दुगावची पीराची यात्रा – हिंदु-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक

20
654
carasole

नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्याच्या पूर्वेस बारा किलोमीटर अंतरावरील चांदवड-मनमाड मार्गावर ‘दुगाव’ नावाचे गाव आहे. गावाची लोकवस्ती पाच हजार. गावात हिंदु, मुस्लीम आणि इतर समाजाचे लोक राहतात.

दुगावात वर्षानुवर्षे गुढीपाडव्याच्या दिवशी ‘पीरसाहेबाची’ यात्रा भरते. त्याच्या आयोजनात गावातील हिंदु-मुस्लीम दोन्ही समाज पुढाकार घेतात. गावकरी गुढीपाडव्याच्या चार दिवस आधी एकत्र येतात. गुढीपाडव्यापर्यंत प्रत्येक रात्री तमाशा वगैरे करमणूकीचे कार्यक्रम केले जातात. त्याबरोबर विविध प्रकारची सोंगे नाचवली जातात. लोक गणपती, रावणाचे मुखवटे घालून नाचतात. शेवटच्या दिवशी म्हणजे गुढीपाडव्याला ‘संदल’ निघतो. त्याची मिरवणूक गावापासून सुरू होते आणि पीरसाहेबांच्या समाधीजवळ तिचा शेवट होतो. तेथे गावातील हिंदु आणि मुस्लीम समाज भक्तीभावाने पीरसाहेबांच्या थडग्याचे दर्शन घेतात. त्यावेळी दिसणारे दृश्य गावातील हिंदु-मुस्लीम ऐक्याचे प्रतिक असते.

दुगावात हिंदु-मुस्लीम तेढ निर्माण होत नाही. ते दोन्ही समाज गावात गुण्यागोविंदाने नांदतात. एकमेकांचे सण स्वत:चे समजून मोठ्या उत्साहाने साजरे करतात. पीराच्या यात्रेच्या निमित्ताने ते दोन्ही समाज एकत्रितपणे सण साजरा करतात. त्या समाजातील एकोपा टिकवण्यामध्ये ‘पीराच्या यात्रे’चे योगदान मोठे आहे.

दुगाव हे ब्रिटिशांच्या राजवटीपासूनच शिक्षणाच्या बाबतीत पुढारलेले आहे. त्या काळी गावातील विद्यार्थी पुण्यात शिक्षण पूर्ण करत. ते सारे मामलेदार, वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि इतर क्षेत्रांत कार्यरत होते. सांप्रत काळीही गावातील तरुण देशाच्या रक्षणाकरता सैन्यदलात आहेत. काही कॅप्टन पदापर्यंत कार्यरत होते.

दुगावात महात्मा फुले यांच्या नावाने हायस्कूल आहे. गावाचे तत्कालीन पोलीस-पाटील श्री नामदेवराव लक्ष्मणराव पाटील (सोनवणे) यांनी ‘एक गाव एक पाणवठा’ हे सरकारी धोरण अंमलात आणले. त्यांनी त्या काळच्या दलितांना गावातील सार्वजनिक विहिरीवर पाणी भरण्यास परवानगी दिली होती. त्या वेळी ती घटना सवर्ण-दलित ऐक्याचे उदाहरण म्हणून गाजली होती. तो जातीयता नष्ट करण्याचा प्रयत्न होता. म्हणूनच त्यावेळच्या सरकारने त्या घटनेची दखल घेऊन गावाला ‘जातियता निर्मुलना’चे पारितोषिक दिले होते.

दुगावचा मुख्य व्यवसाय शेतीचा. पण दुष्काळ गावाच्या पाचवीला पुजलेला आहे. ऋतुमानाच्या अस्थिरतेमुळे शेती व्यवसाय धोक्यात आहे. तरीही लोक जो काही पाऊस पडेल त्यावर विहिरीचे पाणी देऊन कांद्याचे पीक घेतात. वर्षातून घेतले जाणारे नगदी पीक म्हणजे फक्त कांदा! शेतकरी त्यावरच मुलाबाळांचे शिक्षण, लग्नकार्य करतात. जोडीला वर्षभर पुरेल एवढ्या अन्नधान्याचा साठा करून ठेवतात.

गावातील लोकांमध्ये परोपकाराची वृत्ती जागती आहे.

शिवाजी सोनवणे

About Post Author

20 COMMENTS

 1. जातीय वाद संपलाचं पाहीजे.
  जातीय वाद संपलाचं पाहीजे.

 2. Think Maharashtra मधून विविध
  Think Maharashtra मधून विविध विषयांचा चिकित्सक अभ्यास करून अस्तित्वातील घटना व घडामोडींचा वेध घेवून social media द्वारे प्रकट करण्याचा उपक्रम स्तुत्य आहे. अथक परिश्रम करून निःस्वार्थपणे आपला अमुल्य वेळ देण्याची आपली वृत्ती वंदनीय आहे. आपल्या कार्यास शुभेच्छा व मनापासून सलाम!

 3. मी दै लोकमत चा दुगांव
  मी दै. ‘लोकमत’चा दुगांव वार्ताहर आहे. तुमचा लेख वाचून खूप माहिती मिळाली. धन्यवाद.

 4. गावातील लोकांचे कौतुक करावे
  गावातील लोकांचे कौतुक करावे तेवढे कमीच. इतर गावांसाठी मोठा आदर्श आहे. संस्कृती जपताना इतर धर्मांचा आदर कसा करावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे दुगाव येथील पीराची यात्रा. अभिनंदन दुगांवकर!

 5. Thanks for this article. It
  Thanks for this article. It means a lot to us especially where i did my schooling in a dry town like DUGAON.

 6. संपूर्ण समाजाने आदर्श घ्यावा
  संपूर्ण समाजाने आदर्श घ्यावा अशी अभिमानाची गौरवशाली परंपरा.

 7. DUGAON HE EK SANSKRUTIK KHEDE
  DUGAON HE EK SANSKRUTIK KHEDE ASUN ETHE SARV LOKANMADHE EKTA DISUN YETE.

 8. अलिकडे चालू असलेल्या जातीय
  अलिकडे चालू असलेल्या जातीय वादाला ऐक्याचा संदेश देण्यासाठी हा उत्तम लेख आहे.

 9. Thanks Dada, very nice
  Thanks Dada. very nice artical Dugaon pirbaba yatra special. Great Thinking.
  Lot of Thanks.

 10. दुगाव बद्दल माहिती खुपच छान..
  दुगाव बद्दल माहिती खूपच छान. सामाजिक ऐक्याचे भान जपणारे गाव आणि मातीतली खरी माणसं. आजच्या विविध समाज आणि धर्मांत दुहीची बीजे पेरणा-यांसाठी ही चपराकच आहे. दाहक उन्हाळ्यात पाणवठा दाखवणारी बातमी. आभार.

 11. छान दुगाव गावातील नागरिक
  छान. दुगाव गावातील नागरिक अभिनंदनास पात्र. ह्या लेखद्वारे माहिती पोहचवल्याबद्दल लेखकाचे आभार.

 12. लेख वाचून खूप आनंद झाला…
  लेख वाचून खूप आनंद झाला. लहान पणापासूनच्या पाडव्याच्या खूप छान आठवणींना उजाळा मिळाला.

Comments are closed.