही छोटी गृहसंकुले लोभसवाणी दिसतात, पण ते दृश्य फसवे आहे. आम्ही बडोद्याला अशा एका गल्लीत दहा वर्षे राहिलो आहोत. तो आमच्या जीवनातील वाईट काळ होता. जे कधी जुन्या गावात राहिले नाहीत तेच ‘सौंदर्यप्रेमी’ लोक जुन्या गृहरचनेचे कौतुक करू शकतात. अशा जुन्या गोष्टींना फक्त ऐतिहासिक महत्त्वाचे मूल्य असते. तेवढ्याच कौतुकाने त्या गोष्टींकडे पाहिले गेले पाहिजे. त्यामध्ये अनुकरणीय फार काही नसते.

गायकवाड राजांनी पॅट्रिक गेडीस या नगररचनाकाराला जुन्या गावाची समीक्षा व सुधारणा करण्यासाठी 1914च्या सुमारास बोलावले होते. त्यानेकॉन्झर्व्हेटिव्ह सर्जरी‘ हा त्यावर उपाय सांगितला होता. तो किती सफल ठरला ते आज पाहण्यास मिळते. बडोद्याचा 1909 सालचा शाळांचा नकाशा सोबत जोडला आहे.
          प्लेगने एकशेचोवीस वर्षांपूर्वी ज्या भागात थैमान घातले होते, तेथेच ‘कोविद 19 ने लोकांना संक्रमित केले आहे. लॉकडाऊनच्या काळात स्थानिक वृत्तपत्रांत ‘कोविद19 चा कोठे कोठे प्रादुर्भाव झाला त्याची यादी रोज प्रसिद्ध होत होती. मी त्या माहितीचा उपयोग करून माझे निष्कर्ष काढले आहेत. खरे तर, लोकांनी स्वतःच त्यांच्या घरांची स्वास्थ्य आणि वैयक्तिक आरोग्य या दृष्टीने तज्ज्ञांकडून समीक्षा करून घ्यावी आणि स्वतः तेथे राहायचे, की लोकांपासून दूर जाऊन स्वस्थ राहायचे ते ठरवावे. अर्बन डिझाईन हा विषय विदेशी पुस्तकांच्या आधारे भारतात वास्तुकलेच्या विद्यार्थ्यांना शिकवतात, तसे केले जाऊ नये. त्यातील सर्व प्रमाणे त्यांच्या भौगोलिक स्थिती, हवामान आणि त्यांची संस्कृती यावर आधारलेली असतात. ती भारतासाठी उपयोगी नाहीत. मी प्राध्यापक असल्याने त्या विषयी अनेक पुस्तके वाचली आहेत. म्हणून माझे हे मत बनले आहे.
संदर्भ :Chapter IV. Disease and Epidemics in the Baroda State.

प्रकाश पेठे 9427786823 prakashpethe@gmail.com

प्रकाश पेठे यांचा जन्‍म अमरावतीचा. ते बडोदा येथे स्‍थायिक आहेत. त्‍यांनीसर जे जे कॉलेज ऑफ आर्किटेक्चर‘, मुंबर्इ येथून शिक्षण पूर्ण केले. पेठे यांनी 1964 साली मराठी विश्‍वकोशासाठी पंधरा जगप्रसिध्द वास्तुकलाकारांच्या चरित्र नोंदींचे लेखन केले. त्यांनी मुख्यतः आर्किटेक्चर या विषयासंदर्भात, त्याचे वेगवेगळे पैलू पकडून सहा पुस्तके लिहिली आहेत. त्यांचे लेखन खूप हिंडूनफिरून होते व ते तसेच कागदावर उतरते. ते तितकेच फोटो काढतात. त्यांनी काढलेले जगभरचे उत्तम दोन-अडीच हजार फोटो त्यांच्या संगणकीय संग्रहात आहेत. त्‍यांचा वडोदरा महानगरपालिकेसाठी शहराचा पहिला विकास आराखडा व नगररचना योजना बनवण्यात सहभाग होता. त्‍यांनी 1989 मध्‍ये संगीत विशारद ही पदवी मिळवली. ते 1998 मध्‍ये नगर विकास अधिकारी या पदावरून निवृत्त झाले. ते त्यांच्या अनुभवाच्या गोष्टी इंग्रजीतून फेसबुकवर आठवड्यातून दोनदा लिहितात. ती आठवण प्रत्येकी तीनशे शब्दांत असते. त्यास आज एक वर्ष पूर्ण झाले.

—————————————————————————————————–

About Post Author

Previous articleस्थलांतर ऊर्फ घरवापसी! एक टर्निंग पॉइंट (Migration can be a Turning Point)
Next articleवटपौर्णिमा (Vatpaurnima)
प्रकाश पेठे यांचा जन्म अमरावतीचा. ते बडोदा येथे स्थायिक आहेत. त्यांनी ‘सर जे जे कॉलेज ऑफ आर्किटेक्चर’ (मुंबई) येथून शिक्षण पूर्ण केले. त्यांचा वडोदरा महानगरपालिकेसाठी शहराचा पहिला विकास आराखडा व नगर रचना योजना बनवण्यात सहभाग होता. त्यांनी संगीत विशारद ही पदवी 1989 मध्ये मिळवली. ते नगर विकास अधिकारी या पदावरून निवृत्त 1998 मध्ये झाले. त्यांनी ‘महाराज सयाजीराव विद्यापीठ’ बडोदे येथे 1977 पासून अतिथी प्राध्यापक, 2001 पासून ‘सरदार वल्लभभाई पटेल इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलाजी’ येथे अतिथी प्राध्यापक म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे. पेठे यांना प्रवास, छायाचित्रण, साहित्य, संगीत आणि कला अशा विविध विषयांची आवड आहे. त्यांची ‘स्वप्नगृह’, ‘धमधोकार’, ‘आनंदाकार’, ‘वडोदरा’ व ‘नगरमंथन’ अशी पुस्तके ‘ग्रंथाली’तर्फे प्रकाशित झाली आहेत.

2 COMMENTS

  1. जुन्या काळाची माहिती देणारा चांगला लेख. प्लेग चे ऊंदीर जहाजातून प्रवास करत आणी बंदरावर काम करणार्‍या प्रतिकार शक्ती कमी असणार्‍या माणसांना लागण होत प्लेग पसरला.असंख्य घटक आजार पसरण्यामागे असतात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here