धुआँ उडाताही चला……….

0
22

हिनाकौसर खान

     नमस्कार मित्रांनो!! कसे? बरे आहात ना. तुम्ही ठीकठाक असाल तरच आपण एका ज्वलंत विषयावर बोलणार आहोत. अंहं, ‘ज्वलंत’ शब्द ऐकून घाबरायचं कारण नाही. अर्थात तुम्ही जिगरबाज पठ्ठे. घाबरणार नाही, कारण रोज निदान एकदा तरी सिगारेटचं थोटूक पेटवताना तुमचा ज्वलंतपणाशी परिचय येतच असेल म्हणा…

     बरं! ते जाऊ द्या! महत्त्वाचं हे आहे, की तुमचं अभिनंदन करायचं आहे आणि तुमच्या हिमतीची दाद द्यायला हवी, बुवा….


–    हिनाकौसर खान

     नमस्कार मित्रांनो!! कसे? बरे आहात ना. तुम्ही ठीकठाक असाल तरच आपण एका ज्वलंत विषयावर बोलणार आहोत. अंहं, ‘ज्वलंत’ शब्द ऐकून घाबरायचं कारण नाही. अर्थात तुम्ही जिगरबाज पठ्ठे. घाबरणार नाही, कारण रोज निदान एकदा तरी सिगारेटचं थोटूक पेटवताना तुमचा ज्वलंतपणाशी परिचय येतच असेल म्हणा…

      बरं! ते जाऊ द्या! महत्त्वाचं हे आहे, की तुमचं अभिनंदन करायचं आहे आणि तुमच्या हिमतीची दाद द्यायला हवी, बुवा. म्हणजे बघा हं. धुम्रपानविरोधी कायदा आला. अंमलबजावणीच्या बतावण्यासुध्दा झाल्या. सिगारेट पुरवणार्‍यापासून ते ओढणार्‍यापर्यंत… गुन्हा करणार्‍या प्रत्येकाविरुध्द दंड ठोठवायचा निर्णयही झाला, पण त्यानं तुमचं काही बिघडलं? तुम्हा पामरांवर त्याचा धूसरही परिणाम झाला नाही. यामुळेच तर तुमच्या जिगरबाज अंदाजाला सलाम!! आता पाहा ना, तुम्ही अगदी कुठे, कुठेही म्हणजे कुठेही राजरोसपणे ‘धुआँ उडाताही चला’ म्हणत एक के बाद एक सिगारेटी फुंकता. आता, तुम्ही म्हणाल यात कसली आली हिंमत? अहो, नाही कशी, स्वत:च्या घरात कोणीही वाघ असतो. पण कायद्यानं जर रस्त्यात, कामाच्या ठिकाणी, इतरांना त्रास होईल अशा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी सिगारेटचा ‘स’ उच्चारायलासुध्दा बंदी केली असेल तिथं… त्या रस्त्यावर… गल्लीबोळात… चौकात… तुम्ही अगदी शान मारत कायद्याचा धुव्वा उडवता. ग्रेटच! फर्ग्युसन… जंगली महाराज.. बाजीराव.. टिळक.. सेनापती.. बापट.. कात्रज.. हडपसर किंवा गल्लीबोळातील थोरामोठ्यांच्या नावाचे कोणतेही चौक… सगळीकडे तुम्ही आणि तुमची सिगारेट सारखीच, असं असताना तुमचा गौरव केला नाही तरच नवल.

     आमचे एक सहकारी आहेत. भारी सज्जन माणूस. दुसर्‍याला त्रास होऊ नये म्हणून कँण्टीनमधल्या एका कोपर्‍यात बसून पाहिजे तेवढा धूर सोडणार. मग ऑफिसमध्ये येणार. मात्र त्यालाच आपला त्रास होऊ नये अशा प्रकारे त्याच्या आकारमानाच्या चहुबाजूंनी किती वेळ कोणी फिरकत नाही. त्याला उगीच वाटते, की सगळेच त्याचा भारी आदर करतात. कोणी काहीही म्हणो त्याच्या सौजन्याची ऐसीतैशी करावीशी…(सॉरी हं, स्लिप ऑफ टंग! समजून घ्या.) हां तर म्हणत होते, त्याच्या सौजन्यात ऐस – पैस व्हायला होतं. हे तर काहीच नाही. पण सांगू की नको असं होतंय. तुम्हाला म्हणून सांगते हां. आपल्यातील गुपित बरं का? कोणाला म्हणून सांगायचं नाही (पुरी पार्श्वभूमी). पुरे तर पुरे.. आपले कायद्याचे संरक्षक (अहो, कोण म्हणून काय विचारता?) पोलिसदादा हो! क्वचित एकदोनदा त्यांनाही धुरांच्या रेषेत पाहिलंय. (त्यांना सिगारेट म्हणजे मशाल वाटत असेल बहुतेक) तेव्हा सामान्यजनांच्या हिमतीची दाद द्यायलाच हवी ना..!

     आता जर दहशतवादी माणुसकीचा धूर उडवत असतील…सवलतींच्या लोभापायी कोणीही आरक्षणाचा धूर उडवत असेल… जगाच्या पाठीवर कोणाच्या कोणत्याही असंस्कृतपणानं भारतीयत्वाचा धूर निघत असेल, तिथं तुम्ही जर फक्त सिगारेटचा धूर उडवत असाल तर जास्तीत जास्त काय स्वत:च्या हाडांचा आणि इतरांच्या स्वास्थ्याचा धूर काढता इतकंच…..!!! तेव्हा तुमच्या वाढलेल्या हिंमतीला आणि आमच्या ढासळलेल्या नियमांना सलाम तर ठोकावाच लागेल.

–  हिनाकौसर खान
संपर्क – 9850308200
greenheena@gmail.com

{jcomments on}

About Post Author

Previous article‘आचार्य कुला’साठी हाक!
Next articleनैतिक दबावाची गरज
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.