पुण्याच्या मुळा-मुठा नदीची स्वच्छता (Cleaning of Mula-Mutha River in Pune)

1
45

विठ्ठल मंदिराजवळील परिसर

नदीचे पुनरुज्जीवन सामान्य नागरिकांच्या सक्रिय सहभागाशिवाय शक्य नाही! तोच विचार मनात ठेवू आम्ही जीवितनदी संस्थेतर्फे, दत्तक घेऊया नदीकिनारा ही योजना 2017 साली सुरू केली. उद्दिष्ट असे, की नागरिकांनी त्यांच्या रहिवासाजवळपासचा एखादा झरा/ओढा किंवा नदीकिनारा दत्तक घ्यायचा – तो नियमितपणे स्वच्छ ठेवायचा. त्याला जोपासायचे, तो भाग प्रदूषणाच्या स्रोतांचा अभ्यास करून- कारणे शोधून प्रदूषणमुक्त ठेवायचा, तेथीजैवविविधतेची नोंदठेवायची, त्या भागाच्या संवर्धनासाठी योग्य ते उपाय अमलात आणायचे आणि तेवढ्या भागाला जीवित होताना बघायचे!

            पहिला प्रकल्प मुठा नदीकाठी, विठ्ठलवाडी येथे सुरु झाला. तो परिसर म्हणजे नदीच्या परिसंस्थेवर शहरामुळे पडणाऱ्या सर्व भाराचे प्रतीकच जणू आहे. नदीपात्रात पुंडलिकाचे एक मंदिर आहे. नदीच्या काठावर अडीचशे वर्षे जुने असे विठ्ठलाचे मंदिर आहे. नदीपात्राच्या कडेला दोन दगडी गोमुखे आहेत, त्यातून पाणी सतत वाहत असते. कोठल्याही गोमुखातून सर्वसाधारणपणे जिवंत झर्‍याचे किंवा ओढ्याचे पाणी वाहते. झरा किवा ओढा यांच्या संवर्धनाची भारतातील ती पारंपरिक पद्धत आहे. त्या गोमुखातून वाहणारे झर्‍याचे पाणीही दीला जाऊन मिळत असे, पण ते केव्हाच कुंठले होते! मुठा नदीच्या पात्रात बरेच हस्तक्षेप 2000-2010 या दशकात झाले. नदीला चॅनलाइज केले गेले. मैला वाहून नेणारी पाईपलाइन नदीला समांतर टाकण्यात आली. त्यासाठी नदीपात्राच्यादेखण्या अशा काळ्या खडकाला (बेसाल्ट) सुरुंग लावून फोडण्यात आले. खडकाचे लहानमोठे तुकडे नदीपात्रात तसेच टाकण्यात आले. त्यात पुराच्या पाण्याने आणलेला गाळ साठत गेला. परिणामस्वरूप, नदीपात्रात अनेक टेकाडे तयार होऊन, दलदल निर्माण झाली आणि नदीकडे जाणार्‍या पाण्याच्या मार्गात अडथळा निर्माण झाला. ते पाणी नदीला न मिळता, नदीपात्रात अनेक डबक्यांच्या स्वरूपात साठत जाते, त्यामुळे दलदल निर्माण होते. दलदलीचीशी अनेक डबकी नदीपात्रात तयार झाली आहेत. (https://goo.gl/maps/8pgma48sweH2)  

           

कार्यकर्ते कष्टाची कामेही करत असत.

आम्ही गोमुखातील पाणी नदीपर्यंत पोचवण्यासाठी एक योजना आखली तिला हाय्य लेम्निऑन ग्रीन सोल्युशनस आणि आइकॉस यांचे लाभले. गोमुखातील पाणी ज्यात जमा होत होते अशी चार डबकी एकमेकाना जोडायची, त्यामुळे पाणी एका डबक्यातून पुढी डबक्यात वाहू शकेल आणि शा रीतीने पाणी नदीपर्यंत पोचेल. वाटेत ते पाणी माती, वनस्पती ह्यांच्या मदतीने शुद्ध करायचे.

      

स्वयंसेवकांनी दर आठवड्याला त्या रविवारी काम काय करायचे ह्याची यादी केली जायची आणि गट सदस्यांना व्हॉटस् अ‍ॅपवर पाठवली जायची. आम्ही सारे सदस्य दर रविवारी जमलो की पाच मिनिटे चर्चा करून, कामाची वाटणी करून कामाला सुरुवात करायचो. काम केल्यावर योजनेप्रमाणे काय काम झाले, काय कमी पडले ह्याची चर्चा करून पुढील रविवारचा आराखडा करायचो. नव्याने निर्माण झालेल्या त्या पाणथळ जागेचे पाणी स्वच्छ आणि वाहते आहे. त्याचा घाणेरडा वास गायब झाला आहे.

            आम्ही नदीत विरघळलेला प्राणवायू मोजला तर तो 5 ppm आढळला. तो 8 ppm इतका असला पाहिजे. मासे आणि इतर जलचर 4 ppm च्या पुढे जगू शकतात. नदीच्या पाण्याचा, पावसाळ्याचे चार महिने सोडले तर प्राणवायू केवळ 0-2 ppm इतका असतो. वॉटर स्केटर (एक प्रकारचा किडा) असणे हे एका उत्तम पाणथळ जागेचे लक्षण होय. त्यांचे नदीच्या पाण्यातील वाढते प्रमाण बघून आम्ही योग्य मार्गावर आहोत याला दुजोरा मिळत गेला. खेकडे आणि मासे तेथे वास्तव्य करतात. अनेक पक्षी येतजात असतात. वाहत्या पाण्याचा आवाज कानाला सुखद तर असतोच, पण तो मन प्रसन्न करणाराही असतो. त्यामुळे नदी आणि नदीपात्र यांचे स्वरूपच बदलून जाते.

