‘पांढरा हत्ती पोसणे’ हा वाक्प्रचार आहे. ‘पांढरा हत्ती पोसणे’ (त्याचे पालन करणे) म्हणजे तोट्याचा व्यवहार. तो फक्त प्रदर्शनासाठी असतो. त्याच्या चारापाण्याचा खर्च इतर पाळीव प्राण्यांच्या तुलनेत जास्त असतो. त्याच्यापासून फायदा काहीच नाही, त्यास पाहण्यास होत असलेल्या गर्दीमुळे मनस्तापच जास्त होतो. एखाद्या पदासाठी अथवा व्यक्तीसाठी उपरोधिक म्हणूनही ती संज्ञा वापरतात. ज्याच्यापासून फायदा/ उत्पादन/ काम काहीच निघत नसेल, तो पद अडवून बसला असेल, विनाकारण एखादे पद मिरवत असेल व फुकटचा खर्च करत असेल व चालू कामात विनाकारण अडथळे/खोडा उत्पन्न करत असेल तर त्यासाठी हा वाक्प्रचार वापरतात.
इंटरनेटवरील एका चर्चेत वि. नरसीकर यांनी म्हटले आहे, की वृद्ध व्यक्तीही कौटुंबिक व सामाजिक स्तरावर ‘पांढरा हत्ती’च ठरत आहेत. ते वृद्धावस्थेमुळे घरातील काम करू शकत नाहीत. ते फक्त लहान घरात/फ्लॅटमध्ये जागा अडवणे, औषधोपचाराचा खर्च, डॉक्टरच्या वाऱ्या, त्यापोटी घ्याव्या लागणाऱ्या सुट्या आदी गोष्टींमुळे ‘पांढरा हत्ती’ ठरतात. जुन्या विचारांमुळे आधुनिकतेशी सांगड घालता येत नाही व विनाकारण उपदेश करतात असे आजच्या तरुणांना वाटते.
– प्रतिनिधी
बाकीचं ठिक आहे पण…
बाकीचं ठिक आहे पण म्हाताऱ्या माणसांबद्दल एवढे खालच्या पातळीवरचे विचार…?
Comments are closed.