दिनकर गांगल

0
103

दिनकर गांगल हे थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉमया वेबपोर्टलचे दहा वर्षांपासून मुख्‍य संपादक आहेत. ते तीन महिन्यांपूर्वी ऐंशी वर्षांचे झाले. त्यामुळे ते बॅकसीट घेऊन तरुणांच्या हाती सूत्रे सोपवणार आहेत. मात्र ते घरी राहून सर्व प्रकारचे सहकार्य आणि लेखांचे संपादन करणार आहेत.

ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली म.टा.ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना फीचर रायटिंगया संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला.
गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने ग्रंथालीची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी ग्रंथालीच्‍या रुचीमासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत ग्रंथालीची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये एस.टी. समाचारचा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल ग्रंथालीप्रमाणे प्रभात चित्र मंडळाचे संस्‍थापक सदस्‍य आहेत.
साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि स्‍क्रीन इज द वर्ल्‍डअशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मितीचा पुरस्‍कार, ‘मुंबई मराठी साहित्‍य संघमराठा साहित्‍य परिषदयांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल यशवंतराव चव्‍हाणपुरस्‍कार लाभले आहेत.

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here