 संबंधित लेख धरण हा पाणी साठवण्याचा एकच पर्याय?

            विठ्ठलवाडी प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्ये अशी, की बाहेरची कोठलीही गोष्ट आम्ही नदीपात्रात वापरली नाही. नदीपात्रातील दग़ड, नदीपात्रातीलच वनस्पती फक्त एका जागेतून दुसरीकडे नेल्या. मुख्य म्हणजे हे शुद्ध पाणी नदीपात्रात उपलब्ध तर आहेच; शिवाय, नदीला सतत त्या पाण्याचा पुरवठा होत आहे.

        

 

    प्रकल्पाच्या यशामुळे आम्ही त्याच ठिकाणच्या एका ओढ्यावर तोच प्रयोग करायचे ठरवले. तो ओढा मोठा होता, त्यात सांडपाण्याचे आणि घनकचऱ्याचे प्रमाणही जास्त होते, त्यामुळे आमच्यापुढील आव्हानही मोठे होते. ओढ्यामध्ये आधी कितीही प्रदूषण असले तरी नदीपात्रात ते पाणी आम्ही शुद्ध करून नदीपर्यंत नेऊ शकतो हा विश्वास आम्हाला त्या दोन यशस्वी प्रकल्पांमुळे मिळाला आहे.

प्रकल्पांच्या अंमलबजावणीला वीस रविवार, पन्नासहून अधिक स्वयंसेवक आणि चार तज्ज्ञांचे मार्गदर्शन एवढ्या गोष्टींची गरज लागली. हे सर्व साध्य झाले ते समाजातील चांगल्या हेतूं’ना भक्कम पर्यावरणशास्त्रीय ज्ञानाची साथ मिळाली म्हणून! असे अनेक झरे, ओढे आणि पाणथळ जागा नदीपात्रात आहेत. तेथे असेच प्रकल्प राबवले तर पर्यायी पाण्याचे स्रोत निर्माण होतील, नदीला वर्षभर शुद्ध पाण्याचा पुरवठा होईल. नदीला e-flow (Environmental Flow) उपलब्ध करून देता येईल.

अदिती देवधर 7350000385 aditideodhar2017@gmail.com

पुण्याच्या अदिती देवधर या जीवितनदी लिव्हिंग रिव्हर फाउंडेशनया संस्थेच्या संस्थापक संचालक आहेत. त्यांनी ब्राऊन लीफहे व्यासपीठ 2016 मध्ये सुरू केले. त्यात चार हजार लोक जोडले गेले आहेत. त्यांच्या या उपक्रमासाठी त्यांना लोकसत्ताचा नवदुर्गा पुरस्कार मिळाला आहे. त्यांचे शिक्षण गणित विषयातील (एम एस्सी). त्यांनी सहा वर्षे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात आणि नंतर तीन वर्षे एका सामाजिक संस्थेत त्याच विषयातील सल्लागार म्हणून काम केले. त्यांनी काही वर्षांपूर्वी त्यांच्या कामाचा फोकस पर्यावरणीय प्रकल्पांकडे वळवला. त्या त्यांच्या टेक्निकल ज्ञानाचा वापर त्या क्षेत्रात करत आहेत.

——————————————————————————————————————————————————–

 

साफ सफाईमुळे शुद्ध पाणी नदीला मिळत आहे.

 

 

About Post Author

Previous articleधरण हा पाणी साठवण्याचा एकच पर्याय? (Alternatives to Dam Building)
Next articleअदिती देवधर : वाळलेल्या पानांचे सोने (Aditi Deodhar : Brown Leaf Movement)
पुण्याच्या अदिती देवधर या ‘जीवितनदी – लिव्हिंग रिव्हर फाउंडेशन’ या संस्थेच्या संस्थापक संचालक आहेत. त्यांनी ‘ब्राऊन लीफ’ हे व्यासपीठ 2016 मध्ये सुरू केले. त्यात चार हजार लोक जोडले गेले आहेत. त्यांच्या या उपक्रमासाठी त्यांना लोकसत्ताचा नवदुर्गा पुरस्कार मिळाला आहे. त्यांचे शिक्षण गणित विषयातील (एम एस्सी). त्यांनी सहा वर्षे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात आणि नंतर तीन वर्षे एका सामाजिक संस्थेत त्याच विषयातील सल्लागार म्हणून काम केले. त्यांनी काही वर्षांपूर्वी त्यांच्या कामाचा फोकस पर्यावरणीय प्रकल्पांकडे वळवला. त्या त्यांच्या टेक्निकल ज्ञानाचा वापर त्या क्षेत्रात करत आहेत. 7350000385

1 COMMENT

  1. लेख आवडला पण त्यापेक्षा तुम्ही राबवत असलेल्या उपक्रम जास्त आवडला.एकमेका साह्य करू,अवघे धरू सुपंथ .या उक्तीप्रमाणे तुमचे समाजकार्य चालते.तुमच्या या चांगल्या उपक्रमास शुभेच्छा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here