जग अनिश्चिततेच्या भोवऱ्यात सापडले आहे. उजवी आणि डावी अशा दोन्ही विचारसरणी कालबाह्य ठरत आहेत. अशा वेळी नव्या सिद्धांताची/इझमची गरज तीव्रतेने जाणवते असे प्रतिपादन लेखक-कवयत्री नीरजा यांनी ‘हरवलेले सांस्कृतिक जग पुन्हा आणता येईल !’ या परिचर्चेत बोलताना केले. नाटककार सतीश आळेकर यांनी नव्या उमेदीच्या, दिशादर्शक काही चांगल्या कलाकृती घडताना दिसतात असे सोदाहरण सांगितले. ते म्हणाले, की नव्या जगाच्या खुणा अशा नाटकांत व नव्या कवितांत सापडू शकतील. ते दोघे ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’च्या वार्षिक दिनी योजलेल्या परिचर्चेत बोलत होते. त्यांच्या खेरीज ‘अंतर्नाद’चे (डिजिटल) संपादक अनिल जोशी आणि तरुण कवी आदित्य दवणे यांचा चर्चेत सहभाग होता...
प्रख्यात समाजवादी नेते एस.एम. जोशी यांच्या नावाचे संकेतस्थळ ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’चे मुख्य संपादक दिनकर गांगल आणि गिरीश घाटे यांनी ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’साठी पुण्यामध्ये एका बैठकीत खुले केले. त्यामुळे एस.एम. जोशी यांचे जीवनचरित्र आणि त्यांचे विचारकार्य जगभरच्या लोकांना एका क्लिकवर उपलब्ध झाले आहे. एस.एम. यांचे संकेतस्थळ हा ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’च्या ‘महाभूषण’ प्रकल्पाचा एक भाग आहे. यापूर्वी साने गुरूजी आणि रामानंद तीर्थ यांची संकेतस्थळे तयार केली आहेत. अनेक संकेतस्थळे निर्माण करून ती सार्वजनिक रीत्या लोकांना दृश्यमान होतील अशी सायबरस्पेसमध्ये ठेवण्याचा ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’चा संकल्प आहे...
श्रीकांत पेटकर यांनी “चांगुलपणा अवतीभवती” हे छोटेखानी पुस्तक ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ या वेबपोर्टलवरील काही निवडक लेखांचा संग्रह या स्वरूपात प्रकाशित केले आहे. पुस्तक ‘ग्रंथाली’ या मान्यवर संस्थेच्या देखरेखीखाली प्रकाशित झाले आहे, तर ‘थिंक महाराष्ट्र’चे मुख्य संपादक दिनकर गांगल यांची प्रस्तावना पुस्तकाला लाभलेली आहे. सामाजिक, कला आणि संस्कृती क्षेत्रात स्वतःला झोकून दिलेले परंतु प्रसिद्धीविन्मुख अशा व्यक्तींबाबत लेख या पुस्तकात आढळतात...
एकोणिसावे शतक संपत आले होते. हैदराबाद राज्यातील हिंदू जनतेचे आत्मतेज जागृत करून विविध क्षेत्रात त्यांना कार्य प्रवृत्त करण्याचे महत्त्वाचे काम करणाऱ्या पहिल्या फळीतील एक नेते होते न्यायमूर्ती केशवराव कोरटकर. त्यांच्या सहकार्याने येथे मराठी शाळा सुरू झाली. 'निजाम विजय'सारखे वर्तमानपत्र निघाले. मराठी ग्रंथ संग्रहालयाची स्थापना झाली. त्यांनी विधवा पद्धतीला विरोध करत स्त्री शिक्षणाचा आग्रह धरला. हिंदू समाजाला स्वातंत्र्याचे स्वतःचे भान देणाऱ्या केशवराव कोरटकर यांचा परिचय मात्र हैदराबादमधील मराठी लोकांनाही नाही आणि महाराष्ट्रासाठी तर त्यांचे कार्य अपरिचितच आहे...