दापोली तालुक्यातील शाहीर उदय काटकर

0
233

शाहीर उदय काटकर यांनी जाखडी नृत्याची छाप पहाडी आवाजाच्या जोरावर महाराष्ट्रभर उमटवली. त्यांचे प्रेक्षकांच्या हृदयाला हात घालणारे वक्तृत्त्व आणि बहारदार गायकी लोकांच्या मनावर गारुड करते. उदय काटकर यांनी हजारांहून अधिक कार्यक्रम महाराष्ट्रभर केले आहेत…

पिसई गावाच्या शिरपेचात सन्मानाचा तुरा खोवणारी व्यक्ती म्हणजे शाहीर उदय काटकर हे होत. त्यांनी त्यांचे आयुष्य कलेसाठी वेचले आहे. त्यामुळे लोक त्यांना अवलिया म्हणूनच ओळखतात. आजही ते त्यांची कलेची हौस निरनिराळ्या पद्धतीने भागवत आहेत. उदय काटकर यांनी जाखडी नृत्यात शाहीर, कवी आणि गायक या भूमिका बजावत 1991 साली पदार्पण केले. त्यांनी त्यांच्या जाखडी नृत्याची वेगळी छाप महाराष्ट्रभर पहाडी आवाजाच्या जोरावर उमटवली आहे. प्रेक्षकांच्या हृदयाला हात घालणारे उत्तम वक्तृत्त्व आणि बहारदार गायकी लोकांच्या मनावर गारुड करून गेली आहे.

उदय काटकर यांनी हजारांहून अधिक कार्यक्रम महाराष्ट्रभर केले आहेत. गावातील नृत्य कलापथके बंद पडली तेव्हा या शाहीर कलावंतांनी लावणी फडांमध्ये सूत्र संचालनाची जबाबदारी चोखपणे पार पाडली. उदय काटकर यांचे उत्तम निवेदक म्हणून नाव आहे. त्या शाहिराची गायकी आणि निवेदन ऐकताना प्रेक्षक मंत्रमुग्ध होतात.

– निलेश उजाळ 7045398561 nilesh.ujal16@gmail.com

———————————————————————————————————————————————

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here